Rimi Sen Actress : कितीही म्हटलं तरी तो पैसाच! बंफर परताव्यापायी बॉलिवूड अभिनेत्रींना गामवले सव्वाचार कोटी

बी टाऊन
भरत जाधव
Updated Mar 31, 2022 | 12:40 IST

पैसा कोणाला नको असतो राव, गरीब असो की श्रीमंत सर्वांना पैसा आवडतो. पैसा मिळविण्यासाठी सर्वजण खूप मेहनतदेखील करत असतात. कुणी जमीन, गाडी, बंगला घेऊन गुंतवणूक करत अधिक परतावा मिळवून  आपला पैसा वाढत असतात. हेच तर बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री (Actress) रिमी सेनने (Rimi Sen) केलं,

Rimi Sen Actress
अभिनेत्रीला जिममधील ओळख पडली सव्वाचार कोटीला  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • रोनक जतीन व्यास असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव आहे.
  • आरोपी रोनक व्यास याची गुजरातमध्ये 'फोमिंगो बेव्हरेज' नावाची कंपनी आहे.
  • अभिनेत्री रिमीने आपल्या चित्रपट निर्मिती कंपनीच्या माध्यमातून आरोपीच्या कंपनीत चार कोटी 14 लाख रुपयांची गुंतवणूक केली

मुंबई: पैसा कोणाला नको असतो राव, गरीब असो की श्रीमंत सर्वांना पैसा आवडतो. पैसा मिळविण्यासाठी सर्वजण खूप मेहनतदेखील करत असतात. कुणी जमीन, गाडी, बंगला घेऊन गुंतवणूक करत अधिक परतावा मिळवून  आपला पैसा वाढत असतात. हेच तर बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री (Actress) रिमी सेनने (Rimi Sen) केलं, जबरदस्त परतावा (Return) मिळेल अशा उद्देशानं तिने जिममधील आपल्या ओळखीला पैसा दिला पण परताव्याऐवजी तिला सव्वाचार कोटींना गंडा मिळाला.     

मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री रिमी सेनची जीममध्ये एका व्यवसायिकांसोबत ओळख झाली. पण अभिनेत्रीला ही ओळख चांगलीच महागात पडली. संबंधित व्यावसायिकानं बॉलिवूड अभिनेत्री रिमी सेनला  तब्बल सव्वाचार कोटींचा गंडा घातला. तीन महिन्यात 30 टक्के परतावा  (Lure of 30% returns) देण्याचं आमिष दाखवून आरोपीनं रिमी सेनला गंडा घातला आहे. दरम्यान या प्रकरणी खार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी आर्थिक फसवणुकीसह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Read Also : Mohammed Shami ची चाहती बनली ही पॉर्नस्टार

रोनक जतीन व्यास असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव असून तो मूळचा अहमदाबाद येथील रहिवासी आहे. सध्या तो गोरेगाव येथील नास्को गार्डन परिसरात वास्तव्याला आहे. आरोपी रोनक व्यास याची गुजरातमध्ये 'फोमिंगो बेव्हरेज' नावाची कंपनी आहे. ही कंपनी कमॉडिटी व्यवसायात गुंतवणूक करण्याचं काम करते, असा दावा अभिनेत्री रिमी सेननं केला आहे. या प्रकरणी रिमीने शुभमित्र स्वपनकुमार सेन या तिच्या खऱ्या नावाने खार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलीस सविस्तर तपास करत आहे.

Read Also :  २५ फटके मारण्याची धमकी देत शिक्षकाने केला मुलीवर अत्याचार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रोनक व्यास याची 2019 मध्ये अंधेरीतील एका जिममध्ये अभिनेत्री रिमी सेनशी ओळख झाली होती. या ओळखीचं रुपांतर मैत्रीत झालं होतं. त्यानंतर आरोपीनं तीन महिन्यात 30 टक्के परतावा देण्याचं आमिष अभिनेत्रीला दाखवलं होतं. त्यानुसार अभिनेत्री रिमीने आपल्या चित्रपट निर्मिती कंपनीच्या माध्यमातून आरोपीच्या कंपनीत चार कोटी 14 लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. पण या रकमेवर मिळणारा नफा किंवा मूळ रक्कमही तिला परत मिळाली नाही. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर रिमीने खार पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. अभिनेत्रीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी रोनक व्यास विरोधात आर्थिक फसवणुकीसह विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी