Golden Globe Awards 2023: RRR मधील 'नाटू नाटू' गाण्यानं लावलं वेड; मिळाला बेस्ट ओरिजिनल सॉन्ग अवॉर्ड

बी टाऊन
भरत जाधव
Updated Jan 11, 2023 | 09:04 IST

गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्याला (Golden Globe Awards 2023) सुरुवात झाली आहे. या सोहळ्यात भारतीय चित्रपटसृष्टीचा अभिमान वाढवणारी गोष्ट घडली आहे. दक्षिणात्य चित्रपट आरआरआर मधील नाटू नाटूला  ओरिजिनल सॉन्ग म्हणून पुरस्कार मिळाला आहे.

RRR's 'Naatu Naatu' won the award for Best Original Song
RRR चे 'नाटू नाटू' गाण्याला मिळाला बेस्ट ऑरिजनल सॉन्गचा पुरस्कार   |  फोटो सौजन्य: Times of India

Golden Globe Awards 2023: गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्याला (Golden Globe Awards 2023) सुरुवात झाली आहे. या सोहळ्यात भारतीय चित्रपटसृष्टीचा (Indian film industry) अभिमान वाढवणारी गोष्ट घडली आहे. दक्षिणात्य चित्रपट आरआरआर मधील नाटू नाटूला  ओरिजिनल सॉन्ग (original song) म्हणून पुरस्कार मिळाला आहे.  RRRच्या ना'नाटू नाटू' गाण्याने टेलर स्विफ्ट आणि रिहानाचा पराभव केला आहे. या चित्रपटात ज्युनियर एनटीआर (Junior NTR) आणि राम चरण (Ram Charan) मुख्य भूमिकेत आहेत.  ('Natu Natu' song from RRR created a frenzy; Won the Best Original Song Award)

अधिक वाचा  :  किचनमध्ये तयार केले जगातले सर्वात स्वस्त ट्रेडमिल

RRR चित्रपटाला 'सर्वोत्कृष्ट चित्रपट - नॉन इंग्लिश' आणि 'सर्वोत्कृष्ट ओरिजिनल सॉन्ग - मोशन पिक्चर' या दोन श्रेणींमध्ये नामांकन मिळाले आहे. आत्तापर्यंतच्या बातम्यांनुसार, RRRचित्रपटाने बेस्ट ओरिजिनल सॉन्ग मोशन पिक्चर च्या श्रेणीत पुरस्कार मिळवला आहे. 80 व्या गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स 2023 (80th Golden Globe Awards 2023) अमेरिकेत 10 जानेवारी रात्री सुरू झाले.

यावेळी जगभरातील चित्रपट अभिनेते आणि अभिनेत्री उपस्थित होते. गोल्डन ग्लोब अवॉर्ड्सचा प्रीमियर काल म्हणजेच मंगळवारी रात्री 8 वाजता पार पडला. परंतु भारतीय प्रेक्षकांना तो आज म्हणजेच बुधवारी, 11जानेवारी रोजी पाहता येणार आहे.  कार्यक्रम पाहताना प्रेक्षकांना आनंदाची बातमी मिळाली आहे. दिग्दर्शक एसएस राजामौली यांचा आर आर आर या चित्रपटाने जगभरात आपली जादू दाखवली आहे. सर्वत्र या चित्रपटाचं कौतुक केलं जात आहे. 

अधिक वाचा  : वर्षातील पहिली अंगारकी, वाचा तुमच्या शहरात चंद्रोदयाची वेळ

या चित्रपटाने आतापर्यंत अनेक पुरस्कार आपल्या नावावर केले आहेत. आता गोल्डन ग्लोब पुरस्कार देखील या चित्रपटाने मिळवला आहे. या चित्रपटातील नाटू नाटू या गाण्यासाठी बेस्ट ओरिजिनल सॉन्ग हा पुरस्कार मिळाला आहे.  या चित्रपटाला 'नॉन इंग्लिश लँग्वेज' आणि 'बेस्ट ओरिजनल सॉन्ग मोशन' या श्रेणींमध्ये नामांकन मिळाले आहे. यासह, या चित्रपटाने यापैकी एक पुरस्कार जिंकला आहे.  गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स 2023 च्या अधिकृत ट्विटर हँडलवर ही माहिती देण्यात आली आहे.

अधिक वाचा  : लालबहादूर शास्त्रींच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे अनमोल विचार

'नाटू नाटू' सॉन्ग वर्ष  2022 मध्ये हिट गाणं ठरलं . याचे तेलुगू भाषेतील गाणे हे काला भैरवा आणि राहुल सिप्लीगुंजने यांनी मिळून लिहिले होते. ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक एमएम कीरावानी यांनी संगीतबद्ध केले आहे. कीरवाणी गोल्डन ग्लोब पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावर उपस्थित होते. 

नाटू नाटू या गाण्यासोबत टेलर स्विफ्टचं गाणं कॅरोलीना  Guillermo del Toro’s Pinocchio चे गाणे 'ciao papa', 'टॉप गनः मैवरिक' चं गाणं 'होल्ड माय हॅण्ड', लेडी गागा, ब्लडपॉप और बेंजामिन राइसचं गाणं 'लिफ्ट मी अप' लाही गोल्डन ग्लोबच्या अवॉर्डसाठी नामांकन  मिळालं होतं.  या गाण्यांना मागे टाकत एसएस राजामौली यांच्या चित्रपटातील नाटू नाटू या गाण्याने हा पुरस्कार मिळवला आहे.  पुरस्कार जाहीर होताच एसएस राजामौली, ज्यूनिअर एनटीआर, राम चरण आणि चित्रपटाच्या कलाकार खुर्चीतून उठून उभे राहिले आणि आनंद साजरा करू लागले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी