Grammy Awards 2020: देसी गर्ल प्रियंका चोपडाचा आतापर्यंतचा सर्वात हॉट लूक पाहा

बी टाऊन
Updated Jan 29, 2020 | 15:48 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा

Priyanka Chopra & Nick Jonas at Grammy Awards 2020: नुकतीच अभिनेत्री प्रियंका चोपडा पती निक जोनाससोबत ग्रॅमी अॅवॉर्ड्सला पोहोचली होती. यावेळी प्रियंकानं डीप नेक गाऊन घालून सर्वांनाच आकर्षित केलं.

Priyanka Chopra and Nick Jonas
देसी गर्ल प्रियंका चोपडाचा आतापर्यंतचा सर्वात हॉट लूक पाहा  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • प्रियंका चोपडाचा हॉट लूक आला समोर, ग्रॅमी अॅवॉर्ड्समध्ये दिसला जबरदस्त लूक
  • डिप नेक गाऊनमध्ये प्रियंकानं लुटली मैफिल, पती निक जोनास सुद्धा स्टनिंग लूकमध्ये
  • रेड कार्पेटवर प्रियंका-निकचा जलवा, २६ जानेवारीला लॉस एंजेलिसमध्ये रंगला ग्रॅमी अॅवॉर्ड्स सोहळा

मुंबई: बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोपडा आता एका ग्लोबल स्टार्सपैकी एक आहे. प्रियंकानं हॉलिवूड चित्रपट आणि टीव्ही शोजमध्ये पण दमदार काम केलेलं आहे आणि इंटनॅशनल लेव्हलवर तिनं आपली एक वेगळी ओळख निर्माण केलीय. तर तिचा पती निक जोनास प्रसिद्ध हॉलिवूड गायक आहे. प्रियंका आणि निकनं नुकतीच ग्रॅमी म्यूजिक अॅवॉर्ड्समध्ये आपली हजेरी लावली. ग्रॅमी अॅवॉर्ड्स संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध पुरस्कार आहे. हा अॅवॉर्ड्स सोहळा लॉस एंजेलिसमध्ये २६ जानेवारीला पार पडला, तर भारतात २७ जानेवारीला सोहळ्याचे अपडेट्स मिळू लागले. यावेळी प्रियंका चोपडा पती निक जोनस सोबत तिथं पोहोचली होती.

ग्रॅमी अॅवॉर्ड्समध्ये प्रियंका आणि निकचा रेड कार्पेट लूक खूप जबरदस्त होता. प्रियंकानं आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर निकसोबत एक फोटो शेअर केला. यात ती राल्फ एंड रुसोच्या एका आयव्हरी सिक्विन-एनग्रेस्ड सिल्क किमोनो गाऊनमध्ये दिसली. हा गाऊन खूप डीप नेक आहे, ज्याचा कट तिच्या नेवल पियर्सिंगपर्यंत आहे. यात प्रियंका खूप हॉट दिसत होती.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

This guy. #Grammys2020

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

 

हा गाऊन हँड पेंटेंड आहे आणि यावर एम्बेलिश्मेंट केलं गेलं आहे. याचे ३डी ऑरगेंजा पेटल्स आणि पीच ओम्ब्रे फ्रिंज स्लीव्ज गाऊनला आणखी स्टायलिश लूक देत आहे. यात ट्रेन सुद्धा आहे, जी रेड कार्पेटवर खूप सुंदर दिसत होती. प्रियंकानं आपला ड्रॉप इअररिंग्जनं एक्सेसराईज केला होता. हेअरस्टाईलबद्दल बोलायचं झालं तर तिनं साईड पार्टिंग सोबत स्ट्रेट मोकळे केस ठेवले होते.

 

 

तर निक जोनासबाबत बोलायचं झालं तर त्यानं एक सीक्विन सूट घातला होता. ज्यात निक खूप डॅशिंग दिसत होता. तो रेड कार्पेटवर प्रियंकाच्या लूकला पूर्णपणे कॉम्प्लीमेंट करत होता. हे कपल खूप स्टायलिश दिसत होतं. वर्कफ्रंटच्या बाबतीत बोलायचं झालं तर प्रियंका सध्या आपला आगामी बॉलिवूड चित्रपट ‘द व्हाईट टायगर’ची तयारी करतेय. या चित्रपटात ती पहिल्यांदाच राजकुमार राव सोबत स्क्रीन स्पेस शेअर करणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी