Helen birthday: सलमान खानची सावत्र आई हेलनने १९व्या वर्षी केले होते आयटम साँग, सौंदर्यावर भाळले सलीम खान

बी टाऊन
Updated Nov 21, 2020 | 12:41 IST | टाइम्स नाऊ मराठी

Helen birthday: ७००पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केलेल्या हेलन यांचे आयुष्य अनेक समस्यांनी भरलेले होते. आज हेलन यांचा वाढदिवस आहे. याच निमित्ताने जाणून घेऊया हेलन यांच्याबद्दल काही गोष्टी.

Bollywood item girl Helen
Helen birthday: १९व्या वर्षी सलमान खानची सावत्र आई हेलनने केले होते आयटम साँग, सौंदर्यावर भाळले सलीम खान 

थोडं पण कामाचं

  • २१ नोव्हेंबर १९३८मध्ये म्यानमार (पूर्वीचा बर्मा) येथे झाला होता हेलन यांचा जन्म
  • १९५७मध्ये हेलनने २७ वर्षांनी मोठ्या असलेल्या दिग्दर्शक पी. एन. अरोडा यांच्याशी केला होता विवाह
  • यानंतर चार मुलांचा पिता असलेल्या सलीम खान यांच्याशी केले दुसरे लग्न

Helen lesser known facts: ५० आणि ६०च्या दशकात आपल्या आयटम साँग्सनी (Item songs) धुमाकूळ घालणाऱ्या (popular) आणि आपल्या दिलखेचक अदाकारीने वेड लावणाऱ्या हेलन (Helen) यांचा आज ८२वा वाढदिवस (birthday) आहे. १९व्या वर्षीही हेलन यांच्यावर नजर खिळून राहात असे. त्यांच्या नृत्यात (dance) नजाकत (grace) आणि उत्साह (enthusiasm) होता. जेव्हा त्या त्यांच्या आयटम साँगवर थिरकत तेव्हा प्रेक्षक घायाळ होऊन जात. प्रत्येक चित्रपटात त्यांचे आयटम साँग असलेच पाहिजे हा जणू नियम होता. आपल्या नृत्याने लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या हेलन यांच्या आयुष्याबद्दल (Helen’s life) ऐकून आपल्या अंगावर काटा येईल. जाणून घेऊया हेलन यांनी आपल्या संघर्षमय जीवनातून (full of struggle) चित्रपटसृष्टीत (film industry) कसे पदार्पण केले.

संघर्षांनी भरलेले होते हेलन यांचे जीवन

२१ नोव्हेंबर १९३८मध्ये म्यानमार (पूर्वीचा बर्मा) येथे हेलन यांचा जन्म झाला. त्यांचे जीवन संघर्षांनी भरलेले होते. बॉलिवूडमधील हा प्रवास त्यांच्यासाठी खूप खडतर होता. हेलन या मूळच्या म्यानमारच्या होत्या. त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या आईने एका ब्रिटिश जवानाशी विवाह केला. हेलन यांचे पूर्ण कुटुंब भारतात येऊन स्थायिक झाले. इथे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

सुरुवातीला बॅकग्राऊंड डान्सर म्हणून केले काम

हेलन यांच्या आईने कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी कोलकातामध्ये परिचारिकेची नोकरी केली. मात्र त्यांच्या पगारातून कुटुंबाचा खर्च भागवणे अवघड होऊ लागले. तेव्हा हेलन यांनी स्वतः काम करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांची गाठ कुक्कू मोरे यांच्याशी पडली. यानंतर कुक्कू यांनी हेलन यांना चित्रपटांमध्ये बॅकग्राऊंड डान्सरचे काम दिले. आपले नृत्यकौशल्य आणि प्रतिभेच्या जोरावर १९व्या वर्षी हेलन यांनी हावडा ब्रिज या चित्रपटातल्या आपल्या आयटम साँगने धमाल उडवून दिली आणि त्या बॉलिवूडमधील पहिल्या आयटम गर्ल झाल्या.

पहिल्या विवाहानंतर हेलन यांना व्हावे लागले होते दिवाळखोर

हेलन यांनी १९५७मध्ये त्यांच्यापेक्षा २७ वर्षांनी मोठ्या असलेल्या दिग्दर्शक पी. एन. अरोडा यांच्याशी विवाह केला. पण १८ वर्षांनंतर १९७४मध्ये हेलन यांनी त्यांच्याशी घटस्फोट घेतला. पी. एन. अरोडा हे हेलन यांच्या पैशावर मजा मारत असल्याचे त्यांचे म्हणणे होते. यामुळे त्यांना त्यांच्या वैयक्तिकक आयुष्यात अनेक समस्यांचा सामना करावा लागला आणि एकेकाळी आर्थिक परिस्थिती इतकी बिघडली की त्यांचा बंगला सील करण्यात आला आणि त्या दिवाळखोरीच्या मार्गावर येऊन पोहोचल्या.

दुसऱ्यांदा सलीम खान यांच्याशी केला प्रेमविवाह

एका चित्रपटाच्या कामादरम्यान हेलन यांची भेट सलीम खान यांच्याशी झाली. हेलन यांच्या अदाकारीवर अनेकजण त्यावेळी फिदा होते. हेलन यांचे सौंदर्य पाहून सलीम खान हे त्यांच्या प्रेमात पडले आणि त्यांचे लग्न झालेले असूनही सलीम यांनी हेलन यांच्याशी लग्न केले.

हेलन यांची आयटम साँग्स आजही आहेत प्रसिद्ध

हेलन यांची आयटम साँग्स आजही तितकीच प्रसिद्ध आहेत. पिया तू अब तो आ जा, ओ हसीना जुल्फों वाली, ऐ नवजवान, हाय मेरे पास अशी त्यांची गाणी आजही ऐकली-पाहिली जातात आणि तितकाच धुमाकूळ अजूनही घालतात. हेलन यांना अनेक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे ज्यात पद्मश्री पुरस्कार आणि फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्काराचाही समावेश आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी