लग्नाच्या आधी हेजलच्या या वागण्यामुळे प्रचंड संतापला होता युवराज, फोन नंबर केला होता डिलीट

बी टाऊन
Updated Feb 28, 2021 | 11:34 IST | टाइम्स नाऊ मराठी

Hazel Keech Birthday: युवराज सिंगची पत्नी हेजल कीच आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. हेजलला इंप्रेस करण्यासाठी युवराज सिंगला बरेच कष्ट घ्यावे लागले होते. जाणून घ्या या दोघांची प्रेमकहाणी.

Hazel Keech and Yuvraj Singh
लग्नाच्या आधी हेजल कीचच्या या वागण्यामुळे प्रचंड भडकला होता युवराज सिंह, फोन नंबर केला होता डिलीट 

थोडं पण कामाचं

  • बॉलिवूड अभिनेत्री हेजल कीचचा आज वाढदिवस
  • हेजल कीचने 2016मध्ये युवराज सिंहशी केला होता विवाह
  • हेजलला मनवण्यासाठी युवराज सिंगला करावी लागले होते बरेच कष्ट

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood actress), बिग बॉसची स्पर्धक (Bigg Boss contestant) हेजल कीच (Hazel Keech) आज आपला वाढदिवस (birthday) साजरा करत आहे. हेजल कीचचे खरे नाव (real name) गुरबसंत सिंह (Gurbasant Singh) आहे. तिचे वडील (father) ब्रिटिश (British) होते तर तिची आई (mother) भारतीय वंशाची (Indian origin) होती. हेजलने 2016मध्ये भारतीय क्रिकेटपटू (cricketer) युवराज सिंगशी (Yuvraj Singh) लग्न (marriage) केले होते.

हेजलला मनवण्यासाठी युवराज सिंगला करावी लागले होते बरेच कष्ट

हेजल कीचला मनवण्यासाठी युवराज सिंगला बरेच कष्ट करावे लागले होते. फक्त कॉफी पिण्यासाठी तिला नेण्यासाठी युवराजला तीन वर्षे लागली होती. युवराजच्या म्हणण्यानुसार तो जेव्हा कधी हेजलला कॉफीसाठी विचारत असे तेव्हा ती लगेच हो म्हणत असे. त्याने एका मुलाखतीत सांगितले होते की कॉफी डेटला जाण्याच्या दिवशी ती आपला फोन बदलत असे. यामुळे नाराज होऊन युवराज सिंगने हेजल कीचचा फोन नंबर आपल्या फोनमधून डिलीट करून टाकला होता.

फेसबूकवर फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली नाही

युवराज सिंगला हेजलचा फेसबूकवर मित्र होण्यासाठीही बरेच काही करावे लागले होते. हेजल कीचने तब्बल तीन महिन्यांनंतर युवराज सिंगची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली होती. यानंतर या दोघांमध्ये बोलणे चालू झाले.

युवराज मला आवडतो याची जाणीवच नव्हती- हेजल

युवराजच्या म्हणण्यानुसार त्या दोघांच्या काही कॉमन मित्रमैत्रिणींमुळे त्यांची पहिली डेट शक्य झाली. यानंतर ते दोघे सतत भेटत राहिले. मात्र हेजलने सांगितले होते की आपल्याला युवराज आवडू लागला आहे याची जाणीव तिला अजिबातच नव्हती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी