Poonam Pandey gets married: बॉलिवुड अभिनेत्री पूनम पांडे (Bollywood actress Poonam Pandey) अनेकदा तिच्या हॉट छायाचित्रांमुळे आणि व्हिडीओमुळे चर्चेत (in news because of her hot photos and videos) असते. अशी बातमी येत आहे की तिने गुपचुप लग्न केले (Ponnam got married secretively) आहे आणि तिच्या लग्नाची छायाचित्रे इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत (photos of her wedding getting viral on social media) आहे. यातील दोन छायाचित्रे पूनम पांडेने स्वतः इन्टाग्रामवर शेअर केली आहेत (Poonam shared two of these photos on Instagram) ज्यात ती नववधूच्या वेषात दिसते आहे (Poonam in bride’s dress) आणि तिचा पती सॅम बॉम्बे नवऱ्या मुलाच्या वेषात (her husband Sam Bombay in the attire of a bridegroom) दिसत आहे.
पूनम पांडेने सोशल मीडियावर आपली छायाचित्रे शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘पुढचे सात जन्मही मी तुझ्याबरोबर राहू इच्छिते.’ यानंतर सॅम बॉम्बे यानेही एक छायाचित्र शेअर केले आहे आणि लिहिले आहे, ‘मिस्टर अँड मिसेस बॉम्बे.’
याआधी जुलै महिन्यातही पूनम पांडेने अचानक साखरपुडा करून चाहत्यांना चकित केले होते. त्यांनी साखरपुड्याच्या अंगठीसह फोटो शेअर केले होते.
बॉलिवुड अभिनेत्री पूनम पांडे अनेकदा तिच्या हॉट छायाचित्रांमुळे आणि व्हिडिओमुळे चर्चेत असते. ती सोशल मीडियावर नेहमीच असे काही शेअर करते ज्यामुळे खळबळ माजते. पूनम पांडे सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. तिचा बोल्ड आणि हॉट अवतार तिच्या चाहत्यांना चांगलाच भावतो. तीस लाख लोक तिला इन्स्टाग्रामवर फॉलो करतात.
पूनम पांडे २०११मध्ये क्रिकेट विश्वचषकादरम्यान चर्चेत आली होती जेव्हा तिने भारतीय संघ जिंकल्यास न्यूड होण्याची गोष्ट बोलून दाखवली होती. बीसीसीआयने नकार दिल्यानंतर आणि लोकांनी नाराजी व्यक्त केल्यावर तिने असे काही केले नाही. पूनम पांडेने आपल्या कामाची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती. ‘नशा’ या चित्रपटातून तिने बॉलिवुडमध्ये पदार्पण केले. २०१५मध्ये तिने टीव्हीवर एक कार्यक्रम केला होता.