Malaika Arora: मलायका अरोराचे हॉट आणि बोल्ड फोटोशूट, बॅकलेस ड्रेसमध्ये पोज दिल्याने चाहते घायाळ

बी टाऊन
Updated Dec 18, 2021 | 21:14 IST | टाइम्स नाऊ मराठी

Malaika Arora photoshoot: मलायका अरोराची बोल्ड फॅशन नेहमीच चर्चेत असते. तिच्या उत्कृष्ट आणि ग्लॅमरस लुक्सने चाहत्यांना घायाळ करण्याची एकही संधी मलायका सोडत नाही. नुकत्याच झालेल्या फोटोशूटमध्येही हेच पाहायला मिळाले, मलायकाचे हे फोटो एकसारखे पाहण्याची तुमचीही इच्छा होईल.

Hot and bold photoshoot of Malaika Arora, posing in backless dress
मलायका अरोराचे हॉट आणि बोल्ड फोटोशूट  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मलायका अरोराचे हॉट आणि बोल्ड फोटोशूट
  • मलायकाचे सिझलिंग फोटोशूट पाहून चाहते घायाळ
  • सोशल मीडियावर शेअर केले फोटोज


Malaika Arora hot and bold photoshoot: मलायका अरोरा (Malaika Arora) अशा बॉलीवूड अभिनेत्रींपेकी एक आहे ज्यांच्या स्टाइलिंग सेन्सचा कधीही कंटाळा येत नाही. प्रत्येक वेळी मलायका काही नवीन पोशाख आणि लुक्सने प्रभावित करताना दिसते. अभिनेत्रीच्या सेक्सी लूकवर चाहते फिदा आहेत. वयाच्या 48 व्या वर्षी 20 वर्षांच्या मुलीलाही लाजवेल इतकी मलायका फिट आणि हॉट दिसते. यामुळेच मलायकाच्या फॅशन स्टेटमेंट, स्टाईलची बातच काही और आहे. पार्टी लुक्सपासून ते लग्नाच्या फंक्शन्सपर्यंत.

मलायकाचा सिझलिंग ड्रेस

मलायका अरोरा (Malaika Arora) च्या नुकत्याच झालेल्या फोटोशूटचे काही फोटोज तिची फॅशन स्टायलिस्ट मनेका हरी सिंघानीने तिच्या सोशल मीडियावर शेअर केली आहेत, ज्यात मलायकाचा किलर लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत. अभिनेत्रीने परिधान केलेला हॉट मिनी ड्रेस कोणत्याही कॉकटेल पार्टीसाठी सहजपणे कॅरी केला जाऊ शकतो. ख्रिसमस किंवा न्यू इयर पार्टीला तुम्ही अशा प्रकारचे ग्लिटर ड्रेस घालू शकता.

सिल्व्हर फ्रिंजेसने आऊटफिट तयार केला होता. 

आता मलायका (Malaika Arora) च्या या ड्रेसबद्दल बोलायचे झाले तर तो चांदीच्या झालरपासून बनवला होता. जे एका स्तरित पॅटर्नमध्ये ठेवण्यात आले होते. गोलाकार नेकलाइनसह ड्रेसला स्लीव्हलेस ठेवत, त्याला चमकदार आणि ब्लिंग इफेक्ट देण्यासाठी चमकदार बॉर्डर जोडली होती. हा शॉर्ट आउटफिट वेस्टलाइनवर पूर्णपणे फिट होता, ज्यामुळे तिचे कर्व्सदेखील हायलाइट होत होते. या बॅकलेस ड्रेसमध्ये मलायका फ्लॉंट करताना दिसली, त्यामुळे या स्टायलिश पोशाखात मलायका  एकापेक्षा एक पोझ देत होती.


डायमंड ज्वेलरी आणि मेकअप

त्याच वेळी, पार्टी परिपूर्ण दिसण्यासाठी, मलायका ग्लिटर स्टिलेटोज परिधान करताना दिसली. कानात डायमंडचे झुमके आणि हातात मॅचिंग ब्रेसलेटने तिचा लूक आणखीनच ग्लॅमरस केला होता. मेकअपसाठी, स्मोकी आय-शॅडो, ब्लॅक आयलाइनर, मस्करा, आणि केस मोकळे सोडले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी