Aryan khan: मुलासाठी गौरी खानने नवरात्रीत केलेय हे व्रत, सोडल्या या गोष्टी, मुलासाठी करत आहे प्रार्थना

बी टाऊन
Updated Oct 15, 2021 | 15:26 IST | टाइम्स नाऊ मराठी

मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणात शाहरूख खाननचा मुलगा आर्यन खानच्या जामीन याचिकेवर गुरूवारी सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला. त्यामुळे आर्यनला आता कमीत कमी २० ऑक्टोबरपर्यंत जेलमध्ये राहावे लागेल. 

aryan khan
मुलासाठी गौरी खानने नवरात्रीत केलेय हे व्रत 
थोडं पण कामाचं
  • शाहरूख आणि गौरी दिवसेंदिवस चिंतेत आहेत.
  • आर्यनसाठी गौरी खानने प्रार्थना केली आहे.
  • नवरात्रीचा उत्सव सुरू झाल्यानंतर तिने गोड पदार्थ खाणे सोडून दिले आहे. 

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मन्नतची इमारत उदास आहे. शाहरूख खान (Shahrukh Khan ) आणि गौरी खान  (Gauri Khan)दोघेही आपापल्या फोनमध्ये व्यस्त आहे. संपूर्ण दिवस कायदेतज्ञ आणि जवळच्या मित्रपरिवाराशी गप्पा मारत आहेत. आर्यनला (Aryan Khan)  सुरूवातीला काही काळासाठी ताब्यात घेण्यात आले होते. मात्र आता ही लढाई त्याचे वकील आणि नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो यांच्यात बदलली आहे. 

यातच शाहरूख खानच्या फॅमिली फ्रेंडने म्हटलेय की गौरी खानने आर्यनच्या सुटकेसाठी एक प्रार्थना केली आणि नवरात्रीदरम्यान साखर आणि गोड पदार्थ खाण्याचे टाळत प्रार्थना करत आहे. 

मुलासाठी गोड खाणे सोडले

मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणात शाहरूख खाननचा मुलगा आर्यन खानच्या जामीन याचिकेवर गुरूवारी सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला. त्यामुळे आर्यनला आता कमीत कमी २० ऑक्टोबरपर्यंत जेलमध्ये राहावे लागेल. 

एका कुटुंबियाच्या मित्रांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की शाहरूख आणि गौरी दिवसेंदिवस चिंतेत आहेत. आर्यनसाठी गौरी खानने प्रार्थना केली आहे. नवरात्रीचा उत्सव सुरू झाल्यानंतर तिने गोड पदार्थ खाणे सोडून दिले आहे. 

शाहरूख खानने आपल्या सेलिब्रिटी मित्रांनाही सतत मन्नतवर न येण्यास सांगितले आहे. मन्नतमध्ये तीन वेळा पाहिला गेलेला एकमेव चेहरा म्हणजे सलमान खान. सलमान शाहरूखला पूर्णपणे पाठिंबा देत आहे. 

ज्या क्रूझवर ही कारवाई करण्यात आली ते क्रूझ जहाज मुंबईहून गोव्याकडे जात होते. माध्यमांच्या वृत्तानुसार, ताब्यात घेतलेल्यांपैकी दोघे हरियाणा आणि दिल्लीतील ड्रग तस्कर आहेत. प्रत्येक व्यक्तीने या पार्टीत प्रवेशासाठी 80 हजार रुपयांपेक्षा जास्त फी भरली होती. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबई किनारपट्टीवर शनिवारी रात्री झालेल्या रेव्ह पार्टीच्या संदर्भात एनसीबी आर्यन खानची चौकशी करत आहे. एनसीबीने आर्यन खानचा फोन जप्त केला असून अधिकाऱ्यांकडून त्याची तपासणी केली जात आहे. एनसीबी जप्त केलेल्या फोनवरून चॅट्सचा तपास करत आहे. तसेच क्रूझवरून ताब्यात घेण्यात आलेल्या सर्वांचे मोबाईल फोनही जप्त करण्यात आले आहेत आणि सर्व तपशील देखील तपासले जात आहेत.

मुंबई सोडल्यानंतर जहाज समुद्राच्या मध्यभागी पोहोचताच रेव्ह पार्टी सुरू झाली. यानंतर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली. एनसीबीने सात तास तपास करत बॉलिवूड कलाकाराच्या मुलासह 12 लोकांना ताब्यात घेतले आहे. त्यानंतर सर्वांना मुंबईत आणण्यात आले. सात तासांच्या छाप्यादरम्यान एनसीबीच्या अधिकाऱ्यांना चार प्रकारचे ड्रग्स सापडली आहेत. यामध्ये एमडीएमए, मेफेड्रोन, कोकेन आणि चरस यांचा समावेश आहे. सात तासांच्या छाप्यादरम्यान एनसीबीच्या अधिकाऱ्यांना चार प्रकारचे ड्रग्स सापडली आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी