Kareena Kapoor Pregnant: लवकरच तैमूर होणार दादा, करीना कपूरनं स्वत: फॅन्सना दिली गुड न्यूज

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान दुसऱ्यांदा आई होणार आहे. करीना आणि सैफ अली खाननं स्वत: ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर शेअर केलीय. त्यामुळे आता त्यांच्या कुटुंबात तैमूरला लवकरच भाऊ किंवा बहीण मिळणार आहे.

Saif Ali Khan and Kareena Kapoor
लवकरच तैमूर होणार दादा, करीना कपूरनं फॅन्सना दिली गुड न्यूज  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • करीना आणि सैफ अली खानच्या घरात येणार नवीन पाहुणा
  • अभिनेत्री करीना कपूर खान दुसऱ्यांदा होणार आई, लवकरच तैमूर होणार दादा
  • सैफ आणि करीनानं सोशल मीडियावरून सांगितली ही गुड न्यूज

Kareena Kapoor Khan all set to welcome second baby: आपल्या अभिनयानं अनेकांना घायाळ करणारी अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) दुसऱ्यांदा आई होणार आहे. तिनं आपल्या प्रेग्नेंसीची (Pregnant) बातमी सोशल मीडियावरून शेअर केली आहे. करीना लवकरच दुसऱ्या बाळाला जन्म देणार असल्याचं तिनं आणि सैफ अली खाननं (Saif Ali Khan) आपल्या फॅन्सना सांगितलं आहे. बऱ्याच काळापासून ही चर्चा सुरू होती की, लवकरच करीना गुड न्यूज (Good News) देईल. आता चर्चा थांबल्या आहेत कारण हे स्पष्ट झालंय की तैमूरला (Taimur Ali Khan) आता भाऊ किंवा बहीण मिळणार आहे.

प्रेग्नेंसीबाबत माहिती देत करीना कपूर खान आणि सैफ अली खाननं सोशल मीडियावर लिहिलं, ‘आम्हाला हे सांगतांना आनंद होतोय की, आमच्या कुटुंबात लवकरच नवीन पाहुण्याचं आगमन होणार आहे. सर्व चाहत्यांचे आभार.’

आपल्याला माहितीच आहे अभिनेत्री करीना कपूर खानला एक मुलगा आहे. २० डिसेंबर २०१६ ला मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात करीनानं मुलगा तैमूरला जन्म दिला होता. आपल्या पहिल्या प्रेग्नेंसी दरम्यान करीना कपूर खान सोशल मीडियावर चांगलीच एक्टिव्ह होती. जरी ती मोठ्या पडद्यावर कमी झळकली होती, पण तिनं आपलं काम बंद केलं नव्हतं. सोबतच तैमूरच्या वेळी तिनं बेबी बंपसोबत रॅम्प वॉक पण केला होता. आता तैमूर चार वर्षांचा होतोय आणि करीनानं दुसऱ्यांदा आई होण्याचा निर्णय घेतलाय. ही गुड न्यूज ऐकून करीना आणि सैफचे चाहते खूप खुश झाले आहेत.

प्रेग्नेंसीनंतर चित्रपटांमधून घेतला होता ब्रेक

तैमूरचा जन्म झाल्यानंतर करीना कपूरनं चित्रपटांमधून खूप मोठा ब्रेक घेतला होता आणि खूप काळानंतर तिनं चित्रपट ‘वीरे दी वेडिंग’मधून बॉलिवूडमध्ये पुनरागमन केलं होतं. त्यानंतर करीनानं ‘गुड न्यूज’ आणि ‘अंग्रेजी मीडियम’ हे चित्रपट केले.

वर्कफ्रंटच्या बाबतीत बोलायचं झालं तर करीना आता आगामी काळात करण जोहरचा चित्रपट मल्टीस्टारर चित्रपट तख्त आणि लाल सिंह चड्ढामध्ये दिसणार आहे. मात्र अशी सुद्धा बातमी आली आहे की, करण जोहर आता तख्त पूर्वी रणवीर सिंह आणि आलिया भट्टला घेऊन एक दुसरा चित्रपट बनवत आहे. तख्त चित्रपटाचं शूटिंग पुढे ढकलण्याचं कदाचित करीनाची प्रेग्नेंसी हे कारण असू शकतं. तर ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाची रिलीज डेट पण पुढील वर्षी ख्रिसमस पर्यंत पुढे ढकलली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी