Gadar 2 Story: गदर 2मध्ये दिसणार 1971च्या भारत-पाक युद्धाची कथा, सनी देओलची व्यक्तिरेखा 24 वर्षांच्या लीपनंतर घेणार हे वळण

बी टाऊन
Updated Jan 06, 2022 | 15:19 IST | टाइम्स नाऊ मराठी

Gadar 2 Story Sunny Deol, Amisha Patel: गदर चित्रपटाचा सिक्वेल असलेल्या गदर २ चे शूटिंग सुरु झाले आहे. या चित्रपटात सनी देओल ताराच्या भूमिकेत, अमिषा पटेल सकीनाच्या भूमिकेत आणि उत्कर्ष शर्मा जीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. जाणून घ्या कशी असेल गदर २ ची कथा.

Gadar 2 will feature the story of the 1971 Indo-Pak war
गदर 2 मध्ये दिसणार 1971 च्या भारत-पाक युद्धाची कथा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • गदरचा सिक्वेल गदर 2 चे शूटिंग सुरू झाले आहे.
  • गदर 2 ची कथा 1971 च्या भारत-पाक युद्धावर आधारित असेल.
  • यावेळी तारा सिंह आपला मुलगा जीतसाठी पाकिस्तानला जाणार आहेत.

Gadar 2 Story: सनी देओल, अमिषा पटेलचा ब्लॉकबस्टर सिनेमा गदरच्या सिक्वेलचे शूटिंग सुरू आहे. 2001 मध्ये आलेल्या या सिनेमाची कथा 1947 च्या भारत-पाकिस्तान फाळणीवर आधारित होती. आता गदर २ ची कथा समोर आली आहे. यावेळी गदरची कथा १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर असेल. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, गदर 2 ची कथा 24 वर्षे पुढे जाईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 1971 मध्ये भारत आणि पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर सिनेमाची कथा आधारित आहे. गदरच्या पहिल्या भागात तारा तिची पत्नी सकीनाला परत आणण्यासाठी पाकिस्तानला जातो. यावेळी तो मुलगा जीतला वाचवण्यासाठी पाकिस्तानला जाणार आहे. रिपोर्ट्सनुसार, चित्रपटात वडील आणि मुलाचे नाते दाखवण्यात येणार आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागात ज्या स्टाईलमध्ये तारा सिंग दिसला होता त्याच स्टाईलमध्ये चित्रपटात दिसणार आहे.

EXCLUSIVE: Sunny Deol’s Gadar 2 set against the backdrop of 1971 Indo Pak War; Story takes a 24 years leap

गदर 2 ची स्टोरी

सूत्रांच्या माहितीनुसार, “एक पिता आपल्या मुलासाठी काय करू शकतो हे चित्रपटात दाखवले जाईल. खरं तर, तो आपल्या मुलाच्या आनंदासाठी देशाच्या सीमासुद्धा ओलांडू शकतो. गदर २ ची तीच कथा आहे. या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये सनी देओल तारा सिंग आणि अमिषा पटेल यांची भूमिका साकारणार आहे. त्याचबरोबर आता मोठा झालेल्या जीतच्या भूमिकेत उत्कर्ष शर्मा दिसणार आहे. उत्कर्ष शर्मा चित्रपटाची कथा पुढे नेणार आहे. हा चित्रपट खर्‍या अर्थाने सिक्वेल असणार आहे.

EXCLUSIVE: Anil Sharma on Gadar 2 with Sunny Deol: ‘Tara Singh is like Superman, soft at heart but powerful’

चित्रपटाची विक्री होत नव्हती

बॉलीवूडच्या सर्वात आयकॉनिक आणि सुपरहिट चित्रपटांच्या यादीत समाविष्ट असलेल्या गदरने बॉक्स ऑफिसवर व्यवसायाच्या बाबतीत विक्रम केले होते. भारत पाकिस्तानच्या पार्श्वभूमीवर घडलेली प्रेमकथा या चित्रपटात ठळकपणे दाखवण्यात आली होती. चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी एका मुलाखतीत सांगितले की, 'आम्ही 50 पेक्षा जास्त ट्रायल्स केले पण, चित्रपटाची विक्री होत नव्हती. हक्क विकत घेतलेल्या एका वितरकाने पहिल्या चाचणीनंतर सांगितले, माझे पैसे परत करा, मला हा चित्रपट नको आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी