Hansal Mehta: वयाच्या ५४ व्या लग्नबंधनात हंसल मेहता; १७ वर्षांपासून होते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये

Hansal Mehta Marriage । दिग्दर्शक आणि लेखक हंसल मेहता अनेकदा त्यांच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतात. दरम्यान पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत मात्र आता ते चर्चेत येण्यामागील कारण वेगळे आहे.

Hansal Mehta is married at the age of 54 
वयाच्या ५४ व्या लग्नबंधनात अडकले हंसल मेहता  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • दिग्दर्शक आणि लेखक हंसल मेहता अनेकदा त्यांच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतात.
  • वयाच्या ५४ व्या लग्नबंधनात अडकले हंसल मेहता.
  • १७ वर्षांपासून होते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये.

Hansal Mehta Marriage । मुंबई : दिग्दर्शक आणि लेखक हंसल मेहता अनेकदा त्यांच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतात. दरम्यान पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत मात्र आता ते चर्चेत येण्यामागील कारण वेगळे आहे. कारण लक्ष्य आणि हायवे सारख्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांसाठी ओळखले जाणारे हंसल मेहता वयाच्या ५४ व्या वर्षी लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. याबाबतची माहिती त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत दिली आहे. याशिवाय ते मागील १७ वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असल्याचा खुलासाही त्यांनी केला आहे. (Hansal Mehta is married at the age of 54). 

अधिक वाचा : Terror Funding: यासीन मलिकला फाशी होणार की जन्मठेप?

लग्नाचे फोटो आले समोर

दरम्यान, दिग्दर्शकांनी त्यांची जोडीदार के सफिना हुसैनसोबत लग्नगाठ बांधली आहे. बुधवारी सकाळी त्यांनी लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. फोटोंमध्ये हंसल आणि सफिना कागदपत्रांवर स्वाक्षरी करताना दिसत आहेत. त्यामुळे आता या फोटोंची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Hansal Mehta (@hansalmehta)

पोस्ट करत हंसल मेहता यांनी म्हटले की, "म्हणूनच १७ वर्षांनंतर दोन लोकांनी त्यांच्या मुलांना मोठे होताना पाहिले. तसेच स्वप्नांचा पाठलाग करताना आम्ही आता लग्न करण्याचा निर्णय घेतला. आयुष्यात हे देखील नेहमीप्रमाणेच अनियोजित आणि अचानक घडले. शेवटी प्रेम हे इतर गोष्टींपेक्षा मोठे असते आणि हे..." अशा शब्दांत त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. 

अनेक कलाकारांनी दिल्या शुभेच्छा

हंसल मेहता यांनी लग्नाचे फोटो सोशल मीडियावरील प्रसिद्ध प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये, हंसल यांनी तपकिरी रंगाचा ब्लेझर आणि पांढरा टी-शर्ट घातलेला दिसतो आहे. तर पत्नी सफिना गुलाबी सलवार सूटमध्ये आहे. कागदपत्रांवर स्वाक्षरी केल्यानंतर दोघे कुटुंबियांसोबत पोज देताना दिसत आहेत. आता या जोडप्याला लग्नाच्या अनेक कलाकार शुभेच्छा देत आहेत. चित्रपट निर्माते विशाल भारद्वाज, अनुभव सिन्हा, अभिनेते राजकुमार राव, मनोज बाजपेयी आणि शेफ रणवीर ब्रार यांनी त्यांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

लक्षणीय बाब म्हणजे हंसल आणि सफिना यांना दोन मुली आहेत. हंसल यांना त्यांना आधीच्या लग्नातून दोन मुलंही आहेत. यापूर्वी त्यांनी सफिनाची ओळख पत्नी म्हणून करून दिली होती. सफिना ही एक सामाजिक कार्यकर्ता आहे. तसेच त्या एज्युकेट गर्ल्स नावाच्या ना-नफा संस्थेच्या संस्थापक देखील आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी