Gauri Khan : "... यापेक्षा वाईट काहीच असू शकत नाही", आर्यन खानच्या अटकेनंतर गौरी खानने तोडलं मौन

बी टाऊन
Updated Sep 22, 2022 | 15:31 IST | टाइम्स नाऊ मराठी

Gauri Khan :'कॉफी विथ करण 7'(Koffee with Karan 7) च्या यंदाच्या एपिसोडमध्ये गौरी खानने (Gauri Khan) हजेरी लावली आहे. यावेळी गौरी खानचे नाव न घेता आर्यनच्या (Aryan Khan)ड्रग्ज प्रकरणावर करण जोहरने वक्तव्य केले आहे. गौरी खानच्या मते, "ज्या परिस्थितीतून आम्ही गेलो आहोत त्यापेक्षा वाईट काहीही असू शकत नाही." यावेळी गौरीने तिच्या चाहत्यांचे आणि बॉलिवूडमधील मित्रांचेही आभार मानले.

Gauri Khan talks about Aryan Kahn in the Koffee with Karan show
"..यापेक्षा वाईट काहीच असू शकत नाही"असं का म्हणाली गौरी खान?  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आर्यन खानच्या अटकेनंतर गौरी खानने तोडलं मौन
  • "... यापेक्षा वाईट काहीच असू शकत नाही"- गौरी खान
  • गौरी खानसह महीप कपूर आणि भावना पांडेचीही उपस्थिती

Gauri Khan : शाहरुख खान (Shahrukh khan) आणि गौरी खानचा (Gauri Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) गेल्या वर्षी खूप चर्चेत होता. आर्यनला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती. ऑक्टोबर 2021 मध्ये आर्यनच्या अटकेनंतर मोठा वाद निर्माण झाला होता. बऱ्याच अडचणींनंतर आर्यन खानला जामीन मिळाला. (Gauri Khan talks about Aryan Kahn in the Koffee with Karan show)

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Karan Johar (@karanjohar)

गौरी खान करण जोहरच्या शो 'कॉफी विथ करण 7'मध्ये हजेरी लावली. यावेळी चंकी पांडेची पत्नी भावना पांडे आणि संजय कपूरची पत्नी महीप कपूरही होती.भावना पांडे आणि महीप कपूर दोघींनीही नेटफ्लिक्स शो Fabulous Lives of Bollywood Wives मध्ये दिसल्या होत्या. यावेळी शोमध्ये आर्यन खानचे नाव न घेता करण जोहरने या प्रकरणाबद्दल प्रश्न विचारले. यावेळी करण म्हणाला, "तो काळ खूप कठीण होता. आणि तुम्ही सर्वजण यातून अधिक ताकदीने बाहेर आलात. मला माहित आहे की तू आई आहेस. आपण सारे एकाच कुटुंबाचा भाग आहोत. हे इतकं सहज सोप नक्कीचं नव्हतं. गौरी, यावेळी तू खूप ताकदीने, सहनशीलतेने सगळं काही निभावलं आहेस" असं म्हणायलाही करण विसरला नाही. 

अधिक वाचा : 'हे' सेलिब्रिटी बिग बॉसच्या घरात नशीब आजमावणार?

करण जोहरला उत्तर देताना गौरीने पहिल्यांदा आर्यन खानच्या अटकेबाबत मौन तोडले . ती म्हणाली, "आम्ही ज्या परिस्थितीतून गेलो आहोत त्यापेक्षा वाईट काहीही असू शकत नाही. पण एक कुटुंब म्हणून आम्ही कायम एकत्र आहोत. आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. असे बरेच फॅन्स, लोकं आहेत ज्यांना आम्ही ओळखतही नाही. आम्हाल खूप मेसेजेस आले, खूप प्रेम दिलं. आम्हाला मदत करणाऱ्या प्रत्येकाची मी आभारी आहे. " हे सांगायलाही गौरी खान विसरली नाही. 

अधिक वाचा : नवरात्रीत केल्या जाणाऱ्या उपवासाचे आरोग्यासाठीचे फायदे

आर्यन खानविरोधात पुरावे सापडले नाहीत

आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर त्याला कोठडीत ठेवण्यात आले होते. आर्यनला आर्थर रोड तुरुंगात पाठवण्यात आले होते. शाहरुख खान आपल्या मुलाला जेलमध्ये जाऊन भेटला होता. 30 ऑक्टोबरला आर्यन खान घरी परतला होता.एनसीबीला आर्यनविरुद्ध ठोस पुरावे न मिळाल्याने स्टार किडची या प्रकरणातून सुटका झाली. काही दिवसांपूर्वीच आर्यन खान सोशल मीडियावर परतला आहे. बहिण सुहाना खान आणि भाऊ अब्राहम खानसोबतचा फोटो आर्यनने सोशल मीडियावर शेअर केला होता. एवढंच नाही तर एका फोटोशूटचे फोटोही आर्यनने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी