Raan Baazaar Teaser: मराठी मनोरंजन विश्वात पहिल्यांदाच अभिनेत्रीने ओलांडल्या सीमा; उतरवले अंगावरील सर्व कपडे

बी टाऊन
भरत जाधव
Updated May 16, 2022 | 17:14 IST

अभिनेत्री तेजस्विनी पंडित  (Tejaswini Pandit ) आणि प्राजक्ता माळी (Prajakta Mali ) यांची प्रमुख भूमिका असलेल्या वेबसिरीजने (Web series) सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. सत्य घटनांच्या संदर्भांवर आधारित या वेबसिरीजमध्ये आजवर कधीही न पाहिलेली गोष्ट पाहायला मिळणार आहे.

Raan Baazaar Teaser
सस्पेन्स वाढणारा रान बाजारचा टीझर प्रदर्शित   |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit ) आणि प्राजक्ता माळी (Prajakta Mali ) यांची प्रमुख भूमिका असलेल्या वेबसिरीजने (Web series) सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
  • या वेबसीरिजमध्ये तेजस्वी पंडितने आतापर्यंतचा सगळ्यात बोल्ड सीन दिला आहे.
  • रानबाजार या वेबसीरिजचा टीझर अभिनेत्री तेजस्विनी पंडितने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला

Raan Baazaar Tejaswini Pandit Teaser:  नवी दिल्ली : दमदार कथेवर भर देत चित्रपट (Movies) तयार करणाऱ्या मराठी विश्वात आता ग्लॅमरसचा तडका लावण्यात येत आहे. नेहमीचं दमदार कंटेन्टमुळे मराठी चित्रपटसृष्टीने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता यात ग्लॅमरने एंट्री घेतली आहे. अभिनेत्री तेजस्विनी पंडित  (Tejaswini Pandit ) आणि प्राजक्ता माळी (Prajakta Mali ) यांची प्रमुख भूमिका असलेल्या वेबसिरीजने (Web series) सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. सत्य घटनांच्या संदर्भांवर आधारित या वेबसिरीजमध्ये आजवर कधीही न पाहिलेली गोष्ट पाहायला मिळणार आहे. ही वेबसीरिज पॉलिटिकल क्राईम थ्रिलर आहे. नुकताच या वेबसीरिजचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. 

रेगे’ (Rege Movie) , ‘ठाकरे’ (Thackeray Movie) असे ज्वलंत आणि संवेदनशील विषय हाताळणारे दिग्दर्शक अभिजित पानसे (Director Abhijeet Panase) ‘रानबाजार’ नावाची एक जबरदस्त वेबसीरिज (raanbaazaar webseries) घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. . दरम्यान, या वेबसीरिजमध्ये मराठी मनोरंजन विश्वात आजवर ज्या गोष्टी घडल्या नाही त्या पाहायला मिळणार आहेत. पहिल्यांदाच एखाद्या मराठी वेबसीरिजमध्ये न्यूड सीन पाहायला मिळणार आहेत. या वेबसीरिजमध्ये तेजस्वी पंडितने आतापर्यंतचा सगळ्यात बोल्ड सीन दिला आहे. सध्या या वेबसीरिजचीच सगळीकडे चर्चा सुरू आहे. 

रानबाजार या वेबसीरिजचा टीझर अभिनेत्री तेजस्विनी पंडितने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या टीझरमध्ये तेजस्विनी सिगारेट ओढताना दिसत आहे. त्यानंतर ती तिचे एक एक करत अंगावरील सर्व कपडे काढताना दिसत आहे. टीझरच्या बॅकग्राऊंडला एका महिलेचा आवज येत असून ती महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत असल्याचे दिसते. हा टीझर शेअर करत तेजस्वीने कॅप्शनमध्ये ‘एकदा लोकांची सेवा करून पाहिली…, एकदा प्रेमात त्याग करूनही पाहिला…, एकदा बदलाही घेतला..! आता मात्र फसत चाललीय…, सत्तेच्या जाळ्यात अडकलेल्या एका फुलपाखरासारखी…, वेबविश्वाला हादरवून टाकणारा ‘रानबाजार’ट्रेलर येतोय 18 मे ला!’ असे कॅप्शन दिले आहे.

रानबाजारच्या या टीझरने तर सोशल मीडियावर चांगली खळबळ उडवली आहे. आता 18 मे रोजी या वेबसीरिजचा ट्रेलर प्रर्शित होणार आहे. याकडे आता प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. टीझर पाहूनच या वेबसीरिजबाबत सर्वांची उत्सुकता खूप वाढली आहे. दरम्यान, पॉलिटिकल क्राईम थ्रिलर असलेल्या या वेबसीरिजमध्ये तेजस्विनी पंडित आणि प्राजक्ता माळी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. प्लॅनेट मराठी, अक्षय बर्दापूरकर प्रस्तुत रावण फ्युचर प्रॉडक्शन्स, अभिजित पानसे आणि अनिता पालांडे निर्मित ‘रानबाजार’ ही वेबसिरीज येत्या 20 मे पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी