House of The Dragon : 'House of The Dragon'ची कोटीच्या कोटी उड्डाणे, पहिल्याच एपिसोडमध्ये Game of Thronesला टाकले मागे

बी टाऊन
Updated Aug 25, 2022 | 00:14 IST | टाइम्स नाऊ मराठी

House of the Dragon Views: 'हाऊस ऑफ द ड्रॅगन' (House of The Dragon)चा प्रीमियर (Premiere) रविवारी झाला.या सीरिजने 'गेम ऑफ थ्रोन्स'( Game of Thrones) ला व्ह्यूजच्या बाबतीत खूप मागे टाकले आहे. 'गेम ऑफ थ्रोन्स'पेक्षा चौपट व्ह्यूज 'हाऊस ऑफ द ड्रॅगन'ला मिळाले आहेत.

Huse of the dragon episode got 10 million Views
'हाऊस ऑफ ड्रॅगन'ने 'गेम ऑफ थ्रॉन्स'ला मागे टाकले  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • 'हाऊस ऑफ द ड्रॅगन'ची कोटीच्या कोटी उड्डाणे
  • पहिल्याच एपिसोडमध्ये 'गेम ऑफ थ्रोन्स'ला टाकले मागे
  • 'हाऊस ऑफ द ड्रॅगन'ला मिळाले 1 कोटी व्ह्यूज

House of Dragon Premiere Draws Nearly 10 Million Viewers: चाहते बऱ्याच दिवसांपासून 'हाऊस ऑफ द ड्रॅगन' (House of The Dragon) ची वाट पाहत होते आणि अखेर HBO वर त्याचा प्रीमियर झाला. 'गेम ऑफ थ्रोन्स'( Game of Thrones) चे जबरदस्त यश पाहता प्रेक्षकांना त्याच्या प्रीक्वलकडून मोठ्या अपेक्षा होत्या. तुलना होणे निश्चितच होते, मात्र 'हाऊस ऑफ द ड्रॅगन'च्या पहिल्या एपिसोडला 'गेम ऑफ थ्रोन्स'पेक्षा चौपट जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. ( House of the dragon episode got 10 million Views)


'हाऊस ऑफ द ड्रॅगन'ला 1 कोटी व्ह्यूज मिळाले आहेत

'हाऊस ऑफ द ड्रॅगन'चा प्रीमियर गेल्या रविवारी HBO Max वर झाला. पहिला एपिसोड सुमारे 1 कोटी लोकांनी पाहिला. हा आकडा फक्त अमेरिकेसाठी आहे. टीव्ही आणि ओटीटी व्ह्यूज मिळून ९.९८६ दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. 'हाऊस ऑफ द ड्रॅगन' भारतात DisneyPlus Hotstar India वर पाहता येईल. 'हाऊस ऑफ द ड्रॅगन' हा 'गेम ऑफ थ्रोन्स'चा प्रीक्वल आहे. अशा स्थितीत त्याची तुलना करता येईल का, असे प्रश्न उपस्थित केले जात होते, मात्र निकाल खरोखरच धक्कादायक निघाला. 'हाऊस ऑफ द ड्रॅगन'च्या पहिल्या एपिसोडला 'गेम ऑफ थ्रोन्स'च्या पहिल्या एपिसोडपेक्षा चौपट व्ह्यूज मिळाले आहेत.

अधिक वाचा : आलिया भट्टवर बॉडी शेमिंगमुळे 'हा' अभिनेता ट्रोल

'गेम ऑफ थ्रोन्स' फक्त 2.2 दशलक्ष लोकांनी पाहिला

HBO ने 2011 ते 2019 या कालावधीत 'गेम ऑफ थ्रोन्स' ऑन एअर केला आणि लोकांमध्ये त्याची प्रचंड क्रेझ होती. भारतातही याला खूप पसंती मिळाली. मात्र,'हाऊस ऑफ द ड्रॅगन'ने व्ह्यूज रेकॉर्डच्या बाबतीत त्याला मागे टाकले. 17 एप्रिल 2011 रोजी प्रसारित झालेल्या 'गेम ऑफ थ्रोन्स'च्या पहिल्या एपिसोडला 2.2 दशलक्ष व्ह्यूज मिळाले होते. 

अधिक वाचा : 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीच्या वेबसीरिजचा फर्स्ट लूक

सध्या फक्त 'गेम ऑफ थ्रोन्स'च्या पहिल्या एपिसोडची तुलना केली जात आहे. सीझनमागे तो यशाचे नवे विक्रम प्रस्थापित करत होता. 19 मे 2019 रोजी प्रसारित झालेल्या शेवटच्या भागाला 13.613.61 दशलक्ष व्ह्यूज मिळाले. अशा परिस्थितीत 'हाऊस ऑफ द ड्रॅगन' हा विक्रम मोडू शकतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी