Heropanti 2 OTT Release Date | मुंबई : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफचा समावेश त्या अभिनेत्यांमध्ये आहे ज्यांचे चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट चाहते आतुरतेने पाहत असतात. मात्र अलीकडेच त्याचा प्रदर्शित झालेला चित्रपट हिरोपंती २ चित्रपट बॉक्स ऑफिसवर पूर्णपणे फ्लॉप ठरला. हा चित्रपट २९ एप्रिल रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने प्रदर्शित झाल्याच्या पहिल्या दिवशी सुमारे ७ कोटी रूपयांची कमाई केली होती. जी गेल्या चार वर्षांत रिलीज झालेल्या टायगरच्या चित्रपटांपैकी पहिल्या दिवशीची सर्वाधिक कमाई होती. मात्र नंतरची कमाई काही खास ठरली नाही. (Heropanti will be screened on OTT on April 29).
अधिक वाचा : अपरा एकादशीच्या दिवशी या १० नियमांचे करा पालन, वाचा सविस्तर
दरम्यान, आता हा चित्रपट प्रेक्षकांपर्यंत नेण्यासाठी निर्मात्यांनी ओटीटीचा सहारा घेतला आहे. Amazon Prime Video ने आज Heropanti 2 च्या खास स्ट्रीमिंग प्रीमियरची घोषणा केली आहे, जी २७ मे २०२२ पासून स्ट्रीम होणार आहे. टायगर श्रॉफ, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि तारा सुतारिया यांच्यासोबत अमृता सिंग आणि झाकीर हुसेन स्टारर हिरोपंती २ चे दिग्दर्शन अहमद खान यांनी केले आहे. तसेच साजिद नाडियादवाला यांच्या नाडियादवाला ग्रॅंडसन एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली त्याची निर्मिती करण्यात आली आहे.
टायगर श्रॉफ आणि साजिद नाडियादवाला यांचा ब्लॉकबस्टर कॉम्बिनेशन चित्रपट २७ मे २०२२ रोजी Amazon Prime Video वर स्ट्रीम करण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटात कधीही न पाहिलेल्या ॲक्शनसह, टायगर श्रॉफ त्याच्या नवनवीन अनोख्या ॲक्शनने सर्वांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे.
चित्रपटाची स्टोरी बबलूवर (टायगर श्रॉफ) केंद्रीत आहे, जो एक कॉम्प्यूटर प्रतिभाशाली आहे आणि इनाया (तारा सुतारिया) वर आधारित आहे, जी एक स्वयं-निर्मित अरबपती आहे. दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात पण स्टोरीतील ट्विस्टमुळे ते अचानक वेगळे होतात. त्यांच्या या स्टोरीचा प्रेक्षकांवर फारसा प्रभाव पडलेला दिसून येत नाही.