Janhvi Kapoor Photos: गरमीच्या दिवसात जान्हवीने साडीसोबत घातला असा ब्लाउज; चाहत्यांना दिला थंडीचा अनुभव 

बी टाऊन
Updated May 04, 2022 | 16:40 IST | टाइम्स नाऊ मराठी

Janhvi Kapoor Saree Photos । दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची लाडकी आणि बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या सौंदर्य आणि फॅशन स्टेंटमेंटच्या जोरावर लोकांच्या मनावर राज्य करत आहे.

Hot photos of Janhvi Kapoor in saree are going viral
गरमीच्या दिवसात जान्हवीने असा ब्लाउज घालून दिला थंडीचा अनुभव  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सध्या जान्हवी कपूरचे फोटो खूप चर्चेत आहेत.
  • जान्हवीने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.
  • जान्हवी कपूर आपल्या चाहत्यांसोबत कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

Janhvi Kapoor Saree Photos । मुंबई : दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची (Sridevi) लाडकी आणि बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) तिच्या सौंदर्य आणि फॅशन स्टेंटमेंटच्या जोरावर लोकांच्या मनावर राज्य करत आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा जान्हवी कपूरने तिचे काही हॉट फोटो शेअर केले आहेत, जे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. (Hot photos of Janhvi Kapoor in saree are going viral). 

जान्हवी कपूर आपल्या चाहत्यांसोबत कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. चाहत्यांना प्रत्येक दिवशीचा तिचा ग्लॅमरस लूक पाहायला मिळत असतात. ट्रेडिशन असो की म वेस्टर्न जान्हवी प्रत्येक लूकने चाहत्यांचे लक्ष वेधत असते. 

अधिक वाचा : बाळासाहेबांचं सूप काढणारे त्यांच्या नावाने जोगवा मागतात

साडीमध्ये जान्हवी कपूर

Janhavi Kapoor

सध्या जान्हवी पुन्हा एकदा तिच्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे. जान्हवीने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, जे पाहून चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

खोल गळ्यातील ब्लाउजने वेधले लक्ष 

Janhavi Kapoor Hot Look

या फोटोंमध्ये ती फिकट हिरव्या रंगाची साडी परिधान करताना दिसत आहे. यासोबत जान्हवीने मॅचिंग डीप नेक ब्लाउज घातला आहे. हा लूक पूर्ण करण्यासाठी तिने न्यूड मेकअप केला आणि केस मोकळे सोडले आहेत. 

साधेपणावर चाहते फिदा 

Janhavi Kapoor latest photo

अभिनेत्रीने मोठ्या कानातल्यांसह लूक एक्सरसाइज केला आहे. आता तिच्या चाहत्यांना जान्हवीची ही स्टाईल खूप आवडली आहे. जान्हवीने तिचे एकूण ४ फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे. दरम्यान तिच्या या साधेपणावर चाहते फिदा झाल्याचे दिसते आहे. 

जान्हवी कपूरचा आगामी चित्रपट

Janhavi Kapoor instagram

जान्हवीच्या वर्कफ्रंट बद्दल भाष्य करायचे झाले तर, जान्हवी शेवटची हॉरर-कॉमेडी चित्रपट 'रुही' मध्ये दिसली होती. ती लवकरच 'गुड लक जेरी'मध्ये दिसणार आहे, ज्याचे शुटिंग सुरू झाले आहे. याशिवाय ती करण जोहरच्या प्रोडक्शनमधील 'दोस्ताना २' या चित्रपटात दिसणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी