Neetu Kapoor: "जिथून त्यांचा प्रवास संपला, तिथूनच माझा सुरू झाला...;ऋषी कपूर यांच्या आठवनीने नीतू कपूर भावूक

बी टाऊन
Updated Apr 11, 2022 | 12:48 IST | टाइम्स नाऊ मराठी

Neetu Kapoor On Rishi Kapoor । वयाच्या ६३ व्या वर्षी देखील ज्येष्ठ अभिनेत्री नीतू कपूरच्या सौंदर्यात कोणतीही कमतरता नाही. जेव्हा तिला या सौंदर्याचे रहस्य विचारण्यात आले तेव्हा तिने हसून उत्तर दिले की, 'आता मी स्वतःबद्दल अधिक काळजी घेत आहे आणि माझ्या लूकसाठी अधिक वेळ देत आहे.' यासोबतच अभिनेत्रीने तिच्या टीव्ही डेब्यूबद्दल देखील भाष्य केले.

ऋषी कपूर यांच्या आठवनीने नीतू कपूर भावूक  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • नीतू कपूरने तिच्या टीव्ही पदार्पणाबाबत भाष्य केले.
  • नीतू कपूरसाठी हा शो खूप जवळचा आहे कारण या अभिनेत्रीने ३१ मार्च रोजी काम करण्यास सुरूवात केली होती.
  • रणबीर आलियाच्या नात्यावर आनंदी असल्याचे नीतू कपूरने म्हटले.

Neetu Kapoor On Rishi Kapoor । मुंबई : वयाच्या ६३व्या वर्षी देखील ज्येष्ठ अभिनेत्री नीतू कपूरच्या सौंदर्यात कोणतीही कमतरता नाही. जेव्हा तिला या सौंदर्याचे रहस्य विचारण्यात आले तेव्हा तिने हसून उत्तर दिले की, 'आता मी स्वतःबद्दल अधिक काळजी घेत आहे आणि माझ्या लूकसाठी अधिक वेळ देत आहे.' यासोबतच अभिनेत्रीने तिच्या टीव्ही डेब्यूबद्दल देखील भाष्य केले. ("From where his journey ended, that's where I started Neetu Kapoor is emotional with the memory of Rishi Kapoor). 

अधिक वाचा : राज्यातील काही ठिकाणी उकाडा तर काही ठिकाणी अवकाळी पाऊस

नीतू कपूरचे टीव्हीमध्ये पदार्पण 

"आयएएनएसशी संवाद साधताना नीतू कपूरने तिच्या 'डान्स दिवाने ज्युनिअर्स' मधून तिच्या टेलिव्हिजन मधील पदार्पणाच्या प्रवासाचा किस्सा शेअर केला. तिने म्हटले की, "मुलांचा शो असल्यामुळे निर्मात्यांनी माझ्याशी संपर्क साधला तेव्हा मी सुरूवातीला खूप उत्साही होते आणि माझे त्यांच्याशी एक विशेष नाते आहे. तसेच संपूर्ण टेलिव्हिजनचे जग माझ्यासाठी नवीन आहे हे ऐकून मी खरोखर खूप आनंदी होते."

अधिक वाचा : भाजपच्या 'या' आमदारावर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश

पती ऋषी कपूर बाबत केले भाष्य 

नीतू कपूर यांच्यासाठी हा शो खूप जवळचा आहे कारण या अभिनेत्रीने ३१ मार्च रोजी काम करण्यास सुरूवात केली होती. जेव्हा तिचे दिवंगत पती ऋषी कपूर यांचा शेवटचा चित्रपट 'शरमाजी नमकीन' प्रदर्शित झाला होता. यावर ती म्हणाली, "हे माझ्यासाठी भावनिकदृष्ट्या खूप आव्हानात्मक होते कारण ऋषीजींचा शेवटचा चित्रपट प्रदर्शित झाला त्याच दिवशी मी या शोचे शूटिंग सुरू केले. त्यांचा प्रवास संपला आणि तिथूनच माझा प्रवास सुरू झाला आहे हे खूप विचित्र आहे." 

रणबीर आलियाच्या नात्यावर आनंदी 

नीतू कपूरने तिच्या टेलिव्हिजन पदार्पणाबद्दल सांगितले की, "हे माझ्यासाठी खूप आव्हानात्मक आणि खूप नवीन आहे. त्याचप्रमाणे 'जुग जग जिओ' हे सुध्दा एक आव्हान होते. नुकतेच माझ्या पतीचे निधन झाल्यामुळे मी हा चित्रपट केला तेव्हा माझा आत्मविश्वास शून्य होता. पण हळहळू माझा आत्मविश्वास वाढत गेला. पहिला दिवस चांगला गेला नाही, पण दिवसेंदिवस माझा आत्मविश्वास वाढत गेला. नीतू कपूरने रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या नात्याबद्दल तिला समजल्यावर तिची प्रतिक्रिया काय होती हेही सांगितले आणि नीतूनेही यावर आनंद व्यक्त केला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी