अमित शहांनी बघितला अक्षय कुमारचा सम्राट पृथ्वीराज आणि दिली 'ही' प्रतिक्रिया

Home Minister Amit Shah 'enjoyed watching' Akshay Kumar's Samrat Prithviraj, here's what the political leader said : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याची प्रमुख भूमिका असलेला सम्राट पृथ्वीराज हा हिंदी सिनेमा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बघितला.

Home Minister Amit Shah 'enjoyed watching' Akshay Kumar's Samrat Prithviraj
अमित शहांनी बघितला अक्षय कुमारचा सम्राट पृथ्वीराज आणि दिली 'ही' प्रतिक्रिया 
थोडं पण कामाचं
  • अमित शहांनी बघितला अक्षय कुमारचा सम्राट पृथ्वीराज आणि दिली 'ही' प्रतिक्रिया
  • अमित शहांनी १३ वर्षांनंतर थिएटरमध्ये जाऊन बघितला सिनेमा
  • अमित शहांनी कुटुंबातील सदस्यांसोबत सिनेमा बघितला

Home Minister Amit Shah 'enjoyed watching' Akshay Kumar's Samrat Prithviraj, here's what the political leader said : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याची प्रमुख भूमिका असलेला सम्राट पृथ्वीराज हा हिंदी सिनेमा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बघितला. सिनेमाच्या निमित्ताने भारतीय संस्कृती मोठ्या पडद्यावर बघताना आनंद झाला, अशी प्रतिक्रिया अमित शहा यांनी दिली.

निर्मात्यांनी दिल्लीत सम्राट पृथ्वीराज या सिनेमाचा स्पेशल शो ठेवला होता. सिनेमा बघण्यासाठी राजकीय वर्तुळातील निवडक व्यक्ती आल्या होत्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य पण सिनेमा बघण्यासाठी आले होते. सिनेमा बघिल्यानंतर अमित शहा यांनी सिनेमाविषयी प्रतिक्रिया दिली. केंद्रीय गृहमंत्र्यांनी सम्राट पृथ्वीराज या सिनेमाच्या टीमचे कौतुक केले. सिनेमाच्या निमित्ताने मनोरंजन पण होईल आणि इतिहास समजून घेण्यास मदत होईल, अशा स्वरुपाचे वक्तव्य अमित शहा यांनी केले. सम्राट पृथ्वीराज या सिनेमाच्या निमित्ताने तब्बल १३ वर्षांनंतर कुटुंबातील सदस्यांसोबत सिनेमा बघणे शक्य झाल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले. 

विशेष शो मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सम्राट पृथ्वीराजच्या टीमसोबत थिएटरच्या शेवटच्या रांगेत बसून सिनेमाचा आनंद घेतला. या सिनेमात २०१७ची मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर अक्षय कुमार सोबत भूमिका साकारत आहे. मानुषीचे हे हिंदी सिनेसृष्टीतील पदार्पण आहे. सिनेमाचे दिग्दर्शन चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी केले आहे. हा सिनेमा शुक्रवार ३ जून २०२२ रोजी प्रदर्शित होत आहे. 

सम्राट पृथ्वीराज या सिनेमाच्यानिमित्ताने भारतीय संस्कृतीचे महात्म्य आणि महिला सबलीकरणाला प्राधान्य देणारी मध्ययुगीन भारतीय संस्कृती यांचे छान चित्रण झाले आहे. भारतीय संस्कृतीत महिलांना स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याचे स्वातंत्र्य मध्ययुगातही होते हे या निमित्ताने ठळकपणे लोकांच्या नजरेस येईल; असेही केंद्रीय गृहमंत्री म्हणाले. 

स्पेशल स्क्रीनिंग नंतर केलेल्या छोटेखानी भाषणाचा समारोप करताना अमित शहा यांनी त्यांच्या पत्नीकडे बघितले आणि सिनेमातील एका संवादाचा खुबीने वापर केला. अमित शहा म्हणाले चलो हुकूम (चला महाराणी).... हे ऐकून थिएटरमध्ये हशा पिकला. केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे सिनेमाच्या टीमचा उत्साह आणखी वाढला आहे. शुक्रवारी सिनेमा प्रदर्शित झाल्यावर प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळेल असा विश्वास सिनेमाच्या टीमने व्यक्त केला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी