Guneet Monga wins Oscar : 95 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात “द एलिफंट व्हिस्परर्स” या डॉक्युमेंटरीला ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. डॉक्युमेंटरी शॉर्ट सब्जेक्ट प्रकारात भारतासाठी हा पुरस्कार मिळाला असून हा भारताच पहिला विजय होता. परंतु गुनीत मोंगा हिने भारतासाठी ऑस्कर आणण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. तिने याआधीही ऑस्कर पुरस्कार मिळवला आहे. काय लागला ना धक्का. पण हो. तुम्ही जे वाचलं ते खरं आहे, 2019 मध्ये, गुनीत मोंगाच्या 'पीरियड. एंड ऑफ सेन्टेन्स' या डॉक्युमेंटरीला देखील डॉक्युमेंटरी शॉर्ट सब्जेक्टमध्ये ऑस्कर मिळाला होता.
डॉक्युमेंटरीचे कथानक एका कुटुंबाभोवती फिरते जे तामिळनाडूच्या मुदुमलाई व्याघ्र प्रकल्पात दोन अनाथ हत्तींना दत्तक घेते."द एलिफंट व्हिस्परर्स" मध्ये दोन सोडून दिलेले हत्ती आणि त्यांचे काळजी घेणारे यांच्यातील एक अतूट बंध दर्शविला आहे. सिख्या एंटरटेनमेंटचे गुनीत मोंगा आणि अचिन जैन यांनी त्याची निर्मिती केली आहे.
अधिक वाचा : TJMM साठी रणबीरच्या तुलनेत श्रद्धाला मिळाली एवढी रक्कम, जाणून घ्या स्टार कास्टची फी
"द एलिफंट व्हिस्परर्स ही भावनिकदृष्ट्या समृद्ध करणारी आणि 'जंबो साइज' कथा आहे जी बिनशर्त प्रेमाचे उदाहरण आहे. असं, गुनीत हिने एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले आहे. दरम्यान ऑस्कर पुरस्कार मिळाल्यानंतर निर्माता गुनीतने तिची प्रतिक्रिया शेअर करतान लिहिले, "भारतील निर्मितीसाठी आम्ही फक्त पहिलाच ऑस्कर जिंकलो! दोन महिलांनी हे केले! माझ्या अंगावर अजूनही काटा आहे"
द एलिफंट व्हिस्परर्सच्या दिग्दर्शिका कार्तिकी गोन्साल्विस यांनी पुरस्कार घेताना आपल्या भावना व्यक्त केल्या. पर्यावरण आणि आपल्यामधील असलेल्या पवित्र नातं सांगण्यासाठी तसेच स्थानिक समुदायांच्या सन्मानासाठी आणि आम्ही ज्या इतर सजीवांसोबत जागा शेअर करतो त्यांच्याबद्दल सहानुभूती आणि सहअस्तित्वासाठी बोलण्यासाठी मी येथे उभी आहे, असं कार्तिकी गोन्साल्विस म्हणाल्या.
अधिक वाचा : कलरफुल प्राजक्ता माळीची दिलखूश अदा
जगातील इतर कामापेक्षा कोणाची काळजी घेणं हे सर्वात अवघड काम आहे. एखाद्या व्यक्तीकडे झुकण्यासाठी प्रचंड संयम आणि मेहनत लागते. परंतु काळजी घेण्यासाठी कोणतीच मर्यादा राहत नाही. स्थानिक लोकांचा पर्यावरणाशी घट्ट नाते आहे, जे आम्ही येथे शेअर केले आहे. या जीवनपद्धतीतून आणि त्यांच्या विश्वासातून बरेच काही शिकण्यासारखे आहे. बोमन आणि बेली हे रघूच्या जीवनाचा एक भाग बनले आहेत. फक्त एका अनाथ हत्तीचे पालन-पोषण करण्यासाठी त्यांनी सर्व काही सोडून दिले.
अधिक वाचा : पांड्या वहिनींचा हॉट बीच लूक पाहून फुटेल घाम
कार्तिकी गोन्साल्विसच्या लघुपट ‘द एलिफंट व्हिस्परर्स’मध्ये, बोमन रघूला त्याच तलावात आंघोळ घालतो. बेली रघूला तिच्या हातांनी खाऊ घालते जसे ती आपल्या मुलाला खायला घालते. त्यांच्या एकजुटीने आणि चिकाटीनेच रघूला बरे केले. आणि त्यातच ते एक कुटुंब बनले.