नवी दिल्ली: सन 2001 मध्ये आलेला गदर चित्रपटाला चाहत्यांचे खूप प्रेम मिळाले होते. आता याच हिट गदर: एक प्रेम कथेच्या सीक्वलबरोबर मोठ्या पडद्यावर सनी देओल आणि अमिषा पटेल एकत्र दिसणार आहेत. गदर 2 चे शुटिंग सुरू झाले असून प्रेक्षकांना या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. दरम्यान या चित्रपटाच्या शुटिंगचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्याला पाहून चाहत्यांची या चित्रपटाच्या पहिल्या भागाची आठवण ताजी झाली.
अधिक वाचा : मुख्यमंत्री शिंदेंचा शरद पवार, राज ठाकरे, नाना पटोलेंना फोन
गदर 2 च्या सेटवर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पगडी घालून सनी देओल पठानी सूटमध्ये दिसून येत आहे. तर,अभिनेत्री अमिषा पटेल अभिनेत्याचा बाजूला एका खांब्याला बांधलेली दिसत आहे. या दोघांना खाकी वर्दीमध्ये असलेल्या सैनिकांनी हातात बंदुक घेऊन घेरलं आहे. या दृश्यामध्ये सनी देओलला राग येतो आणि या रागात त्याने स्वतःला सोडवण्यासाठी जमिनीत रोवलेला खांब उपसला आहे, हे दृश्य शुट केले जात असून या दृश्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत.
या व्हिडिओवर अनेक चाहत्यांनी कमेंट केली, व्हा. तर काही लोकांनी व्हिडिओ पाहून ओ माय गॅड अशी प्रतिक्रिया दिली आहे. मात्र याचा BTS व्हिडिओ ज्या व्यक्तीने शेअर केला त्याला एक चाहता म्हणाला की, हे बरोबर नाही आहे. सनी देओल यांच्या प्रयत्नांना पहा आणि चित्रपट रिलीज होण्यापूर्वी त्याचे लीक होणे खूपच निराशाजनक आहे. कृपया #Gadar2 टीम या चित्रपटाचे संरक्षण करावे. चित्रपट लीक होण्यावर बंधन आणावीत असं त्याने म्हटलं आहे.
अधिक वाचा :विद्यार्थ्यांच्या बसचा ब्रेक फेल, चालकांने मारली उडी
हे पहिल्यांदा नाहीये की, सनी देओलच्या चित्रपटाचा कोणता सीन लीक झाला असेल. याआधी पण चित्रपटाचा एक सीन व्हायरल करण्यात आला होता. त्या व्हायरल व्हिडिओचे चाहत्यांनी खूप कौतुकही केले होते. दुसरीकडे, जर आपण चित्रपटाबद्दल बोललो तर, नुकतेच गरदार 2 चे फर्स्ट लूक पोस्टर रिलीज करण्यात आले, ज्यामध्ये चित्रपटाची रिलीज डेट देखील समोर आली आहे.
अधिक वाचा : पटोलेंसोबत काम करणे अशक्य; थोरातांचं पक्षश्रेष्ठींना पत्र
11ऑगस्ट 2023 रोजी रिलीज होणार्या या चित्रपटात दिग्दर्शक अनिल शर्मा यांचा मुलगा आणि अभिनेता उत्कर्ष शर्मा देखील दिसणार आहे, ज्याने गदर एक प्रेम कथामध्ये सनी आणि अमिषाच्या मुलाची भूमिका केली होती.