मुंबई : बॉलिवूड क्वीन कंगना राणौत आता मोठ्या पडद्यावर इंदिरा गांधींची भूमिका साकारणार आहे. 'इमर्जन्सी' चित्रपटातील कंगना राणौतचा फर्स्ट लूक समोर आला आहे. कंगना राणौतने आपल्या दमदार लूकने सर्वांना आश्चर्यचकित केले. पहिल्या लूकमध्ये ती हुबेहुब इंदिरा गांधींसारखी दिसत होती.
अधिक वाचा : Shamshera Movie Review & Rating: 'शमशेरा' अॅक्शन आणि रोमान्स तडका, डाकू आणि शुद्ध सिंग यांच्यात भयंकर टक्कर
कंगना राणौतचा हा लूक पाहिल्यानंतर कंगनाचा हा लूक कसा तयार झाला हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला नक्कीच उत्सुकता लागली होती. दरम्यान, कंगना राणौतने इंदिरा गांधी बनतानाचा पहिला मेकिंग व्हिडिओ इन्स्टा वर शेअर केला आहे. व्हिडिओ पोस्ट करत कंगनाने लिहिले - माझ्या दिग्दर्शनाच्या 'इमर्जन्सी' चित्रपटाचा फर्स्ट लूक अशाप्रकारे तयार करण्यात आला. संपूर्ण देशाला हादरवून सोडणारा लूक. माझ्या अद्भुत टीमचे आभार. प्रत्येक दिवस स्वप्न सत्यात उतरल्यासारखा असतो. जगातील सर्वोत्तम लोकांसोबत काम करणे.
इंदिरा गांधींच्या लूकसाठी साडी निवडण्यापासून ते मेकअपपर्यंत, कसं काम होतं ते तपशीलवारपणे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर स्पष्टपणे दिसून येतं. कंगनाच्या चित्रपटाची रिलीज डेट अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. पण या चित्रपटाने कंगनाच्या चाहत्यांमध्ये उत्कता वाढली आहे हे मात्र नक्की. कंगनाला इंदिरा गांधींच्या भूमिकेत पाहून ते खूप उत्साहित आहेत.
यापूर्वी कंगना राणौत राणी झाशी आणि थलैवी जयललिता यांच्या भूमिकेत पडद्यावर दिसली आहे. कंगना राणौतला इंदिरा गांधींच्या भूमिकेत कास्ट करण्यात मेकअप आर्टिस्ट डेव्हिड मालिनॉस्कीचा हात आहे. या चित्रपटात कंगना दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहे. याआधी प्रदर्शित झालेला कंगनाचा धाकड हा चित्रपट फारच फ्लॉप झाला होता. 'इमर्जन्सी'तून कंगना बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा यश मिळवू शकेल का, हे पाहावे लागेल.
दुसरीकडे याच चित्रपटातील अनुपम खेरचा लूक समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला होता, ज्यामध्ये कंगनाला माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत पाहून लोक आश्चर्यचकित झाले होते. कंगनानंतर आता अनुपम खेरचा लूकही खूपच आश्चर्यकारक आहे. कंगनाच्या चित्रपटात अनुपम खेर क्रांतिकारी नेते जयप्रकाश नारायण यांच्या भूमिकेत दिसणार आहेत.