Viral Photo: Money Heist मधल्या स्टॉकहोमच्या घरी 'गणपती बाप्पा, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

Viral Photo: Money Heist मनी हाइस्ट या वेबसीरिजने जगभरात खूप प्रसिद्धी मिळवली आहे. टोकियो, स्टॉकहोम, रियो, हेलसिंकी यासारख्या पात्रांनी प्रेक्षकांना आपलंस केलं होतं. आणि आता पुन्हा एकदा स्टॉकहोम हे पात्र चर्चेत आले आहे. कारण, स्टॉकहोम अर्थातच इस्टर एचिबोचीच्या घरी गणपती बाप्पाचा फोटो व्हायरल झाला आहे.

Ganpati Bappa at the Money Heist Stockholm home
स्टॉकहोमच्या घरी गणपती बाप्पाचे पोस्टर  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • स्टॉकहोमच्या घरी गणपती बाप्पाचं पोस्टर
  • स्टॉकहोम मनी हाइस्टमधील गाजलेले पात्र आहे.
  • व्हायरल फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव

Viral Photo: Money Heist : मनी हाईस्ट  (Money Heist)  या वेबसीरिजने जगभरात प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. भारतातही ही वेबसीरिज चांगलीच गाजली होती. दोन महिन्यांपूर्वीच या सीरिजचा शेवटचा भाग रिलीज झाला होता. मूळच्या स्पॅनिश भाषेतल्या या सीरिजनं प्रेक्षकांच्या मनावर गारुड केलं होतं. या वेबसीरिजने भारतीय फॅन्सना अक्षरश: वेड लावलं होतं. वेबसीरिजमधल्या पात्रांनी प्रेक्षकांना आपलं केलं होतं. टोकियो, स्टॉकहोम, रियो, हेलसिंकी या पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं. आणि आता पुन्हा एकदा यातल्या स्टॉकहोम या पात्राची चर्चा सुरु झाली आहे. त्याचं कारण म्हणजे या स्टॉकहोमच्या घरी चाहत्यांना गणपती बाप्पाचा फोटो पाहायला मिळाला. 

वेब सीरिजमधील स्टॉकहोम आणि खऱ्या आयुष्यातली इस्टरची (Ester Acebos)  चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. इस्टरच्या घरातील गणपती बाप्पाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.  घरातील गणपतीच्या फोटोसमोर स्टॉकहोम उभी असल्याचं या फोटोंमध्ये दिसत आहे. तिच्या या व्हायरल फोटोंवर चाहत्यांनीही कमेंट्सचा वर्षावर केला आहे. 

घरातील हिंदू देवतेचा फोटो पाहून अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी एस्थरचे कौतुक केले. “भारतासाठी अभिमानाचा क्षण,” एका नेटिझनने टिप्पणी केली. “स्पेनमध्ये भारतीय संस्कृतीचे सुंदर प्रदर्शन केल्याबद्दल धन्यवाद,” दुसर्‍याने लिहिले.

"भारतासाठी अभिमानाचा क्षण आहे स्पॅनिश अभिनेत्री @EstherAcebo तिच्या @netflix मालिका #MoneyHeist मधील मोनिका गॅझटाम्बाइड उर्फ ​​#Stockholm च्या भूमिकेसाठी आंतरराष्ट्रीय कीर्तीसाठी. तिच्या एका व्हिडिओमध्ये तिच्या घरी #गणेशा.

"यापूर्वी आणखी एक 'मनी हाईस्ट' अभिनेत्री, इट्झियार इटुनो मार्टिनेझ, तिने वेब सीरिजमध्ये इन्स्पेक्टर रॅकेल मुरिलो उर्फ ​​लिस्बनची भूमिका साकारली होती, तिने सलमान खान आणि सुष्मिता सेन यांच्या 90 च्या दशकातील लोकप्रिय ट्रॅक चुनरी चुनारी या चित्रपटाच्या सादरीकरणाने प्रेक्षकांचे मन जिंकले होते.


इस्टर (Ester Acebos)  ही एक स्पॅनिश अभिनेत्री आहे. मनी हाईस्टनंतर  (Money Heist)  तिची लोकप्रियता अफाट वाढली आहे. तिला अनेक सिनेमांच्या ऑफरसुद्धा आली आहे. इस्टरने (Ester Acebos) सुरुवातीला नाटक आणि जाहिरातींमध्ये काम केलं होतं. उत्कंठा वाढवणारे कथानक, वेगवान घडामोडी, पात्रांची भावनिक गुंतागुंत यामुळे या सीरिजने खूप लोकप्रियता मिळवली होती. प्रेक्षक या सीरिजच्या शेवटच्या भागाचीही आतुरतेने वाट पाहात होते. सोशल मीडियावर इस्टरच्या घरात गणपती बाप्पाचं पोस्टर असल्याचा फोटो व्हायरल झाला आणि पुन्हा एकदा मनी हाइस्टची (Money Heist)  स्टॉकहोम सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी