shah rukh khan: शाहरुख खान जूनियर कसा साजरा करणार किंग खानचा बर्थडे? जाणून घ्या पूर्ण प्लान

बी टाऊन
Updated Nov 01, 2022 | 15:02 IST | टाइम्स नाऊ मराठी

Raju Rahikwar : राजू रहिकवारला बॉलिवूडमध्ये शाहरूख खान ज्युनियर नावाने ओळखले जाते. सलमान खानही याचे फॅन आहेत. 

raju rahikwar
शाहरुख खान जूनियर कसा साजरा करणार किंग खानचा बर्थडे? 
थोडं पण कामाचं
  • राजू रहिकवार मुंबईच्या फिल्मसिटीमदील बॉलिवूड पार्कमध्ये सुपरस्टारचा बर्थडे साजरा करणार आहे.
  • स्टुडिओ स्टाफ आणि या ठिकाणी भेट देणाऱ्या पर्यटकांसह तो किंग खानचा बर्थडे साजरा करणार आहे.
  • कारण त्याचे म्हणणे आहे की तो जो काही आज आहे ते केवळ किंग खानच आहे. 

मुंबई: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) जगभरात किंग खान या नावाने प्रसिद्ध आहे. शाहरूखच्या चाहत्यांची संख्या काही कमी नाहीये. त्यातच किंग खान बुधवारी 2 नोव्हेंबरला आपला 57वा बर्थडे साजरा करत आहे. शाहरूखच्या चाहत्यांनी त्याच्या बर्थडेसाठी(birthday plan) काहीतरी प्लान केलेच आहे. मात्र त्याच्यासारखा दिसणारा ज्याला शाहरूख खान ज्युनियर(shahrukh khan junior) म्हणून ओळखले जाते अशा राजू रहिकवारनेही(raju rahikwar) शाहरूखच्या बर्थडेसाठी खास प्लान केला आहे.how to celebrate shah rukh khan looka like raju rahikwar birthday

अधिक वाचा - बहिणीच्या लग्नासाठी घेतलेल्या कर्जापोटी भावाची आत्महत्या

राजू रहिकवार मुंबईच्या फिल्मसिटीमदील बॉलिवूड पार्कमध्ये सुपरस्टारचा बर्थडे साजरा करणार आहे. स्टुडिओ स्टाफ आणि या ठिकाणी भेट देणाऱ्या पर्यटकांसह तो किंग खानचा बर्थडे साजरा करणार आहे. कारण त्याचे म्हणणे आहे की तो जो काही आज आहे ते केवळ किंग खानच आहे. 

काय आहे त्याचा प्लान?

ज्युनियर शाहरूख म्हणाला, बॉलिवूड पार्कमध्ये आम्ही चार केक कापणार आहोत. छोट्या छोट्या बॅचमध्ये हे सेलिब्रेशन केले जाणार आहे. या ठिकाणाला भेट देणाऱ्या प्रत्येकाला हा क्षण साजरा करता यावा यासाठी हे सेलिब्रेशन केले जाणार आहे. तसेच शाहरूख खानची काही गाणी जे लुंगी डान्स, गेरुआ, ये काली काली आंखे, चक धूम धूम आणि छैय्या छैय्या अशा काही गाण्यांवर डान्स केला जाणार आहे. तसेच बॅकग्राऊंडमध्ये काही डान्सरर्सही असणार आहेत. तसेच तेथील स्टुडिओ स्टाफ असलेल्या 100 लोकांसाठी बिर्याणीची व्यवस्था करण्यात आली आहे. 

अधिक वाचा - कडूंच्या मेळाव्याच्या ठिकाणी झळकले 'मै झुकेगा नही' चे पोस्टर

फिल्मसिटीमध्ये शाहरूखला पाहिले

राजू रहिकवारने नुकतेच शाहरूखला फिल्मसिटीमध्ये एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान पाहिले, मात्र अभिनेता व्यस्त असल्याने भेटू शकला नाही. मला शाहरूखला डिस्टर्ब करायचे नव्हते. मात्र त्याला माहीत आहे की राजू रहिकवार त्याचा खूप मोठा चाहता आहे. मी अनेक छोट्या भागांमध्ये शाहरूखच्या गाण्यावर परफॉर्मन्स करत असतो. चाहत्यांना मला मिळणारा प्रतिसाद हा खरंच वाखाणण्याजोगा असतो. मी शाहरूखला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि त्याला सतत यश मिळत राहो अशा शुभेच्छा देतो. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी