मुंबई : भारतीय सिनेमामध्ये अशी अनेक कुटुंबं आहेत, की ज्यांच्यात दिग्गज अभिनेता-अभिनेत्रींचा समावेश आहे. याच साखळीत अजून एक कुटुंब समोर आले आहे. फादर्स डे जवळ आला असताना एका मुलीने आपल्या वडिलांबाबात खूपच ह्रद्यस्पर्शी गोष्ट बोलून दाखवली आहे. तिचे वडिल पहिल्यांदाच ओटिटीवर भूमिका करणार आहेत, आणि ती स्वतःसुद्धा त्यांच्यासह स्क्रीन शेअर करणार आहे. (girl made an emotional post for Bowman Irani, who is making his debut on OTT)
90 च्या दशकातील अभिनेता दीपक तिजोरीची मुलगी समारा तिजोरी हिची आगामी वेब सीरीज 'मासूम' चे ट्रेलर रिलीज झाले आहे. यापूर्वी समाराने अभिषेक बच्चनसोबत बॉब बिस्वासमध्ये काम केले होते. आता ती बॉलीवुडचे प्रख्यात अभिनेते बोमन ईरानी यांच्यासह डिज्नी+हॉटस्टारची सीरीज 'मासूम' मध्ये दिसणार आहे.
या वेब सीरीजचा ट्रेलर सस्पेंसने भरलेला आहे. यात एका कुटुंबाची कथा आहे. यातून समोर येते, की एक वाईट भूतकाळ कशा पद्धतीने एका चिमुकल्याचे आयुष्य आणि विचारांना पूर्णत: कलाटणी देतो. मंजिरी फडणीसने बोमन ईरानी यांच्यासह भूमिका साकारली आहे. तिने वडिल आणि मुलीच्या अनमोल नात्याबाबत स्वदेशी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'कू'वर लिहिले आहे:
"ऑनस्क्रीन डैड ❤️ के साथ काम करने से बेहतर और क्या हो सकता है
#HotstarSpecials #Masoom । 17 जून से सभी एपिसोड्स स्ट्रीम हो रहे हैं सिर्फ #disneyplushotstar पर"
हॉटस्टारची खास निर्मिती असलेल्या 'मासूम'चे दिग्दर्शन मिहिर देसाईने केले आहे. हा प्रयोग म्हणजे गुरमीत सिंहने शोरनरच्या भूमिकेत गाजवलेली अवॉर्ड विनिंग आयरिश सीरीज 'ब्लड' चे भारतीय वर्जन आहे. एका व्यक्तीने आपले कुटुंब गमावल्यावर त्याच्या वाट्याला येणारी फसवणूक आणि बदललेले कौटुंबिक संबंध यांच्या कथेवर यातून प्रकाश टाकलेला आहे. हा शो 'ड्रीमर्स अॅन्ड डूअर्स' कंपनीच्या बॅनरअंतर्गत बनलेला आहे. हा रिलायन्स एंटरटेनमेंटचा एक भाग असून प्रीमियम कंटेंट स्टूडियो आहे. या सीरीजमध्ये फेमस आनंद भास्कर कलेक्टिवचा एक सोलफुल साउंडट्रॅकही घेतला गेला आहे.
'मासूम'मध्ये बोमन ईरानी यांच्यासह समारा तिजोरी आणि उपासना सिंह, मंजिरी फडणीस, सारिका सिंह, वीर राजवंत सिंह, मनुर्षी चड्ढा असे अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसतील. ही सीरीज 17 जून 2022 रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म डिज्नी+हॉटस्टार वर प्रसारित होईल.