हिंदूस्थान का शेर सम्राट पृथ्वीराज चौहान आ रहा है, अक्षय कुमारच्या चित्रपटाचा टीझर रिलीज

बी टाऊन
Updated Nov 15, 2021 | 14:17 IST | टाइम्स नाऊ मराठी

पृथ्वीराज फर्स्ट लूक टीझर पृथ्वीराजची कथा भारतीय इतिहासाच्या पानांवरून समोर आली आहे. चाणक्य टीव्ही मालिका आणि पिंजर सारख्या मोठ्या पडद्यावरील चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेले डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांचे दिग्दर्शन. पृथ्वीराज हा अक्षय कुमारचा पहिला ऐतिहासिक चित्रपट आहे.

teaser release of Akshay Kumar's 'Prithviraj' movie
अक्षय कुमारच्या पृथ्वीराज चित्रपटाचा टीझर रिलीज  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज' चित्रपटाचा टीझर रिलिज
  • सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या धैर्याची आणि त्यागाची गाथा
  • पृथ्वीराजमध्ये अक्षय कुमार, मानुषी छिल्लर, सोनू सूद, संजय दत्त.

नवी दिल्ली : अक्षय कुमार (Akshay Kumar) चा दिवाळीत रिलीज झालेला 'सूर्यवंशी' (Suryavanshi) चित्रपटगृहांमध्ये चांगलीच कमाई करत आहे. आणि आता, त्याचा पुढचा चित्रपट पृथ्वीराज (Prithviraj) च्या रिलीजची तयारी सुरू झाली आहे, सोमवारी या चित्रपटाचा फर्स्ट लूक (First look) टीझर (teaser) प्रदर्शित करण्यात आला. अक्षयच्या या चित्रपटाची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. (Hindusthan ka sher aa raha hai, teaser release of Akshay Kumar's 'Prithviraj' movie)

पृथ्वीराजाची कथा भारतीय इतिहासाच्या पानांवरून घेतली आहे. टीव्हीवरील चाणक्य आणि मोठ्या पडद्यावर पिंजर सारख्या चित्रपटांसाठी ओळखले जाणारे डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी दिग्दर्शित केले आहे. पृथ्वीराज हा अक्षय कुमारचा पहिला ऐतिहासिक चित्रपट आहे. त्याचबरोबर द्विवेदी यांचा पहिला बिग बजेट आणि स्टारकास्टचा चित्रपट आहे.

चित्रपटातील सर्व मुख्य पात्रांची ओळख टीझरमध्ये करण्यात आली आहे. हिंदू सम्राट पृथ्वीराज चौहानच्या भूमिकेत अक्षय कुमार, संयोगिताच्या भूमिकेत नवोदित मानुषी छिल्लर, कवी चांदबरदाईच्या भूमिकेत सोनू सूद. मात्र, संजय दत्तच्या व्यक्तिरेखेबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.

टीझरची सुरुवात युद्धभूमीपासून होते. आवाज येतो -  जिसके पीछे सौ सिर, सौ सामंत, वचन और वतन के लिए सिर कटाने को तैयार हों, वो सम्राट पृथ्वीराज चौहान होता है। या लाइननंतर अक्षय कुमारचे पृथ्वीराजचे पात्र म्यानातून तलवार काढताना रणांगणात उतरते. अशा आणखी काही लाइन ऐकायला मिळतात - सभी सलामी के लिए तैयार हों, हिंदुस्तान का शेर आ रहा है।  संजय दत्त, सोनू सूद, मानुषी छिल्लर आपापल्या भूमिकेत दिसत आहेत. पृथ्वीराजाचे राज्य आणि युद्धभूमीची दृश्ये व्हॉईस ओव्हर्समध्ये एकमेकांना छेदत राहतात.

डॉ द्विवेदी यांनी चित्रपटाचे लेखनही केले आहे. कथेचा मुख्य भाग पृथ्वीराज आणि संयोगिता यांच्या प्रेमकथेवर आधारित असल्याचे टीझरच्या दृश्यांवरून दिसते. तथापि, व्हॉईस ओव्हर हे स्पष्ट करते की निर्माते चित्रपटाद्वारे केवळ एक प्रेमकथा दाखवणार नाहीत, सम्राट पृथ्वीराज चौहान यांचा धर्मासाठीचा लढा देखील कथेचा एक प्रमुख भाग असू शकतो. पृथ्वीराजची निर्मिती यशराज फिल्म्सने केली आहे. पुढील वर्षी 21 जानेवारीला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी