Coronavirus: हॉलिवूड कपल टॉम हँक्स - रिता विल्सनला कोरोनाची लागण, ऑस्ट्रेलियात सुरू होतं शूट

बी टाऊन
Updated Mar 12, 2020 | 13:23 IST | टाइम्स नाऊ मराठी

Tom Hanks Rita Wilson Have Coronavirus: हॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते ऑस्कर पुरस्कार विजेते अभिनेते टॉम हँक्स सध्या ऑस्ट्रेलियात चित्रपटाचं शूटिंग करत आहेत. त्यांना आणि त्यांच्या पत्नीला कोरोनाची लागण झालीय.

Tom Hanks and Rita Wilson
हॉलिवूड कपल टॉम हँक्स - रिता विल्सनला कोरोनाची लागण  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • हॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते टॉम हँक्स कोरोनाग्रस्त
  • टॉम यांची पत्नी रिता विल्सन यांची सुद्धा कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आलीय.
  • हे हॉलिवूड कपल सध्या ऑस्ट्रेलियात आहे. टॉम यांच्या चित्रपटाचं सुरू होतं शूटिंग

हॉलिवूड अभिनेता टॉम हँक्स कोरोना व्हायरसनं पीडित आहेत. टॉम यांनी बुधवारी सांगितलं की त्यांना आणि त्यांच्या पत्नी रिता विल्सन यांना कोरोनाची लागण झाली आहे. ६३ वर्षीय ऑस्कर पुरस्कार विजेते अभिनेते टॉम हँक्स सध्या ऑस्ट्रेलियात आहेत. जिथं ते प्रसिद्ध गायक एल्विस प्रेस्ली यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाची तयारी करत होते.

टॉम हँक्सनं सोशल मीडियावर सांगितलं, ‘नमस्कार मित्रांनो... रिता आणि मी ऑस्ट्रेलियामध्ये आहे. आम्हाला थोडं थकलेलं जाणवत होतं. आम्हाला सर्दी झाली आहे. सोबतच शरीर दुखतंय. रिताला थंडी वाजत होती आणि नंतर थोडा तापही आला. अशात आम्ही जो जगानं पर्याय निवडायला हवाय तसाच कोरोना व्हायरसची टेस्ट करायचा पर्याय निवडला. ही रिपोर्ट पॉझिटिव्ह आलीय.’

टॉम हँक्सनं पुढे हे सुद्धा सांगितलं की, त्यांची आणि रिता विल्सन यांच्या तब्येतीचं परिक्षण केलं जातंय. त्यांच्या तब्येतीवर लक्ष दिलं जातंय आणि सुरक्षा दिली जात आहे. जोपर्यंत तब्येत बरी होत नाही आणि ते कोरोना मुक्त होत नाहीत तोपर्यंत त्यांच्यावर सुरक्षेचं लक्ष ठेवलं जाणार आहे.

टॉम यांचे चित्रपट दिग्दर्शक बाज लुहरमन यांनीही याबाबतीत आपली प्रतिक्रिया दिलीय. ते म्हणाले, ‘चित्रपटाच्या सर्व सदस्यांच्या आरोग्याला आणि सुरक्षेला नेहमीच सर्वौच्च प्राधान्य दिलं जातंय. आम्ही प्रत्येकाचा बचाव करण्यासाठी योग्य ती सावधगिरी बाळगतोय. जे संपूर्ण जगात आमच्या प्रॉडक्शन टीमचं काम करत आहेत.’ आतापर्यंत ऑस्ट्रेलियामध्ये कोरोना व्हायरसचे १२० प्रकरणं पॉझिटिव्ह आढळली आहे.

 

हॉलिवूड अभिनेता टॉम हँक्स सध्या आपल्या अपकमिंग चित्रपटात प्रेस्लीच्या मॅनेजर कर्नल टॉम पार्करची भूमिका साकारतोय. ज्यांनी १९५०च्या दशकामध्ये प्रसिद्ध गायकला स्टारडमसाठी तयार केलं होतं. चित्रपटाचं दिग्दर्शन बाज लुहरमन करत आहे. सोबतच चित्रपटाचं पुढील शूटिंग सोमवारपासून सुरू होणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...