Aamir Khan Fitness Secret: आमीर खान बॉलीवूड मधल्या अश्या निवडक अभिनेत्यांपैकी एक आहे, ज्यांच्यावर वाढत्या वयाचा काहीच परिणाम दिसून येत नाही. आमीरचा 2008 सालचा गाजलेला चित्रपट 'गजनी' असो वा 2022 साली आलेला 'लाल सिंह चड्डा' हा चित्रपट असो, बॉलीवूडच्या या मिस्टर परफेक्शनिस्ट च्या त्वचेवर वाढत्या वयाचे निशाण चुकून ही दिसून येत नाही. त्याच्या या चिरतरुण लुक चे नेमके काय गुपित आहे, ह्याचा स्वतः आमीरनेच खुलासा केला होता.
हे पण वाचा : आजच पूर्ण करा 'ही' चार कामे, अन्यथा बिघडेल आर्थिक बजेट
बी टाऊन चा एक्का मानला जाणाऱ्या आमीर ने प्रसारमध्यमांशी बोलताना आपल्या यंग लुक बद्दल काही खुलासे केले होते. ज्यात आपल्या तरुण आणि तजेलदार त्वचेचे कारण त्याचे 'जीन्स' असल्याचे सांगितले. "सर्वप्रथम माझे जीन्स या सगळ्यांना कारणीभूत आहेत" असे तो म्हंटला होता.
त्वचेवर जीन्सचा खरोखरच प्रभाव पडतो का?
हे तर आपण सगळेच जाणतो कि, आईवडिलांच्या जीनमुळे आपली चेहरेपट्टी, ऊंची, रंग तसेच आरोग्यासंबंधीत अनेक गोष्टींचा वारसा आपल्याला जन्मतः लाभतो. त्यामुळे जीनचा त्वचेशी नक्कीच संबंध आहे.
मेडिकलन्यूज.कॉमच्या एका लेखात असे लिहिले आहे कि, मुलांमध्ये आई-वडिलांचे प्रत्येकी अर्धे जीन्स असतात. या दोघांच्या एकत्रिकीकरणामुळे आपल्या त्वचेच्या रंगापासून ते पूर्ण व्यक्तिमत्व विकासांपर्यंत सारे काही घडते. शिवाय, आईवडिलांपैकी एकाचे जीन दुसऱ्यापेक्षा अधिक प्रभावी असल्यास, त्यांच्या मुलांवर त्याचा अधिक प्रभाव पडतो.
हे पण वाचा : ही औषधी वनस्पती करते मधुमेहापासून झटक्यात सुटका
आमीरने आपल्या चिरतरुण दिसण्याचे दुसरे कारण त्याचा आहार सांगितला आहे. आमीर बोलतो, "मी माझ्या आहाराला घेऊन खूप सतर्क असतो." आमीर खान अश्या अभिनेत्यांपैकी एक आहे, की ज्यांनी अगदी योग्यपद्धतीने आपल्या डाएटची काळजी घेतली आहे. त्यामुळे आमीरचा हा दूसरा मुद्दा देखील पटण्याजोगा आहे.
तरुण दिसण्यासाठी डॉक्टरांनी सांगितलेले हे पदार्थ नक्की खा
चिरतरुण व्यक्तिमत्वासाठी आमीर नेमके काय डाएट करतो, हे त्याचे त्यालाच माहिती आहे. पण, तुम्हाला आम्ही अश्या काही गोष्टी सांगणार आहोत कि ज्यामुळे तुम्ही वयाच्या आधी वयस्कर दिसण्यापासून वाचू शकाल.
हे पण वाचा : दिल्ली-एनसीआरला पुन्हा भूकंपाचे हादरे; नागरिक पुन्हा भयभीत
निरोगी आणि नितळ त्वचेसाठी योग्य डाएट पाळणे खूप गरजेचे आहे.
बीन्स: सुक्या लाल बीन्स, राजमा.
रंगीत फळे: टोमॅटो, बेरी, डाळिंब आणि लाल द्राक्षे.
चहा आणि मसाले: ग्रीन टी, लवंग, दालचिनी, ओरेगॅनो.
व्हिटॅमिन-सी युक्त अन्न : संत्री आणि लिंबू.
व्हिटॅमिन-ए युक्त अन्न: गाजर, ब्रोकोली, केळी, टोमॅटो.
व्हिटॅमिन-ई युक्त अन्न: सूर्यफूल तेल, धान्ये, ओट्स, नट्स आणि एवोकॅडो.
* (हा लेख तुमच्या प्राथमिक माहितीसाठी असून, त्वचेसंबंधीत घेतले जाणारे आहार आणि डाएट डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच करावेत.)