Hardik Pandya-Natasha Wedding Photos: उदयपूर : इंडियन क्रिकेटर हार्दिक पांड्या पुन्हा एकदा नव्याने आपल्या पत्नीच्या प्रेमात पडला आहे. व्हॅलेंटाइनच्या दिवशी आपल्या पत्नी नताशा स्टॅनकोविक सोबत पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकला आहे. दोघांचं व्हाइट वेडिंग सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले जात आहेत. या फोटोंमध्ये दोघांचा रोमॅंटीक अंदाज बघायला मिळत आहे. या खास लग्नासाठी व्हॅलेंटाईन डेपेक्षा चांगला दिवस असू शकत नाही. हे लग्न राजस्थानच्या उदरपूरमध्ये पार पडले. या लग्नाच्या फोटोंमध्ये हार्दिक आणि नताशा त्यांच्या दोन वर्षांचा मुलगाही दिसत आहे.
क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि अभिनेत्री नताशा स्टॅनकोविक यांनी ख्रिश्चन रितीरिवाजानुसार लग्न केले आहे. हार्दिक आणि नताशाच्या लग्नात त्यांचा दोन वर्षांचा मुलगा वऱ्हाडी म्हणून आला होता. हे लग्न त्यांच्यासाठी खूप खास आहे. नताशा पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे, तर हार्दिक पांड्या काळ्या रंगाच्या सूटमध्ये दिसून येत आहे. याआधी हार्दिक आणि नताशा यांनी 2020 च्या लॅाकडाऊनमध्ये लग्न केले होते.
हार्दिक पांड्याचा मुलगा अगस्त्य त्याच्या आई-वडिलांच्या लग्नात खूप आनंदी दिसून येत होता. तिघेही खूप छान दिसत होते. अनेक क्रिकेटर आणि बॅालिवूड कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत.