राज कुंद्रा कसा गेला Pornography च्या व्यवसायात; जाणून घ्या शाली विकणाऱ्या कुंद्राचा पॉर्न 'राज'

बी टाऊन
भरत जाधव
Updated Jul 28, 2021 | 16:27 IST

पॉर्न चित्रपट बनवणे आणि अॅप्सवर प्रसारित करण्याच्या आरोपाखाली पोलीस कोठडीत असलेल्या राज कुंद्राच्या अडचणीत वाढ होत आहे.

How Raj Kundra got into the business of Pornography;
राज कुंद्रा कसा गेला Pornography च्या व्यवसायात  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • 2019 मध्ये 85 लाख रुपयांची गुंतवणुकीसह राज अॅपच्या व्यवसायात आले.
  • सुरुवातीला 2 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचं सांगत 85 लाख रुपयांच्या गुंतवणुकीत घेतलं संचालक पद.
  • सुमारे 35 सेलिब्रिटींसाठी अॅप्स तयार करण्यात आले.

मुंबई: पॉर्न चित्रपट बनवणे आणि अॅप्सवर प्रसारित करण्याच्या आरोपाखाली पोलीस कोठडीत असलेल्या राज कुंद्राच्या अडचणीत वाढ होत आहे. काल उच्च न्यायालयाने 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. एक व्यावसायिक म्हणून ओळख असलेला राज कुंद्रा या पॉर्न व्यवसायात आला कसा असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याविषयी आपण जाणून घेणार आहोत.. दरम्यान पोलीस या प्रकरणाची सर्व बाजूने तपास करत आहे. याच दरम्यान एका कंपनी ArmsPrime चं नाव वारंवार समोर येत आहे. ArmsPrime कंपनीच्या संस्थापकाची पोलिसांनी चौकशी केली आहे. 

या ArmsPrime कंपनीचे संस्थापक सौरभ कुशवाह यांनी मुंबई गुन्हे शाखेला सांगितलं की 2019 मध्ये 85 लाख रुपयांची गुंतवणुकीसह राज अॅपच्या व्यवसायात आले. 
 या कंपनीच्या कर्मचाऱ्यांची होत आहे चौकशी पोलीस आता HotShots आणि ArmsPrime कंपनी मध्ये राज कुंद्रसोबत काम केलेल्या प्रत्येक व्यक्तीची चौकशी करत आहे. दरम्यान पोलिसांनी ArmsPrime या कंपनीचे संस्थापक सौरभ कुशवाह यांचा जबाब नोंदवला आहे. 

2019 मध्ये राजशी झाली होती सौरभची भेट 

सौरभ कुशवाह यांनी सांगितले की, वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम केल्यानंतर त्याला OTT मध्ये व्यवसाय करायचा होता. ज्यात तंत्रज्ञानाचा वापर करून सेलिब्रिटी, इंफ्लुएंसर आणि क्रिएटर्सचा चाहत्यांशी संवाद साधत त्यातील सेवा कर घेण्याची योजना होती. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आरंभिक भांडवलाची आवश्यकता होती. मग माझा मित्र संजय त्रिपाठी यांच्या सांगण्यावरून जानेवारी 2019 मध्ये राज कुंद्राच्या बंगल्या किनारा येथे राज यांना भेटायला गेलो होतो.

राज कुंद्राला सुरुवातीला 2 कोटी 70 लाख रुपये गुंतवायचे होते

सौरभ कुशवाहा म्हणाले, 'राज कुंद्रा यांना ही कल्पना खूप आवडली आणि माझ्या व्यवसायात 2 कोटी 70 लाख रुपये गुंतवून कंपनीत ते संचालक होण्यास तयार झाले. तथापि, नंतर त्यांनी केवळ 85 लाख रुपयांची गुंतवणूक करून कंपनीत संचालक बनले आणि अशाप्रकारे आर्म्सप्रिम ArmsPrime  सुरू केले.

कंपनीने 35 सेलिब्रिटींसाठी अ‍ॅप्स बनवले

सौरभ कुशवाहा म्हणाले, 'कंपनीने हरभजन सिंग, पूनम पांडे, शर्लिन चोपडा, सपना सप्पु, गहना वशिष्ठ, मिनीशा लांबा अशा सुमारे 35 सेलिब्रिटींसाठी अॅप्स तयार करण्यात आले. कंपनी दोन मार्गांनी कार्यरत होती. पहिली बिल्ड अँड हँडओव्हर. ज्याअंतर्गत कोणत्याही सेलिब्रिटीची अॅप बनवून त्याची विक्री करायची. आणखी एक मार्ग म्हणजे अ‍ॅप बनविणे आणि त्या कंपनीमध्ये भाग घेणे म्हणजे शेअर्स आणि तांत्रिक अधिकार टेक्निकल राइट्स आपल्याकडे ठेवणे, तर अ‍ॅपमधील कंटेन्टचे राइट्स कलाकाराकडे असायचे. यात 70 टक्के भाग कलाकार आणि 30 टक्के भाग ArmsPrime चा असायचा. 

8.59 लाख रुपयांमध्ये बनविला HotShots अॅप

सौरभ कुशवाहा म्हणाले, 'कंपनी सुरू झाल्यानंतर  तीन महिन्यात राज कुंद्रा यांनी सौरभ कुशवाहाला सांगितलं की, त्यांना लंडनमध्ये राहणारे त्याचे नातेवाईक प्रदीप बख्शी यांना अॅप बनवायाचं आहे. ऑक्टोबर 2019 मध्ये कंपनीने Build&Handover पद्धतीत HotShots अ‍ॅप तयार केले आणि ते केनरीन कंपनीला 25 हजार डॉलर म्हणजे सुमारे 18.59 लाख रुपयांना विकले. हे पेमेंट 5 ते 6 हप्त्यांमध्ये देण्यात आले होते.

उमेश कामत अॅपच्या समस्या सांगायचा 

सौरभ कुशवाह म्हणाले, 'भारतातील हॉटशॉट्सचे काम सांभाळणारे उमेश कामत अॅपशी संबंधित समस्यांबाबत सौरभ कुशवाह यांच्याशी संपर्क साधत असत.यासोबत राज कुंद्राच्या कंपनीत आयटी हेड म्हणून काम करणारे रायन थॉर्पे हे सौरभ कुशवाह यांच्याकडून हॉटशॉट्स आणि ओटीटीशी (OTT) संबंधित इतर सल्लामसलतही घेत असत.

कंपनीची ढासळलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे राज कुंद्रा यांनी पद सोडलं

सौरभ कुशवाहा म्हणाले, 'एप्रिल आणि मे 2019 मध्ये ArmsPrime ची आर्थिक स्थिती खालावू लागली.राज कुंद्राला असे व्यवसाय मॉडेल हवे होते, ज्यामध्ये व्यवसाय सुरू झाल्यावरच नफा मिळू शकेल, परंतु ओटीटी आणि अॅप व्यवसायामध्ये काम करणारी कंपनी आर्म्सप्राइममधील व्यवसायाचा आधार तयार करण्यासाठी खूप पैसा लागला होता. आणखी काही महिन्यांनंतर, राज कुंद्राला आपला निर्णय चुकीचा वाटू लागला. यामुळे डिसेंबर 2019 मध्ये राज कुंद्रा यांनी कंपनी संचालकपद सोडले.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी