Bollywood Actresses faced miscarriage : मुंबई : तुम्ही बॉलीवूडच्या अनेक अभिनेत्रींना (Bollywood Actresses) चित्रपटांमध्ये अनेक संकटांचा सामना करताना पाहिलं असेल. पण वास्तविक जीवनात त्यांना सर्वसामान्य महिलांप्रमाणेच (Women)अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या अभिनेत्रींना आपला लोकांसमोर वावर सहज ठेवत या गोष्टींना धैर्याने तोंड द्यावे लागते. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी आयुष्यातील सर्वात मोठे दुःख म्हणजे गर्भपात सहन केला आहे. आपल्या पोटात छोटासा जीव असणे ही एक सुंदर भावना आहे. मातृत्वाचा आनंद आणि जबाबदारी मोठी असते. बाळाच्या जाण्याने (Miscarriage) आईला सर्वात जास्त त्रास होतो. अनेक अभिनेत्रीही या वेदनातून गेल्या आहेत. चला तुम्हाला अशा अभिनेत्रींबद्दल सांगतो ज्यांचा गर्भपात (Actresses Suffered Miscarriage) झाला आहे. या यादीत शिल्पा शेट्टी कुंद्रा (Shilpa Shetty), गौरी खान (Gauri Khan) आणि काजोल (Kajol) यांचाही समावेश आहे. (From Shilpa Shetty to Kajol, many Bollywood actresses suffered from Miscarriage, see the list)
बॉलीवूडच्या अभिनेत्री (Bollywood Actresses) जरी ग्लॅमरस आयुष्य जगत असल्या तरी त्यादेखील एक माणूस, एक महिला असतात. सर्वसामान्य महिलेपेक्षा त्यांच्याकडे अधिक ताकद असली, सामर्थ्य असले तरी त्यामुळे त्यांच्या वाट्यादेखील एरवी महिला तोंड असलेल्या अनेक समस्या येत असतात. आपले व्यावसायिक आयुष्य, करियर, सार्वजनिक जीवनातील वावर सांभाळत या अभिनेत्रींना अशा दु:खद घटनांना खंबीरपणे तोंड देत त्यातून बाहेर पडावे लागते. अशाच काही अभिनेत्री ज्यांना गर्भपाताला सामोरे जावे लागले त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.
अधिक वाचा : Alia Bhatt, Ranbir Kapoor Wedding Gifts:रणबीर-आलियाच्या लग्नात सेलेब्सनी दिल्या करोडोंच्या भेटवस्तू
शिल्पा शेट्टी ही 2 मुलांची आई आहे. विवानच्या जन्मानंतर शिल्पाने दुसऱ्या बाळासाठी तयारी केली. पण तिचे अनेक गर्भपात झाले. तिला एका आजाराने ग्रासले होते, त्यामुळे तिचा गर्भपात होत होता. जेव्हा परिस्थिती ठीक होत नव्हती तेव्हा शिल्पाने पुन्हा सरोगसीद्वारे आई बनण्याचा विचार केला आणि ती मुलीची आई झाली.
काजोलने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, तिचे 2 गर्भपात झाले आहेत. 'कभी खुशी कभी गम' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ती गरोदर होती, मात्र तिचा गर्भपात झाला होता. यानंतर काजोलचा पुन्हा गर्भपात झाला. मात्र, नंतर ती न्यासा आणि त्यानंतर युगची आई झाली. आज तिचे कुटुंब परिपूर्ण आहे.
गौरी खान ही जरी स्वत: अभिनेत्री नसली तरी ती बॉलीवूडमधील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे. शाहरुख खान आणि गौरी खान यांना 3 मुले आहेत. मात्र, मोठा मुलगा आर्यन खानच्या जन्मापूर्वी गौरीचा गर्भपात झाला. गौरी आणि शाहरुखला त्यावेळी खूप त्रास झाला होता. आर्यनच्या जन्मानंतर दोघांनाही आई-वडील होण्याचा आनंद मिळाला. यानंतर त्यांच्या आयुष्यात सुहाना आणि अबराम आले.
गीता बसरा आणि हरभजन सिंग यांना दोन मुले आहेत. दुस-या मुलाच्या जन्मापूर्वी गीताचे 2 गर्भपात झाले होते. गर्भपातानंतर गीताने अनेक महिलांना याबाबत जागरुक आणि प्रेरित केले होते.
टीव्हीचा लोकप्रिय अभिनेता करण पटेलची पत्नी अंकिताच्या पहिल्या बाळाचा जन्म 2018 मध्ये होणार होता, पण त्याआधीच दोघांनीही बाळ गमावले. अभिनेत्रीचा गर्भपात झाला होता. या अपघातामुळे दोन्ही कलाकारांना मोठा धक्का बसला होता.