VIDEO: शूटिंगदरम्यान राडा... अभिनेत्री माही गिलवर गुंडांचा हल्ला, अनेक जण जखमी  

बी टाऊन
Updated Jun 20, 2019 | 09:34 IST | टाइम्स नाऊ मराठी

Goons attacked on Mahie Gill: अभिनेत्री माही गिल हिच्यावर काल (बुधवार) काही गुंडांनी अचानक हल्ला केला. यावेळी ती या हल्ल्यातून थोडक्यात बचावली. पण युनिटमधील क्रू मेंबर जखमी झाले आहेत. 

mahie-gill_instagram
VIDEO: शूटिंगदरम्यान राडा... अभिनेत्री माही गिलवर गुंडांचा हल्ला, अनेक जण जखमी  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: दबंग, साहेब बीवी और गँगस्टर यासारख्या सिनेमात काम करणारी  बॉलिवूड अभिनेत्री माही गिल ही गुंडांच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावल्याचं समोर आलं आहे. एका वेब सीरीजच्या शुटींग दरम्यान ही धक्कादायक घटना घडली. मिळालेल्या या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ हा या वेब सीरीजमध्ये कलाकार म्हणून काम करत असलेल्या दिग्दर्शक तिग्मांशू धुलिया याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री माही गिल आणि वेब सीरीजचा दिग्दर्शक सोहम शाह घडल्या प्रकाराबद्दल माहिती देताना दिसत आहेत. माही सध्या एका वेब सीरीजसाठी शूटिंग करत होती. याचवेळेस त्यांच्या संपूर्ण क्रूवर अचानक हल्ला करण्यात आला. काल साधारण संध्याकाळी साडे चार वाजता हा हल्ला करण्यात आला ज्यामध्ये काही तंत्रज्ञ मंडळी जखमी झाले आहेत. 

माही गिल ही सध्या घोडबंदर रोडवरील मीरा रोड येथे एका फॅक्टरीमध्ये शूटिंग करत होती. याचवेळेस तिथे काही गुंड हातात लोखंडी रॉड घेऊन घुसले. इथे शूटिंगला परवानगी नाही म्हणत त्यांनी क्रू मेंबरला मारहाण करण्यात सुरुवात केली. तसंच शूटिंगचं बरंचसं सामानही तोडलं. हा सगळा प्रकार सुरु असताना काही गुंडांनी अभिनेत्री माही गिलला देखील त्रास दिला. ते तिच्यावर देखील धावून गेले. पण टीममधील इतरांनी तिला सुरक्षितपणे एका गाडीत बसवून ठेवलं. त्यामुळे ती थोडक्यात वाचली. 

व्हिडिओमध्ये माही गिल असं म्हणाली की, 'जेव्हा पोलीस घटनास्थळी आले तेव्हा त्यांनी या गुंडांवर काहीही कारवाई केली नाही. उलट तेच गुंडाना असं म्हणाले की, यांना आणखी मारा. त्यावेळी पोलिसांनी कम्पाऊंडचं मेन गेट देखील बंद करून घेतलं. त्यामुळे आम्हाला आमचं सामान बाहेर नेता आलं नाही. पोलिसांनी यापैकी काही सामान जप्त केलं असून ते सोडविण्यासाठी देखील आमच्याकडे पैशाची मागणी केली जात आहे.' 

या व्हिडिओमध्ये असं म्हटलं आहे की, चार ते पाच गुंड हे दारू पिऊन अचानक शूटिंग सुरु असलेल्या ठिकाणी घुसले. आम्ही शुटिंगसाठी आधीच परवानगी घेतली. तसं पत्र देखील आमच्याकडे आहे. त्यासाठी लोकेशन मॅनेजरला आम्ही पैसे देखील दिले होते. पण या गुंडांच्या मते, ही जागा त्यांची असून त्यांच्या परवानगीशिवाय ते शूटिंग करु शकत नाही.' 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Uski har ada muhabbat si lagti hai.... #ForeverSaree #love #ethnic #traditional #saree

A post shared by Mahie Gill (@mahieg) on

माही पुढे असंही म्हणाली की, 'शूटिंग सुरु असतानाच हे गुंड आत घुसले आणि त्यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यांनी आमच्यातील काही जणांना जबर मारहाण केली. ते मलाही मारहाण करण्यास येत होते. पण मी तिथून तात्काळ पळाली म्हणून थोडक्यात वाचली. आज हे आमच्यासोबत झालं उद्या हे कुणासोबतही होऊ शकतं. त्यामुळे या गुंडांवर कारवाई झाली पाहिजे.'

दरम्यान, यावेळी युनिटकडून असं सांगण्यात आलं की, 'आम्ही पोलिसात याप्रकरणी तक्रार दाखल केलेली नाही. कारण की, आम्हाला माहित आहे की, जर आम्ही पोलिसात तक्रार केली तर पोलीस त्या गुंडांकडून पैसे घेतली आणि त्यांना सोडून देतील. पण आम्हाला वर्षानुवर्षे कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागतील. ज्यामुळे आम्हालाच मानसिक त्रास होणार आहे.' हा संपूर्ण व्हिडिओ तिग्मांशू धुलियाने सोशल मीडियावर शेअर केला आहे. याशिवाय एकता कपूरनेही शेअर केला आहे. 
 
दरम्यान, याप्रकरणी अभिनेत्री माही गिल ही आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
VIDEO: शूटिंगदरम्यान राडा... अभिनेत्री माही गिलवर गुंडांचा हल्ला, अनेक जण जखमी   Description: Goons attacked on Mahie Gill: अभिनेत्री माही गिल हिच्यावर काल (बुधवार) काही गुंडांनी अचानक हल्ला केला. यावेळी ती या हल्ल्यातून थोडक्यात बचावली. पण युनिटमधील क्रू मेंबर जखमी झाले आहेत. 
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles