Gadar 2 Poster Out : 22 वर्षानंतर तारासिंग पुन्हा पोहोचणार पाकिस्तानमध्ये !, या दिवशी थिएटरमध्ये येतोय गदर 2

Gadar 2 First Look Out : सनी देओलने प्रजासत्ताक दिनानिमित्त चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टरही रिलीज केला आहे,

First look out of Sunny Deol's film 'Gadar 2'
Gadar 2 Poster Out : 22 वर्षानंतर तारासिंग पुन्हा पोहोचला पाकिस्तानमध्ये !, या दिवशी थिएटरमध्ये येतोय गदर 2  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सनी देओलचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'गदर: एक प्रेम कथा' चा सिक्वेल लवकर प्रदर्शित होणार
  • चित्रपटाचे फस्ट लूक जाहीर
  • सनी देओलने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी शेअर केला आहे.

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सनी देओलच्या 'गदर 2' या चित्रपटाची चाहत्यांनी बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा केली आहे. चित्रपटाच्या घोषणेपासून तो चर्चेत राहिला आहे. त्याचबरोबर प्रजासत्ताक दिनानिमित्त सनी देओलने त्याच्या चाहत्यांना एक भेट दिली आहे. निर्मात्यांनी चित्रपटाचे पोस्टर रिलीज करून त्याची रिलीज डेट जाहीर केली आहे. अशा परिस्थितीत सनी देओलला तारा सिंगच्या अवतारात पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. (First look out of Sunny Deol's film 'Gadar 2')

अधिक वाचा : Pathaan Box Office Collection Day 1 : पठाण सिनेमाची पहिल्या दिवसाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये केजीएफ 2 आणि वॉर सिनेमावर मात

सनी देओलने सोशल मीडियावर 'गदर 2'चे पोस्टर शेअर करून रिलीज डेटची घोषणा केली आहे. सनी 'गदर'मध्ये हँडपंप उखडताना दिसला होता, यावेळी तो हातात हातोडा घेऊन दिसत आहे. पोस्टर पाहूनच सनी 'गदर 2' घेऊन पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर राज्य करणार असल्याचे दिसते.

पोस्टर शेअर करताना सनी देओलने लिहिले की, 'हिंदुस्तान जिंदाबाद है... जिंदाबाद था... और जिंदाबाद रहेगा! या स्वातंत्र्यदिनी आम्ही तुमच्यासाठी दोन दशकांनंतरचा भारतीय सिनेमाचा सर्वात मोठा सिक्वेल घेऊन येत आहोत. 

अधिक वाचा : Pathaan Box office collection: पहिल्या वीकेंडला शाहरूखचा 'पठाण' 300 कोटींचा गल्ला जमवण्याचा अंदाज

अनिल शर्मा दिग्दर्शित 'गदर: एक प्रेम कथा' 2001 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटात सनी देओलसह अमिषा पटेल आणि अमरीश पुरी यांच्याही प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि अशा परिस्थितीत ते 'गदर 2' चीही आतुरतेने वाट पाहत आहेत. 'गदर 2' स्वातंत्र्य दिनापूर्वी 11 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी