SwatantraVeer Savarkar Movie । मुंबई : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती २८ मे रोजी (Veer Savarkar Jayanti) म्हणजेच आज आहे. त्यांच्या जयंतीनिम्मित देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान सावरकरांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या एका चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचे पहिले पोस्ट प्रदर्शित झाले आहे. दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar Movies) यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून संदीप सिंह आणि अमित वाधवानी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. लक्षणीय बाब म्हणजे अभिनेता रणदीप हुड्डा (Randeep Hooda) सावरकरांची भूमिका साकारणार आहे. (First poster release of 'Swatantryaveer Savarkar', Randeep Hooda will play the role of Savarkar).
अधिक वाचा : गोरेगावमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक
दरम्यान, चित्रपटाचे दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. या पोस्टरच्या माध्यमातूनच त्यांनी अभिनेता रणदीप हुड्डाच्या भूमिकेची ओळख करून दिली आहे. 'हिंदूत्त्व धर्म नही, इतिहास हैं' अशी टॅगलाइन या पोस्टवरून देण्यात आली आहे, त्यामुळे ही पोस्ट सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
महेश मांजरेकरांनी सावकरांच्या जयंतीच्या शुभेच्छा देत चित्रपटात रणदीप हुड्डा मुख्य भूमिकेत असल्याचे जाहीर केले आहे. तसेच हे पोस्टर शेअर करताना त्यांनी म्हटले की, "सावकरांच्या बाबतीत लोकांच्या मनात वेगवेगळे विचार असू शकतात. पण एक चित्रपट निर्माता म्हणून पण मी सावरकरांच्या विचारांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे चित्रपटाची कथा आणि व्यक्तिरेखा यात सावरकर जसे होते, आहेत आणि राहतील यापेक्षा वेगळा कोणताच फरक असणार नाही. ते स्वातंत्र्यसैनिक होते आणि त्यांना कधीच विसरता येणार नाही."
अभिनेता रणदीप हुड्डाने देखील सावकराच्या जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने म्हटले की, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील सर्वोच्च पण ज्यांच्याबाबत खूप कमी ऐकिवात आहे अशा वीरांपैकी असणाऱ्याला हा सलाम आहे. मला नक्कीच आशा आहे की एका क्रातिकांराची भूमिका मी पेलू शकेन, जी एका मोठ्या कालावधीपासून दडवून ठेवली आहे. लक्षणीय बाब म्हणजे रणदीप हुड्डाचे जेवढे कौतुक होत आहे तेवढ्याच प्रमाणात त्याला ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागत आहे. सोशल मीडियावर लोक त्याची खिल्ली उडवत आहेत.