स्वातंत्र्य भिकेनंच मिळालं; कंगना जे म्हणाली ते खरंय, विक्रम गोखलेंकडून समर्थन

बी टाऊन
भरत जाधव
Updated Nov 14, 2021 | 15:59 IST

Kangana Ranaut Statement : कंगनानंतर आता ज्येष्ठ अभिनेते (Veteran actor) विक्रम गोखलेही (Vikram Gokhale) वादात अडकण्याची शक्यता आहे. कारण कंगनाच्या वादग्रस्त (Controversial) विधानावर त्यांनी समर्थन दिले आहे.

 What Kangana said is true, support from Vikram Gokhale
विक्रम गोखलेंही म्हणाताय हो, भीकेतूनच मिळालं स्वातंत्र्य   |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • विक्रम गोखलेंही म्हणाताय हो, भीकेतूनच मिळालं स्वातंत्र्य
  • देश कधीही हिरवा होणार नाही, हा देश भगवा राहिला पाहिजे - अभिनेते विक्रम गोखले.
  • ७५ व्या वाढदिवसानिमित्त ब्राह्मण महासंघाच्या वतीने ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचा सन्मान.

Kangana Ranaut Statement :  मुंबई : कंगनानंतर आता ज्येष्ठ अभिनेते (Veteran actor) विक्रम गोखलेही (Vikram Gokhale) वादात अडकण्याची शक्यता आहे. कारण कंगनाच्या वादग्रस्त (Controversial) विधानावर त्यांनी समर्थन दिले आहे. दोन-तीन दिवसापूर्वी अभिनेत्री कंगना रनौतने (Actress Kangana Ranaut) भारताच्या स्वातंत्र्याविषयी एक वादग्रस्त विधान केलं होतं. यावरुन मोठा वाद झाला होता, अनेकांना कंगनावर टीका केली गेली होती. 1947 साली देशाला मिळालेलं स्वातंत्र्य म्हणजे भीक होती असं कंगना म्हणाली होती.

कंगनाच्या त्याच वक्तव्याचं विक्रम गोखले यांनी समर्थन केलं. ७५ व्या वाढदिवसानिमित्त ब्राह्मण महासंघाच्या वतीने ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना गोखलेंनी हे विधान केले. यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान मोदींचं कौतुक केलं. शिवाय  शिवसेना आणि भाजप एकत्र आल्यास बरं होईल असंही ते म्हणाले. 

विक्रम गोखलेंच्या या पाठिंब्यामुळे वक्तव्याच्या वादात भर पडण्याची शक्यता आहे. विक्रम गोखले यावेळी म्हणाले की, कंगना जे म्हणाली ते खरंय, मी समर्थन करतो त्या वक्तव्याचे, कुणाच्याही मदतीने स्वातंत्र्य मिळाले नाही, ते भिकेनेच मिळाले आहे. आपले स्वातंत्रवीर जेव्हा फाशीवर जात होते तेव्हा फाशीपासून त्यांना कोणी वाचवलं नाही अनेकजण बघत राहिले, असा गंभीर आरोप विक्रम गोखले यांनी यावेळी केला. यावेळी बोलताना कंगनाच्या वक्तव्याला पाठिंबा दर्शवत देश कधीही हिरवा होणार नाही, हा देश भगवा राहिला पाहिजे, असं वक्तव्य गोखले यांनी केलं.

बाबरपासून इतिहास का सांगितला जातो

राजकीय वर्तुळात परिस्थिती गंभीर झालेली आहे, कोणाची नावं घेत नाही. ब्राह्मण समाजवरती टीकेची झोड उठवणे, मराठा आणि ब्रह्मणांमध्ये मतभेद निर्माण करणे काय चाललंय हे? कुणबी, क्षत्रिय हे सर्व माझे आहेत. दलितांना दलित म्हणणे मला पटत नाही. देशाचा इतिहास बाबरापासून सुरु होतो तो आणि छापला जातो हे दुर्देव आहे. बाबरापूर्वी कोणी नव्हते का? या देशाकरिता झटणारा हा माझा मुसलमान आहे, त्यात मी भेदाभेद करत नाही. माझ्या दृष्टीने बाबासाहेब या देशाला कळले नाहीत, आंबेडकर मोठे व्यक्तिमत्त्व होते. त्यांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही.


देश कधीही हिरवा होणार नाही -

लाल बहादूर शास्त्री सोडून आतापर्यंत देशातील सर्व पंतप्रधानांना मी शंभराच्या खाली गुण देतो. पण त्यांची जयंती ही 2 ऑक्टोबर ला येते ती हेतुपुरस्सर पुसली जाते. त्याचा विसर पाडला जातो. किती वर्षे कारस्थान आहे? हा देश कधीही हिरवा होणार नाही हा देश भगवा राहिला पाहिजे. असं वक्तव्य गोखले यांनी केलं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी