Laal Singh Chaddha First Review: लाल सिंग चड्ढाचा फर्स्ट रिव्ह्यू, जाणून घ्या आमिर-करीनाचा चित्रपट पाहावा की नाही?

बी टाऊन
Updated Aug 06, 2022 | 19:28 IST | टाइम्स नाऊ मराठी

Laal Singh Chaddha First Review: आमीर खानचा (Aamir Khan)लाल सिंग चड्ढा (Laal Singh Chaddha)हा सिनेमा 11 ऑगस्टला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या सिनेमाला मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात येत आहे. त्यामुळे आमिर खान देखील या चित्रपटाबाबत खूप तणावात आहे. नुकतंच लाल सिंग चड्ढाचं स्पेशल स्क्रीनिंग (Laal Singh Chaddha special screening) झालं. त्याचा फर्स्ट रिव्ह्यू समोर आला आहे. आता फर्स्ट रिव्ह्यूनुसार आमीर-करीनाचा हा सिनेमा पाहावा की नाही हे तुम्ही ठरवा.

First review of movie Laal Singh Chaddha
लाल सिंग चड्ढा सिनेमाचा फर्स्ट रिव्ह्यू  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • लाल सिंग चड्ढाचा फर्स्ट रिव्ह्यू
  • आमीर खानचा अभिनय अप्रतिम, समीक्षकांकडून कौतुकाची पावती
  • नागा चैतन्य आणि करीना कपूर-खानच्या कामाचीही प्रशंसा

Laal Singh Chaddha First Review: आमिर खान  (Aamir Khan) , करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan), नागा चैतन्य  (Naga Chaitanya) 
आणि मोना सिंग (Mona Singh) स्टारर लाल सिंग चड्ढा (Laal Singh Chaddha) या चित्रपटाच्या रिलीजला अवघे काही दिवस उरले आहेत. एकीकडे बहिष्कार घातला जात असतानाच दुसरीकडे सिनेप्रेमींमध्येही या चित्रपटाची प्रचंड उत्सुकता आहे. त्याचबरोबर आमिर खान देखील या चित्रपटाबाबत खूप तणावात आहे. नुकतंच लाल सिंग चड्ढाचं स्पेशल स्क्रीनिंग झालं (Laal Singh Chaddha special screening). त्याचा फर्स्ट रिव्ह्यू (Laal Singh Chaddha First Review) समोर आला आहे. आता फर्स्ट रिव्ह्यूनुसार आमीर-करीनाचा हा सिनेमा पाहावा की नाही हे तुम्ही ठरवा. ( First review of Aamir Khan and Kareena Kapoor starrer movie Laal Singh Chaddha )

अधिक वाचा : विवाहित प्रियकराने तरुणीला लटकावले फासावर

'लाल सिंग चड्ढा'चा फर्स्ट रिव्ह्यू

ओव्हरसीज सेन्सॉर बोर्डाचे सदस्य उमेर संधू यांनी या चित्रपटाचे वर्णन उत्कृष्ट नमुना म्हणून केले आहे. उमेर संधूने चित्रपट पाहिल्यानंतर इंस्टाग्रामवर लिहिले, 'लाल सिंग चड्ढा हा एक उत्कृष्ट नमुना आहे. एक उत्तम चित्रपट जो तुमच्या हृदयात आणि मनात राहील. हिंदी चित्रपटसृष्टीला पुन्हा एकदा उभारी देणारा चित्रपट आणि भूतकाळात आलेल्या चित्रपटांपैकी लाल सिंग चड्ढा हा एक अतिशय चांगला चित्रपट आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही आणि येणाऱ्या काळातही तो लक्षात राहील.

उमेरने आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहिले की, 'आमिर खानने त्याचे पात्र चांगले साकारले आहे. हे त्याने साकारलेल्या सर्वात कठीण पात्रांपैकी एक आहे आणि त्याने आपल्या अभिनयाने मने जिंकली आहेत. करीनाने चांगले काम केले आहे. नागा चैतन्य आणि मोना सिंग यांचे कामही चांगले आहे. हा एक निश्चित  ब्लॉकबस्टर आहे. यासोबतच उमेरने या चित्रपटाला चार स्टार्स दिले आहेत. उमेर संधूचे हे ट्विट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. 

अधिक वाचा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर

फॉरेस्ट गंपचा ऑफिशियल रिमेक

लाल सिंग चड्ढा हा हॉलीवूड अभिनेता टॉम हँक्सच्या  (Tom Hanks) फॉरेस्ट गंप (Forrest Gump) या सिनेमाचा रिमेक आहे. 'लाल सिंग चड्ढा'मध्ये करीना कपूर खान, मोना सिंह आणि नागा चैतन्य यांच्याही भूमिका आहेत. लाल सिंग चड्ढा या चित्रपटाचे देशभरात 100 ठिकाणी शूटिंग झाले आहे. आमिर खानने या चित्रपटासाठी आपली 12 वर्षे दिली आहेत. अद्वैत चंदन दिग्दर्शित लाल सिंग चड्ढा 11 ऑगस्टला थिएटरमध्ये दाखल होणार आहे.


चित्रपटावरील बहिष्कारावर आमिर खान काय म्हणाला?

याआधी या सिनेमावर सोशल मीडियावर बहिष्कार टाकण्यात आला होता. यावर आमिर खान म्हणाला होता की, 'बॉयकॉट बॉलीवूड, बॉयकॉट आमिर खान, बॉयकट लाल सिंह चड्ढा' हा हॅशटॅग चालवल्यामुळे मला वाईट वाटत आहे. बऱ्याच जणांना असे वाटत आहे की, मला भारत आवडत नाही.पण हे सत्य नाही.  'माझे देशावर मनापासून प्रेम आहे. पण तुम्ही जर असा काही विचार करत असाल तर ते दुर्दैव आहे. असा कोणताही पूर्वग्रह मनात न ठेवता लाल सिंग चड्ढा हा सिनेमा पाहा."

अधिक वाचा : सुष्मिताला डुबकी मारताना पाहून ललित मोदीचं सुटलं नियंत्रण


बहिष्काराला तितकसं महत्त्व करीना कपूर देत नाही

लाल सिंह चड्ढाच्या बहिष्कारावर करीना कपूर खान इंडिया टुडेशी बोलताना म्हणाली, 'आज प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे, आज अनेक व्यासपीठे आहेत, प्रत्येकाचे स्वतःचे मत आहे. त्यामुळे असे झाले तर काही गोष्टींकडे दुर्लक्ष करायला शिकावे लागेल. अन्यथा तुमचे जीवन जगणे कठीण होईल. म्हणूनच मी अशा गोष्टी गांभीर्याने घेत नाही.मला जे करायचे आहे ते मी पोस्ट करते. हा एक चित्रपट आहे जो रिलीज होणार आहे. प्रत्येकाचे स्वतःचे मत असेल.त्यामुळे हा चित्रपट चांगला असेल तर बाकी सगळ्यांना मागे टाकेल, आणि प्रतिसादही चांगला मिळेल. मला वाटते की चांगल्या चित्रपटांनी सर्व गोष्टींवर मात केली जाते."


ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी