हिना खानच्या बॉयफ्रेंडने रोमॅन्टिक फोटो शेअर करत म्हटलं...

बी टाऊन
Updated Jun 12, 2019 | 12:21 IST | टाइम्स नाऊ हिंदी

हिना खानचा बॉयफ्रेंड रॉकी जैसवाल याने नुकतेच काही रोमॅन्टिक फोटो शेयर केले आहेत. हे हिना आणि रॉकी यांच्या मिलान ट्रिपचे थ्रोबॅक फोटोज आहेत. या फोटोबद्दल अधिक जाणून घ्या...

Hina Khan and Rocky Jaiswal
हिना खान आणि रॉकी जैसवाल  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: टीव्ही कलाकार आणि त्यांचं व्यक्तिगत आयुष्य, त्यांचे प्रेमसंबंध हे नहमीच चाहत्यांसाठी चर्चेचा विषय बनतं आले आहे. आता अशाच प्रेमसंबंधामुळे अभिनेत्री हिना खान चर्चेत आली आहे. अभिनेत्री हिना खानने “ये रिश्ता क्या कहलाता है” या टीव्ही शो मधून आपल्या करिअरची सुरूवात केली आहे. प्रेक्षकांनीही तीला नेहमीच भरभरुन प्रेम दिलं. त्यामुळे आज ती प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री बनली आहे. तिच्या व्यक्तिगत आयुष्यात घडणाऱ्या छोट्या-छोट्या गोष्टींवर चाहत्यांचे लक्ष्य लागून असतं. प्रेक्षकांची मनं जिंकलेल्या अभिनेत्री हिना खानची लव्ह स्टोरी खूपच खास आहे.

नुकतंच रॉकी जैसवालने आपल्या सोशल मीडियावर "मिलान ट्रिप"चे काही फोटोज शेअर केले आहेत. यामधील दोन फोटोजमध्ये हिना खानही त्याच्या सोबत दिसत आहे. या सेल्फीमध्ये दोघांनीही सनग्लासेस घातलेले आहेत. तर हिना रॉकीच्या गळ्यात हात टाकून पोज देत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये रॉकीने लिहिलं, “हे फोटोज हिना खानच्या आगामी चित्रपट विश लिस्टच्या शूटिंग दरम्यानचे आहेत.” तसेच रॉकी आपल्या लव्ह स्टोरीबद्दल लिहितो की, “विश लिस्ट फिल्म शूटींग शेड्युलमधुन थोडा वेळ काढत एक सदाबहार, चिरस्थायी प्रेम कथा आपल्या प्रेमाचे काही क्षण जगताना.”. हिना आणि रॉकीच्या या रोमॅटिक फोटोजला हिना खानचे फॅन्सही पसंती देत आहेत. ते यावर टूगेदर फॉरएव्हर, कपल गोल्स अश्या कमेंट्स करत आहेत.

हिना खान आणि तिचा बॉयफ्रेंड रॉकी जयस्वाल यांची पहिली भेट “ये रिश्ता क्या कहलाता है” या टीव्ही शोच्या सेटवर झाली होती. रॉकी जैलवाल शोचे प्रोड्यूसर होते. याच शोच्या शूट दरम्यान त्यांना एकमेकांवर प्रेम झाले. इतक्या वर्षानंतरही त्यांचे एकमेकांवरील प्रेम कायम आहे. रॉकी आणि हिना यांचे व्यक्तिगत नात्याबरोबरच प्रोफेशनल नातं ही घट्ट आहे. हिना विविध प्रसंगी रॉकीसोबत फोटो शेअर करत असते. 

खरतर हिना खान कान्स फिल्म फेस्टिवलसाठी फ्रान्सला पोहोचली होती. जेथे तिच्या पहिल्या फिल्मचे स्पेशल स्क्रीनिंगही होणार होते. हिनाचा "लायन्स" चित्रपट भारतात रिलीज होण्याआधीच तिला दूसरा चित्रपटही मिळाला आहे. हिना युरोपमध्ये तिच्या आगामी "विश लिस्ट" या सिनेमासाठी शूट करत होती. यादरम्यान तिचा बॉयफ्रेंड रॉकीही तीच्या सोबत होता. हिनाने सुद्धा या युरोप ट्रिपचे अनेक फोटोज शेअर केले आहेत.  

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

If love had a personality, it would surely be like you @realhinakhan ! US forever!

A post shared by Rocky Jaiswal (@rockyj1) on

यूरोप ट्रिपनंतर हिना आणि रॉकी दोघे सोबतच भारतात परतले होते. या जोडीची एअरपोर्टवरील काही फोटोजही सोशल मीडियात व्हायरल झाले होते. ज्या फोटोजमध्ये हिनाची आई तिचे स्वागत करताना दिसत आहे. हिनाने काही दिवसांपूर्वी "कसौटी जिंदगी की २" या टीव्ही शोला रामराम ठोकला होता. शोमध्ये तिचं पात्र कोमोलिकावरुन लक्ष हटवत मिस्टर बजाजची एन्ट्री झाली आहे. तर करण सिंग ग्रोवरने शोमध्ये मिस्टर बजाजची भुमिका साकारत आहे.   

चित्रपटाच्या व्यतिरिक्त हिना खान सुप्रसिद्ध गायक अरजित सिंग याच्या एका म्युझिक व्हिडिओ “रांझना”मध्ये दिसणार आहे. या गाण्यात हिना बिग बॉस स्पर्धक प्रियांका शर्मासोबत स्क्रीन शेअर करणार असल्याचे वृत्त आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
हिना खानच्या बॉयफ्रेंडने रोमॅन्टिक फोटो शेअर करत म्हटलं... Description: हिना खानचा बॉयफ्रेंड रॉकी जैसवाल याने नुकतेच काही रोमॅन्टिक फोटो शेयर केले आहेत. हे हिना आणि रॉकी यांच्या मिलान ट्रिपचे थ्रोबॅक फोटोज आहेत. या फोटोबद्दल अधिक जाणून घ्या...
Loading...
Loading...
Loading...