Hardik-Natasha Wedding : नुकतेच हार्दिक-नताशाचा शाही विवाहसोहळा उदयपूर येथे पार पडला. या जोडप्याने या खास समारंभासाठी अबू जानी संदीप खोसला यांनी डिझाइन केलेले शाही आउटफिट निवडले होते. हार्दिकने ऑफ व्हाइट गोल्ड शेरवानी घातली होती. तर नताशाने लाल आणि गोल्डन कलरचा लेहंगा घातला होता. (Hardik and Natasha's Royal Hindu Wedding Photos Go Viral; Natasha's special gota lehenga caught everyone's attention)
अधिक वाचा : चेतन शर्मांनी BCCI कडे सोपवला राजीनामा
दोघांच्या या रोमॅंटीक लग्न हिंदू आणि ख्रिश्चन पध्दतीने पार पडले. त्यांच्या ख्रिश्चन विवाह सोहळ्यातील फोटो व्हायरल झाल्यानंतर आता रॅायल हिंदू पध्दतीने पार पडलेल्या लग्नातील फोटो त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केले आहेत. फोटो शेअर करत त्यांना सुंदर कॅप्शन दिलं आहे. दोघांचे आउटफिट अबू जानी आणि संदीप खोसलाच्या लेबलचे आहेत.
गुरुवारी रात्री हार्दिक आणि नताशाने त्यांच्या हिंदू लग्नाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. हार्दिक पांड्या ऑफ व्हाइट गोल्ड शेरवानीमध्ये खूप हॅंडसम दिसत होता तर नताशा भरजडीत लाल आणि गोल्डन लेहंग्यामध्ये अतिशय सुंदर दिसत होती. सात फेऱ्यांसाठी नताशाने लाल कलरची साडी आणि डिजायनर ब्लाउज घातला होता. तिचे हे दोन आउटफिट सगळ्यांच लक्ष वेधून घेत होते.
अबू जानी संदीप खोसला यांच्या इन्स्टाग्राम ऑफिशियल पेजवर हार्दिकच्या शेरवानी बद्दल माहिती दिली आहे. ते म्हणतात, अ मॅच मेड इन हेवन. हार्दिक हा शाही, ऑफ-व्हाइट जमदानी शेरवानी चांगला दिसत होता. नताशाच्या रीगल कस्टम-मेड अबू जानी संदीप खोसलाच्या लेहेंग्यात अतिशय उठून दिसत होती. भरजरीत गोटा लेहेंग्यात नताशा खूप सुंदर दिसत होती. बांधनी दुपट्टा परफेक्ट कॉन्ट्रास्ट होता. चोकर नेकलेस, मॅचिंग कानातले, मंग टिका, कडा, बांगड्या, अंगठी आणि उंच टाचांसह तिने जबरदस्त ब्राइडल लुक स्टाईल केला.
अधिक वाचा : सिद्धार्थ-कियाराच्या घरात आलेल्या पाहुण्यांचा माकडचाळा,Video
नतासाने वरमाला समारंभासाठी लेहेंगा घातला होता, तर फेऱ्यांसाठी नताशाने चमकदार लाल साडी घातली होती. नताशाने हेवीली एम्ब्रॉयडरी केलेल्या हाफ-स्लीव्ह गोल्ड ब्लाउजसह लूक पूर्ण केला. तिने स्लीक बन हेअर स्टाइल केली होती.