या सिनेमातून डेब्यू करणार गुलशन कुमार यांची मुलगी, आर. माधवन सोबत दिसणार

बी टाऊन
Updated Jul 16, 2019 | 15:55 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

प्रसिद्ध भजन गायक गुलशन कुमार यांची मुलगी लवकरच अॅक्टिंगमध्ये डेब्यू करणार आहे. या सिनेमात ती अभिनेत्री आर. माधवन दिसणार आहे.

gulshan kumar daughter
गुलशन कुमार यांची मुलगी 

थोडं पण कामाचं

  • गुलशन कुमार यांच्या मुलीचे बॉलिवूडमध्ये पदार्पण
  • खुशाली कुमार लवकरच दिसणार सिनेमात
  • आर माधवनसोबत करणार स्क्रीन शेअर

मुंबई: बॉलिवूड अभिनेता आर. माधवन लवकरच पुढच्या सिनेमाचे पुढच्या महिन्यात शूटिंग सुरू होणार आहे. या सिनेमात अभिनेत्री खुशाली कुमार दिसणार आहे. हा खुशाली हिचा डेब्यू सिनेमा असणार आहे. याचे टायटल दही चिनी असेल. याचे दिग्दर्शन अश्विन नील  मणी करणार आहेत. खुशाली ही प्रसिद्ध भजन गायक गुलशन कुमार यांची मुलगी आहे. 

सिनेमा अँड ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्वीट करून ही माहिती दिली. यासोबतच त्यांनी सिनेमाने फर्स्ट पोस्टरही शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये माधवन आणि खुशाही दोघही दिसत आहेत. फोटोमध्ये माधवन हसताना दिसत आहे यात त्याने पिंक कलरचा शर्ट आणि व्हाईट टी शर्ट घातला आहे. तर खुशाली त्याच्या डोक्यावर हात ठेवून उभी असलेली दिसत आहे. फोटोमध्ये खुशालीने ब्लू कलरचा कट-स्लीव्हस ब्लाऊज आणि सुंदर साडी नेसली आहे. तिने न्यूड मेकअपसोबत ब्लॅक कलरची छोटी टिकली लावली आहे. यात खुशाली खूपच सुंदर दिसत आहे. तर पोस्टरमध्ये मागे भोपाळ न्यायालय दिसत आहे. 

गुलशन कुमार यांची मुलगी आहे खुशाली

खुशाली ही भजन गायक गुलशन कुमार यांची मुलगी आहे. गुलशन कुमार यांना तीन मुले आहेत. दोन मुली तुलसी कुमार आणि खुशाली कुमार आणि एक मुलगा भूषण कुमार. खुशाली खूपच बोल्ड आणि सुंदर आहे. ती सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते. तसेच आपले ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. इन्स्टाग्रामवर तिचे ४ लाख ६३ हजार फॉलोअर्स आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

"Raindrops Keep Fallin' on My Head" ?? rains are finally here

A post shared by Khushali Kumar (@khushalikumar) on

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Don't sit when you're tired, sit when you're done. #WorkoutGoals

A post shared by Khushali Kumar (@khushalikumar) on

१९९७मध्ये झाली होती गुलशन कुमार यांची हत्या

१२ ऑगस्ट १९९७मध्ये मुंबईच्या दक्षिण अंधेरी स्थित जीतेश्वर महादेव मंदिराबाहेर टी सीरीज कंपनीचे संस्थापक गुलशन कुमार यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्यांना १७ गोळ्या घालण्यात आल्या होत्या. गुलशन कुमार यांच्या हत्येचा आरोप अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम यांच्यावर आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
या सिनेमातून डेब्यू करणार गुलशन कुमार यांची मुलगी, आर. माधवन सोबत दिसणार Description: प्रसिद्ध भजन गायक गुलशन कुमार यांची मुलगी लवकरच अॅक्टिंगमध्ये डेब्यू करणार आहे. या सिनेमात ती अभिनेत्री आर. माधवन दिसणार आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...