Actress Kajol rejected Gadar movie: अभिनेता सनी देओल आणि अभिनेत्री अमिषा पटेल यांचा ब्लॉकब्टर सिनेमा 'गदर - एक प्रेम कथा' ने सर्वांचीच मने जिंकली. या सिनेमाची कथा, अभिनय हे प्रेक्षकांना खूप आवडले. या सिनेमाचा दुसरा पार्टही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची प्रेक्षक आतूरतेने वाट पाहत आहेत. 'गदर - एक प्रेम कथा' या सिनेमाचे निर्माते अनिल शर्मा यांनी या सिनेमाच्या संदर्भात एक मोठा खुलासा काही दिवसांपूर्वी केला. या सिनेमातील सकिनाची भूमिका सर्वप्रथम अभिनेत्री काजल हिला देण्याचा निर्णय झाला होता. मात्र, काजलने हा सिनेमा करण्यास नकार दिला.
अनिल शर्मा यांनी म्हटलं की, त्यांना कुणाचंही नाव घ्यायचं नाहीये मात्र, बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींनी कोणत्या ना कोणत्या कारणाने हा सिनेमा करण्यास नकार दिला होता. तर काहींना वाटले की, हा सिनेमा खूपच जुन्या काळातला आहे. तर काहींनी सनी देओल आपल्यासोबतचा नसल्याचं सांगत सिनेमात भूमिका करण्यास नकार दिला होता.
हे पण वाचा : जुळी मुलं होण्याची ही आहेत लक्षणे
अनिल शर्मा यांना जेव्हा विचारण्यात आले की, सकिनाच्या भूमिकेसाठी काजल सोबत संपर्क करण्यात आला होता का? यावर उत्तर देत सिने निर्माते अनिल शर्मा यांनी म्हटलं की, मला कोणाचंही नाव घ्यायचं नाहीये. हे योग्य नाहीये. मीडिया कोणाचेही नाव घेण्यास मोकळे आहेत. मात्र, त्यावेळच्या आघाडीच्या अभिनेत्रींसोबत आम्ही संपर्क केला होता. काहींना वाटले की, आम्ही ट्रेंडी नाहीयेत. इतकंच नाही तर काहींनी सिनेमाची कथा सुद्धा ऐकली नाही.
हे पण वाचा : सात दिवसात व्हा आयर्न मॅन, फक्त करावं लागेल हे डाएट
अनिल शर्मा यांनी पुढे म्हटलं की, आमच्या सिनेमाची कथा ऐकलेल्या काही अभिनेत्रींना वाटले की हा एक ड्रामा सिनेमा आहे आणि त्यामुळे या सिनेमात काम करणं योग्य नाही. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चालणार नाही असेही त्यांना वाटलं होतं. त्या काळात सर्वांना परदेशात शूटिंग करायला आवडत होते आणि त्यामुळेच अनेकांनी सिनेमात भूमिका करण्यास नकार दिला होता.