[Photos] बोल्ड अभिनेत्री राखी सावंतने 'या' पाच अवयवांवर केली आहे शस्त्रक्रिया

Rakhi Sawant Birthday: राखी सावंत हिचा आज ४१ वा वाढदिवस आहे.  राखीने तिच्या लूकवर अनेक प्रयोग केले आहेत. राखीने सुंदर दिसण्यासाठी शस्त्रक्रिया केली.

Rakhi-Sawant
[Photos] बोल्ड अभिनेत्री राखी सावंतने 'या' पाच अवयवांवर केली आहे शस्त्रक्रिया  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • राखी सावंतचा आज आहे ४१वा वाढदिवस
  • राखी सावंत वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच असते चर्चेत 
  • राखी सावंत आपल्या शरीरावरील अनेक अवयवांवर प्लास्टिक सर्जरी केली आहे. 

मुंबई: बॉलिवूडची कंट्रोवर्सी क्वीन, आयटम डान्सर आणि बिग बॉस स्पर्धक राखी सावंत (Rakhi Sawant) २५ नोव्हेंबरला आपला ४१वा वाढदिवस (Birthday) साजरा करत आहेत. राखी सावंत आणि वाद हे आता ठळक समीकरण झालं आहे. वादांपेक्षा राखी सावंत तिच्या बोल्ड आणि कधीकधी वादग्रस्त विधानांमुळे देखील चर्चेत असते.

राखीचे खरे नाव नीरू भेडा असे आहे. राखी सावंत हिने मुलाखतीत म्हटले आहे की, ती अशा कुटुंबातील आहे जिथे महिलांना कोणतीही सूट दिली जात नाही. स्त्रिया घराच्या छतावर किंवा बाल्कनीवर देखील उभ्या राहू शकत नाहीत. राखी सावंत म्हटलं आहे की, वयाच्या ११व्या वर्षी तिने अनिल आणि टीना अंबानी यांच्या लग्नात लोकांना जेवण वाढलं होतं. या कामासाठी तिला दिवसाला ५० रुपये मिळायचे.

राखी सावंत आपल्या वक्तव्यांव्यतिरिक्त तिच्या लूकमुळेही चर्चेत असते. राखी सावंत हिने आपल्या अनेक अवयवांवर प्लास्टिक सर्जरी केली आहे. सुरुवातीला राखी सावंत हिचे ओठ खूप पातळ होते. आपले ओठ किंचित जाड करण्यासाठी राखीने प्लास्टिक सर्जरी केली होती.

राखी सावंतने ब्रेस्ट इम्प्लांटही केले आहे. याशिवाय राखीचे लिपोसक्शनही झाले आहे. या अंतर्गत हात, पोट आणि मांड्यांवरील चरबी कमी करण्यात आली आहे. याशिवाय राखीने रिन्होप्लॉस्टी करुन आपल्या नाकाचा आकार देखील काहीसा बदलला आहे.

राखी सावंत म्हणाली की ती बॉलिवूडमधील इतर लोकांच्या प्रेरणेने ती तिच्या शरीराचा एक भाग दान करू इच्छित आहे. राखीच्या मते, तिला स्तन दान करायचं आहे.चर्चेत राहण्यासाठी राखी अनेकदा काही स्टंट देखील करते. याआधी राखीने बर्‍याच मोठ्या व्यक्तींवर भाष्यही केले आहे. नुकतंच अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या निधनानंतर राखी सावंतने व्हिडिओ पोस्ट केला होता. यात तिने म्हटलं होतं की सुशांत स्वप्नात आला होता आणि म्हणाला तिच्या पोटी तो पुनर्जन्म घेईल.

दरम्यान, २०१४ साली राखीने निवडणूक देखील लढवली होती. ज्यामध्ये तिच्या हाती फार काही लागलं नाही. मात्र, त्यावेळी देखील ती चर्चेत मात्र कायम होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी