मुंबई: बॉलिवूड सिनेमांमध्ये होणारा रोमान्स कायमच फिल्मी असतो. त्यात बरेच ट्विस्ट येतात, बऱ्याच घडामोडी घडतात आणि अखेर हिरो-हिरॉईन एकत्र येताना दिसतात. मोठ्या पडद्यावर अशा विविध पद्धतीने रोमँटिक गोष्टी साकारणाऱ्या काही नावाजलेल्या बॉलिवूड अभिनेत्रींनी खऱ्या आयुष्यात सुद्धा हटके रोमान्स केला आहे. बॉलिवूडच्या काही अभिनेत्रींनी खऱ्या आयुष्यात सुद्धा रोमान्स करताना असाच काहीचा फिल्मी प्रवास पार केला आहे. या अभिनेत्रींनी आधीच विवाहित असलेल्या पुरुषांची लग्न केलं आहे. या लिस्टमध्ये बऱ्याच मोठ्या नावांचा समावेश असून नेमका कसा होता त्यांचा रोमँटिक प्रवास चला पाहूया.
हेमा मालिनी: बॉलिवूडची ड्रीम गर्ल असलेल्या हेमा मालिनी यांनी जेव्हा धर्मेंद्र यांच्याशी लग्न केलं तेव्हा ते आधीपासूनच विवाहित होते. धर्मेंद्र यांचा पहिला विवाह प्रकाश कौर यांच्याशी झाला होता आणि त्यांना त्यातून सनी देओल, बॉबी देओल, विजीता देओल आणि अजिता देओल ही चार अपत्य होती. पण धर्मेंद्र हेमा मालिनी यांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्याशिवायच हेमा यांच्याशी लग्न सुद्धा केलं. पण हेमा ह्यांच्याशी लग्न करण्यापूर्वी त्यांनी इस्लाम धर्म कबूल केला आणि 1980 साली हेमा यांच्याशी ते विवाहबंधनात अडकले.
शिल्पा शेट्टी: अभिनेत्री शिल्पा शेट्टीनं 2009 साली बिझनेसमन राज कुंद्रा यांच्याशी लग्न केलं. हे लग्न व्हायच्या आधी हे दोघं जवळपास दोन वर्षे एकमेकांना डेट करत होते. 22 नोव्हेंबर 2009 रोजी अखेर या दोघांनी लग्न केलं. शिल्पाच्या आधी राज यांचं कविता यांच्याशी लग्न झालं होतं ज्यातून त्यांना दोन मुली होत्या. पण कविता यांच्यासोबत राज यांचा संसार फार काळ टिकू शकला नाही आणि त्यातून त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर त्यांनी शिल्पाशी लग्न केलं.
करिना कपूर खान: बॉलिवूडची ए-लिस्ट अभिनेत्री असलेली करिना कपूर 2012 साली करिना कपूर खान झाली. तिने लॉन्ग टाइम बॉयफ्रेंड सैफ अली खानसोबत लग्नाचा निर्णय घेतला. करिनाच्या आधी अमृता सिंग या बॉलिवूडचा एक काळ गाजवलेल्या अभिनेत्रीसोबत सैफ विवाहबंधनात अडकलेले होते. त्यातून त्यांना सारा अली खान आणि इब्राहिम ही दोन मुलं आहेत. १३ वर्ष एकत्र राहिल्यानंतर अमृता आणि सैफ यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता आणि 2004 साली ते दोन वेगळे सुद्धा झाले. त्यानंतर काही वर्षांनी सैफ आणि करिना एकमेकांना डेट करू लागले आणि अखेर 2012 साली विवाहबंधनात अडकले.
करिष्मा कपूर: अभिनेत्री करिश्मा कपूर करिअरच्या अगदी पीक वर असताना 2003 साली लग्नाच्या बेडीत अडकली. इंडस्ट्रियलिस्ट संजय कपूर यांच्यासोबत 29 सप्टेंबर 2003 रोजी करिष्मा हिचा विवाह सोहळा पार पडला. जिथे करिष्मा हिचं हे पहिले लग्न होतं तिथे संजयचं हे दुसरं लग्न असून त्यांनी त्याआधीच आपल्या पत्नीपासून घटस्फोट घेतला होता. या लग्नातून करिष्मा आणि संजय यांना लेक समायरा आणि कियान हा मुलगा आहे. दुर्दैवाने, करिष्मा आणि संजयचं हे लग्न सुद्धा फार काळ टिकू शकलं नाही आणि 2010 साली दोघं वेगळे झाले.
रविना टंडन: 2004 साली अभिनेत्री रविना टंडन डिस्ट्रीब्यूटर अनिल थडानी यांच्यासोबत लग्नबंधनात अडकली. राजस्थानच्या उदयपुरमध्ये या दोघांचा लग्न सोहळा रंगला. रविनाच्या आधी अनिल यांचे लग्न नताशा सिप्पी यांच्यासोबत झालं होता. पण त्यानंतर त्या दोघांनी घटस्फोट. रविना आणि अनिल यांना मुलगी राशा आणि मुलगा रणबीर वर्धन ही अपत्य आहेत.
राणी मुखर्जी: बॉलिवूडचे टॉप अभिनेत्रींपैकी एक असणारी राणी मुखर्जीने सुद्धा 21 एप्रिल 2014 साली एका प्रायव्हेट सोहळ्यात फिल्म मेकर आदित्य चोप्रा यांच्याशी लग्न केलं. हे लग्न इटलीमध्ये पार पडलं होतं, ज्याबद्दल बरीच गोपनीयता पाळली गेली होती. राणीच्या आधी आदित्य पायल खन्नासोबत 2001 मध्ये लग्न बंधनात अडकले होते. पण आठ वर्षानंतर 2009 साली या दोघांचा घटस्फोट झाला. पायल यांच्यासोबत घेतलेल्या घटस्फोटानंतर आदित्य यांनी राणीशी लग्न केलं. 9 डिसेंबर 2015 रोजी आदित्य आणि राणीच्या घरी अदिरा या त्यांच्या कन्यारत्नाचं आगमन झालं.
अमृता अरोरा: अभिनेत्री अमृता अरोरा हिने 2009 साली बिझनेसमॅन शकील यांच्याशी लग्न केलं. 4 मार्च 2009 रोजी ख्रिश्चन पद्धतीने या दोघांचा विवाह रंगला तर 6 मार्च 2009 रोजी या दोघांनी मुस्लिम पद्धतीने निकाह केला. अमृताच्या आधी निशा राणा यांच्यासोबत शकील यांचं लग्न झालं होतं. या दोघांचं लग्न सुद्धा फार काळ टिकू शकलं नाही आणि नंतर त्यांनी घटस्फोटाचा मार्ग स्वीकारला. यानंतर शकील यांनी अमृतासोबत लग्न केलं या लग्नातून त्यांना दोन मुलं अजान आणि रयान आहेत.