परफेक्ट शॉटसाठी ‘या’ अभिनेत्रीनं खाल्ला इतका मार, कधी मानेवर तर कधी कानावर फटका

बी टाऊन
Updated Feb 07, 2020 | 14:45 IST | टाइम्स नाऊ हिंदी

येत्या २८ फेब्रुवारीला अभिनेत्री तापसी पन्नूचा चित्रपट ‘थप्पड’ रिलीज होणार आहे. या चित्रपटात परफेक्ट शॉटसाठी तापसीनं खूप वेळा थोबाडीत खाल्ली. चित्रपटात घरगुती हिंसेविरोधात तापसी आवाज उठवतांना दिसेल.

Taapsee pannu in thappad
परफेक्ट शॉटसाठी ‘या’ अभिनेत्रीनं खाल्ला इतका मार, जाणून घ्या 

थोडं पण कामाचं

  • तापसी पन्नूनं आगामी चित्रपट थप्पडमध्ये खाल्ली सात वेळा थोबाडीत.
  • सीन शूट करतांना अभिनेता पवेल गुलाटीनं कधी मारलं कानावर तर कधी गळ्यावर.
  • परफेक्ट शॉटसाठी तापसीनं घेतली मेहनत, येत्या २८ फेब्रुवारीला चित्रपट 'थप्पड' होणार रिलीज.

Taapsee Pannu in Thappad Movie: अभिनेत्री तापसी पन्नूचा आगामी चित्रपट येत्या २८ फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. दिग्दर्शक अनुभव सिन्हाचा चित्रपट ‘थप्पड’मध्ये तापसीनं दमदार भूमिका साकारलीय. यात घरगुती हिंसाचाराविरोधात ती आवाज उचलतांना दिसतेय. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालाय. ट्रेलर खूप पसंत केला जातोय. ट्रेलरमध्ये तापसी पन्नूच्या पतीच्या भूमिकेत अभिनेता असलेला पवेल गुलाटी तिला थोबाडीत मारतो आणि यानंतर ती घटस्फोटासाठी अर्ज करते.

तापसीचं कोर्टात म्हणणं असतं की, गोष्ट फक्त एका थापडीची आहे मात्र त्यानं मारायला नको होतो. दर्शकांनी जेव्हा ट्रेलरमध्ये थोबाडीत मारण्याचा शॉट पाहिले तेव्हा ते थक्क झाले. तापसीनं या शॉटसाठी खूप मेहनत घेतली. शॉट परफेक्ट होण्यासाठी तापसीनं बरेचदा थोबाडीत खाल्ली आहे. अभिनेता पवेल गुलाटीनं एकदा मारलं म्हणून तिनं घटस्फोटाचा अर्ज केला, मात्र हाच शॉट परफेक्ट होण्यासाठी तिनं बरेचदा मार खाल्ला.

 

 

तापसीनं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सांगितलं की, कशाप्रकारे हा सीन शूट केला गेला. हा सीन शूट करण्यापूर्वी अभिनेता पवेल खूप घाबरलेला होता. तो दोन दिवसांमध्ये या सीनसाठी तयार झाला. हा सीन सात रिटेकमध्ये पूर्ण केला गेला. खरंतर तापसीला हा सीन जेव्हा प्रेक्षक मोठ्या पडद्यावर पाहतील तेव्हा दचकले पाहिजे असं वाटत होतं. म्हणून ती परफेक्ट शॉटसाठी रिटेक घेत होती.

तापसीनं सांगितलं की, शॉट देतांना अनेक वेळा पवेलनं तिला गळ्यावर मारलं, कानावर मारलं त्यानंतर त्यानं एक जोरदार थोबाडित मारलं आणि सीन पूर्ण झाला. या चित्रपटात रत्ना पाठक शाह, तन्वी आझमी, मानव कौल, राम कपूर आणि दिया मिर्झा यासुद्धा महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहे. आतापासूनच सर्वांच्या कामाचं कौतुक केलं जात आहे. त्यामुळे आता या चित्रपटाची सर्वच जण खूप आतुरतेनं वाट बघत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी