Star kids Education : बॉलिवूड स्टार किड्स अनेकदा त्यांच्या लुक्स आणि अभिनयामुळे चर्चेत असतात. मात्र, याउलट आज आम्ही तुम्हाला बॉलिवूडच्या अशाच काही स्टार किड्सबद्दल सांगणार आहोत जे अभ्यासात पुढे आहेत. अशाच काही स्टार किड्सवर एक नजर टाकूया
मीडिया रिपोर्ट्सनुसार,सारा अली खानने (Sara Ali Khan) न्यूयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठातून बॅचलर ऑफ हिस्ट्री आणि पॉलिटिकल सायन्समध्ये पदवी घेतली आहे.
साराने २०१८ मध्ये केदारनाथ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
अधिक वाचा : अलिशान गाड्या राहूनही मूसेवालाला आवडायचा HMT5911 ट्र्रॅक्टर
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानही (Aryan Khan) उच्च शिक्षित आहे. बातम्यांनुसार, आर्यन खानला फिल्ममेकर बनायचे आहे. आर्यनने युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियामधून बॅचलर ऑफ फाइन आर्ट, सिनेमॅटिक आर्ट्स, फिल्म आणि टेलिव्हिजन प्रोडक्शनमध्ये पदवी प्राप्त केली आहे.
सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानबद्दल (Ibrahim Ali Khan) सांगायचे तर, त्यानेही लंडनमध्ये राहून उच्च शिक्षण घेतले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इब्राहिम चित्रपट निर्माता करण जोहरच्या रॉकी और रानी की प्रेम कहानीमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत आहे.
श्रीदेवीची मोठी मुलगी जान्हवी कपूरही उच्च शिक्षित आहे. अभिनेत्रीने लॉस एंजेलिसमधील ली स्ट्रासबर्ग थिएटर आणि फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये फिल्म मेकिंग कोर्स केला आहे. चित्रपट निर्माता करण जोहर निर्मित 'धडक' चित्रपटातून जान्हवीने पदार्पण केले होते.
अभिनेत्री अनन्या पांडेने युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्निया, लॉस एंजेलिसमधून पत्रकारितेत पदवी मिळवण्यासाठी प्रवेश घेतला. मात्र, कोर्स संपण्यापूर्वीच तिला 'स्टुडंट ऑफ द इयर 2' ऑफर करण्यात आला.