Gehraiyaan Teaser: दीपिका पदुकोणने 7 वर्षांनी लहान सिद्धांत चतुर्वेंदीसोबत दिला किसिंग सीन; जाणून घ्या कधी आणि कुठे रिलीज होणार शकुन बत्राचा गहराइयां.

बी टाऊन
Updated Dec 20, 2021 | 15:57 IST | टाइम्स नाऊ मराठी

Gehraiyaan Teaser: दीपिका पदुकोण, सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडे स्टारर शकुन बत्रा यांच्या सिनेमाच्या शीर्षकाची घोषणा करण्यात आली आहे. त्याचा टीझर रिलीज झाला आहे ज्यामध्ये दीपिकाचा हॉट अंदाज पाहायला मिळत आहे.

'Gehraiyaan' movie Teaser launched
दीपिका पदुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदी 'गेहराइयां'मध्ये  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • दीपिका पदुकोण, सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडे स्टारर सिनेमाच्या नावाची घोषणा.
  • या चित्रपटात दीपिका पदुकोणने किसिंग सीन दिला.
  • जाणून घ्या हा चित्रपट कधी आणि कुठे रिलीज होणार आहे.


Gehraiyaan Teaser launched: मुंबई:  बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण शकुन बत्राच्या सिनेमात काम करत आहे. ज्यात तिच्यासोबत सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडे दिसणार आहेत. सिनेमाच्या शूटिंगसाठी हे तिघे अनेकवेळा एकत्र दिसले होते. अखेर आज हे गुपित उघड करण्यात आले आहे.

सिनेमा कधी आणि कुठे रिलीज होणार?

अलीकडेच दीपिकाने चित्रपटाचा बीटीएस शेअर केला होता आणि सांगितले होते की 20 डिसेंबर 2021 रोजी म्हणजेच आज चित्रपटाशी संबंधित विशेष माहिती दिली जाणार आहे आणि आता चाहत्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. दीपिका पदुकोण, सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडे यांचा 'गहराइयां' हा सिनेमा 25 जानेवारी 2022 रोजी Amazon Prime वर रिलीज होणार आहे.


चित्रपटाच्या टीझरसोबतच त्याचे नाव आणि रिलीज डेटची माहिती देण्यात आली आहे. या टीझरमध्ये दीपिकाचा हॉट अंदाज पाहायला मिळत आहे. सिनेमात दीपिकाने स्वतःपेक्षा 7 वर्षांनी लहान असलेल्या सिद्धांतसोबत एक किसिंग सीन दिला आहे. दीपिका पदुकोण 35 वर्षांची आहे तर सिद्धांत 28 वर्षांचा असल्याची माहिती आहे. 


अभिनेत्री पहिल्यांदाच एकत्र काम करणार 

दीपिका पदुकोण आणि अनन्या पांडे पहिल्यांदाच एका चित्रपटात एकत्र काम करणार आहेत. चाहत्यांसाठी हे खूपच रोमांचक असणार आहे. याशिवाय दीपिका 83 सिनेमातही दिसणार आहे. हा सिनेमा 24 डिसेंबरला रिलीज होणार असून दीपिका सध्या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याशिवाय अनन्याबद्दल बोलायचे तर ती विजय देवरकोंडासोबत लिगर चित्रपटात दिसणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी