Pushpa:The Rise on OTT : अल्लू अर्जुनच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, 'पुष्पा: द राइज' ओटीटीवर रिलीज होणार

Pushpa:The Rise on OTT : अल्लू अर्जुनचा 'पुष्पा' सिनेमा पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. मात्र, हा सिनेमा पाहण्यासाठी थिएटरमध्ये जाऊ न शकलेल्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पुष्पा सिनेमा लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

 'Pushpa: The Rise' to be released on OTT Platform
अल्लू अर्जुनचा पुष्पा द राइज आता अँमेझॉन प्राईमवर येणार  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पुष्पा' लवकरच OTT वर रिलीज होणार आहे
  • अल्लू अर्जुनने या चित्रपटात सर्वांची मनं जिंकली आहेत
  • सिनेमाने बॉक्स ऑफिसवर छप्पर फाड कमाई केली आहे.

Pushpa:The Rise will release on OTT : नवी दिल्ली : दाक्षिणात्य सिनेमांमधील प्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असलेल्या 'पुष्पा' चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून भरभरून दाद मिळाली. या सिनेमाने पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली. मात्र, अजूनही असे अनेक चाहते आहेत ज्यांना इच्छा असूनही थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा पाहता आलेला नाही. अशा चाहत्यांसाठी आता एक मोठी आनंदाची बातमी आली आहे. लवकरच हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज केला जाणार आहे. (Good news for Allu Arjun fans Pushpa  The Rise to be released on OTT)


Amazon Prime Video वर रिलीज होणार सिनेमा

अल्लू अर्जुनचा हा सुपरडुपर हीट सिनेमा आता  Amazon Prime Video वर रिलीज होणार आहे. या वृत्ताला आता Amazon Prime नेसुद्धा दुजोरा दिला आहे. अॅमेझॉन प्राईम प्लॅटफॉर्मने आपल्या सोशल मीडिया हँडलवरून जाहीर केले आहे की 'पुष्पा: द राइज' 7 जानेवारीपासून OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होईल. हा 2021 मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे.


प्राइम व्हिडिओने पुष्टी केली

प्राइम व्हिडिओने ट्विट केले की, 'तो लढेल. तो धावेल तो उडी मारेल. पण तो डगमगणार नाही! Pushpa: The Rise Now प्राइम वर तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नडमध्ये पाहा. ही घोषणा अशा वेळी आली आहे जेव्हा राज्य सरकार रात्री कर्फ्यू लावण्याचा विचार करत आहे. आणि थिएटर आणि मल्टिप्लेक्स बंद करत आहेत. काही ठिकाणी थिएटर ५० टक्के क्षमतेने सुरू होत आहेत.


सिनेमांची रिलीज डेट पुढे ढकलल्याचा फायदा

RRR', 'राधे श्याम' आणि 'भीमला नायक' या इतर बहुप्रतिक्षित चित्रपटांच्या निर्मात्यांनी 'पुष्पा: द राइज'च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये वाढ करत कोरोना परिस्थिती लक्षात घेऊन त्यांच्या रिलीजच्या तारखा पुढे ढकलल्या आहेत. 17 डिसेंबर रोजी रिलीज झाल्यापासून या चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीची कमाई 65 कोटींवर पोहोचली आहे. जगभरात या चित्रपटाने आतापर्यंत ३०० कोटी रुपयांची कमाई केली आहे, असे व्यापार विश्लेषकांचे म्हणणे आहे.

या स्टार्सनी सिनेमाला चारचाँद लावले आहेत.

तेलुगू दिग्दर्शक सुकुमार लिखित आणि दिग्दर्शित, अँक्शन-पॅक थ्रिलरच्या स्टार कास्टमध्ये अल्लू अर्जुनसह रश्मिका मंदान्ना, फहद फासिल, सुनील, अनसूया भारद्वाज आणि अजॉय घोष प्रमुख भूमिकेत आहेत. याशिवाय या चित्रपटात समंथा रुथ प्रभू पहिल्यांदाच आयटम साँगमध्ये दिसली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी