Miss Universe home at New York: हरनाज संधू न्यूयॉर्कमधील तिच्या मिस युनिव्हर्स अपार्टमेंटमध्ये पोहोचली, पाहा कसं दिसतं हे घर

बी टाऊन
Updated Jan 17, 2022 | 15:28 IST | टाइम्स नाऊ मराठी

Miss Universe home at New York: मिस युनिव्हर्सचा किताब जिंकल्यानंतर हरनाज संधू आता मिस युनिव्हर्सच्या अपार्टमेंटमध्ये राहायला पोहोचलेली आहे. तिचं हे घर आतून कसं दिसतं हे पाहा.

Harnaz Sandhu arrives at her Miss Universe apartment in New York
मिस युनिव्हर्स अपार्टमेंटमधील हरनाज संधूचे घर  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • मिस युनिव्हर्स अपार्टमेंटमधील हरनाज संधूचे घर
  • मिस यूएससोबत घर शेअर करणार हरनाज संधू
  • भव्य आणि स्वप्नवत मिस युनिव्हर्सचे घर

Miss Universe home at New York: २०२१ मध्ये मिस युनिव्हर्सचा किताब जिंकणारी हरनाज संधू ही लारा दत्ता नंतरची तिसरी भारतीय वंशाची महिला आहे. मिस युनिव्हर्स जिंकणाऱ्या महिलेला एका वर्षासाठी अनेक सुविधा दिल्या जातात. मिस युनिव्हर्स विजेत्याला न्यूयॉर्कमध्ये राहण्यासाठी एक वर्ष मोफत अपार्टमेंट दिले जाते. त्याचबरोबर आता हरनाज तिच्या मिस युनिव्हर्सच्या घरात पोहोचली आहे. हरनाज तिच्या न्यूयॉर्कच्या घरी पोहोचली आहे पण कोरोनामुळे हरनाज अजूनही क्वारंटाईनमध्ये आहे.

न्यूयॉर्कमध्ये या घरात हरनाज एकटी नसून तिला मिस यूएससोबत हे घर शेअर करावे लागणार आहे. हे अपार्टमेंट चांगले डिझाइन केलेले आहे. यापूर्वी मिस युनिव्हर्सचा किताब पटकावलेली आंद्रिया मेस आणि मिस यूएस राहिलेली आसिया शाखा या अपार्टमेंटमध्ये राहात होत्या.

मिस युनिव्हर्ससाठी कपड्यांपासून ते किराणा सामानापर्यंत सर्व काही या अपार्टमेंटमध्ये वर्षभर मोफत उपलब्ध असेल. यामध्ये वर्षभरात जो काही खर्च केला जातो, तो मिस युनिव्हर्स ऑर्गनायझेशनद्वारे केला जातो. या घरात प्रवेश करताना मिस युनिव्हर्सने एक व्हिडिओ जारी केला आहे.


2020 ची मिस युनिव्हर्स झालेल्या आंद्रियाने हरनाजला एक पत्र लिहिले आहे. त्या पत्रात अँड्रियाने लिहिले की, 'नव्या मिस युनिव्हर्सच्या नवीन घरात स्वागत आहे, मला आजही तो दिवस आठवतोय जेव्हा मी त्या घरात पहिल्यांदा प्रवेश केला होता. या नवीन शहरात माझे जीवन सुरू करण्यासाठी मी त्यावेळी खूप उत्सुक होते. 

मला माहित आहे की घर आणि आपल्या लोकांपासून दूर राहणे किती कठीण आहे. कधीही एकटे वाटू नका, मिस युनिव्हर्सची संपूर्ण संस्था तुमच्या पाठीशी आहे. येथे जर तुमच्यात काही कमतरता असेल किंवा एखाद्या मित्राकडून सल्ल्याची आवश्यकता असेल, तर मी नेहमी तुझ्यासाठी आहे, अँड्रिया.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी