GoodBye 2021,Bollywood actress and bikini lokks: मुंबई : बॉलिवूड अभिनेत्रींचे व्हेकशन लूक वर्षभर चर्चेत होते. व्हेकेशन डेस्टिनेशन मालदीवमध्ये जाऊन केलेली धमाल आणि निळ्याशार समुद्रावर बिकीनीमध्ये काढलेले फोटो यंदा वर्षभर सोशल मीडियावर धुमाकूळ घालत होते.
दिशा पटानी ( Disha Patani ) टू पीसमध्ये अनेक वेळा बिकीनी लूकमध्ये दिसली. तिच्या बिकिनीमधील फोटोंनी 2021 मध्ये सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. तिच्या या लूक्सने चाहते पुरते घायाळ झाले. विशेषत: लाल रंगाच्या बिकिनीमधली दिशाची ही स्टाईल काही औरच होती. हा फोटो दिशाने मालदीव व्हेकेशन दरम्यान शेअर केला होता.
सध्या खूप चर्चेत असलेली अभिनेत्री आलिया भटसुद्धा (Alia bhat ) मालदीव व्हेकेशन दरम्यान बिकीनी लूकमध्ये दिसली. तिची ती अदा साऱ्यांनाच भुरळ घालणारी होती.
मालदीवच्या सुट्टीत पिवळ्या बिकिनीतील कियारा अडवाणीचा (Kiara Advani) हा लूक प्रचंड व्हायरल झाला होता. डोक्यावर टोपी घातलेली कियाराची कातिल अदा म्हणजे व्वा क्या बात है अशीच होती. तिची स्टनिंग टोन्ड फिगर बिकिनीमध्ये दिसत होती.
अनुष्का शर्माचा (Anushka Sharma) पूलमध्ये आराम करतानाचा हा फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे. निऑन ग्रीन मोनोकिनीमध्ये आई झाल्यानंतरची अनुष्काची ही स्टाईल तिच्या चाहत्यांना आवडली होती.
जेव्हा जेव्हा प्रियांका चोप्राला ( Priyanka chopra ) कामातून ब्रेक मिळाला, तेव्हा तिने ही सुट्टी एन्जॉय केली. तेव्हा तिच्या बिकिनी लूकने चाहत्यांच्या हृदयाचा ठोका चुकवला.
या वर्षी जान्हवी कपूरनेही (Janhvi Kapoor) मोनोकिनी परिधान केलेले फोटो सोशल मीडियावर शेअर केले, तिचे हे फोटोज म्हणजे जान्हवी कपूरच्या चाहत्यांसाठी आश्चर्यांचा सुखद धक्का होते. सिल्व्हर स्लीव्हलेस मोनोकिनीमध्ये तिचा जबरदस्त लूक पाहायला मिळाला.
सारा अली खान (Sara Ali Khan) वर्षभरात अनेक वेळा मालदीवमध्ये गेली आणि तिने आपल्या बिकिनी फोटोंनी सर्वांना थक्क केले. कधी निऑन ग्रीन तर कधी ऑरेंज स्विमसूटमध्ये साराने आपला जलवा दाखवला.
अनन्या पांडे (Ananya Panday) ही बीच व्हॅकेशन अँडिक्ट असल्याचं म्हटलं जातं. फ्लोरल बिकिनीमध्ये तिने मालदीवमध्ये जाऊन अनेक फोटो क्लिक केले जे व्हायरल झाले.