Bollywood Actresses Ramp Walk: तुम्ही बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री (Actress) आणि मॉडेल्सना अनेकदा फॅशन शो (Fashion Show) आणि कार्यक्रमांमध्ये स्टेजवर रॅम्प वॉक (Ramp Walk) करताना पाहिलं असेल. जेव्हा अभिनेत्री स्टेजवर डिझायनर ड्रेस आणि हाय हिल्स घालून रॅम्पवर चालतात तेव्हा सर्वांच्या नजरा त्यांच्याकडेच असतात. पण अशावेळी रॅम्प वॉक करताना अनेकदा अभिनेत्रींना Oops Moment ला बळी पडावे लागतं. बॉलिवूडमधील अनेक नामवंत अभिनेत्री या स्टेजवरील Oops Moment मुळे खूप चर्चेत होत्या.
2014 मध्ये लाइफस्टाइल इंडिया फॅशन वीकच्या ग्रँड फिनालेमध्ये बॉलिवूड क्वीन कंगना रणौत डिझायनर नम्रता जोशीपुरासाठी शोस्टॉपर बनली होती. याच दरम्यान रॅम्पवर चालत असताना ती अचानक स्टेजवर पडली होती. ही घटना कंगनासाठी सर्वात मोठी Oops Moment होती.
यामी गौतम
लॅक्मे फॅशन शोमध्ये आपले सौंदर्य दाखवताना यामी गौतम सोबतही असंच काहीसं घडलं होतं. कारण यावेळी रॅम्प वॉक करताना यामीचा तोल जाऊन ती स्टेजवर पडली होती. यामी गौतमच्या या Oops Moment चा फोटो-व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.
अधिक वाचा: Janhvi Kapoor Oops Moment: जान्हवी कपूर ठरली Oops मोमेंटची शिकार, ड्रेसने केला घात
सोना महापात्रा
या यादीत गायिका सोना महापात्राच्या नावाचाही समावेश आहे. 2013 मध्ये लॅक्मे फॅशन वीकमध्ये सोनाने रॅम्प वॉक सुरू करताच ती काही वेळाने घसरली. ड्रेस टाचांमध्ये अडकल्याने हा अपघात झाला होता. या Oops Moment मुळे सोना त्यावेळी खूप ट्रोलही झाली होती.
अधिक वाचा: Bold Photos: टीव्हीवरची संस्कारी बहू झाली टॉपलेस, अंगावर घातलेय फक्त एक गुलाब
पूनम ढिल्लन
पूनम ढिल्लन ही चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री असून ती अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या फॅशन शोमध्ये रॅम्प वॉक करते. पण 2014 मध्ये जेव्हा पूनमने विक्रम फडणवीस याच्या फॅशन शोसाठी रॅम्प वॉक केला होता तेव्हा ती अचानक स्टेजवर कोसळली होती. यावेळी पूनमने साडी नेसली होती.
सोनाक्षी सिन्हा
आपल्या सौंदर्याने अनेकांना घायाळ करणारी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाही ही देखील Oops Moment ची शिकार झाली होती. 2010 मध्ये, सोनाक्षी बंगलोरमधील ब्लेंडर्स प्राइड फॅशनमध्ये शोस्टॉपर होती. सोनाक्षीने प्रसिद्ध फॅशन डिझायनर गोविन सी. मिगेलचा गाऊन परिधान करून रॅम्प वॉक केला होता. मात्र, तिला स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नव्हते आणि ती अचानक खाली पडली होती.
अधिक वाचा: OOPS मूमेंट अन् अभिनेत्री शिल्पा शेट्टी
या अभिनेत्रींशिवाय अनेक बॉलिवूड अभिनेत्री आणि फॅशन मॉडेल्स रॅम्प वॉक करताना अडखळल्या आहेत. अनेकवेळा इव्हेंट्सच्या रेड कार्पेटवरही अभिनेत्रींना Oops Moment ला मुळे ट्रोल झाल्या होत्या.