Sukesh Chandrashekhar तुरुंगातूनच कसं हॅंडल करायचा नेटवर्क?, पोलिसांनी दोन अभिनेत्रींसोबत सीन केला रिक्रिएट

सुकेश चंद्रशेखर प्रकरणात आणखी चार अभिनेत्रींची नावे समोर आली आहेत. यातील दोन अभिनेत्री निक्की तांबोळी आणि सोफिया सिंग यांनी पोलिसांसोबत तिहार तुरुंगातील गुन्हेगारीचे दृश्य पुन्हा तयार केले.

How was Sukesh Chandrashekhar handling everything from jail? Police recreated scene with two actresses
Sukesh Chandrashekhar तुरुंगातून कसं हॅंडल करायचा? पोलिसांनी दोन अभिनेत्रींसोबत सीन केला रिक्रिएट   |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • 200 कोटींच्या फसवणूक प्रकरणात सुकेश चंद्रशेखर अडकला आहे.
  • याप्रकरणी जॅकलिन फर्नांडिसची सतत चौकशी केली जात आहे.
  • तपास अभिनेत्रीच्या स्टायलिस्ट लिपक्षीपर्यंत पोहोचला

मुंबई : 200 कोटींची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली सुकेश चंद्रशेखर दिल्लीच्या तिहार तुरुंगात बंद आहे. या प्रकरणात जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही यांची नावे बऱ्याच दिवसांपासून समोर येत आहेत. सुकेशला तुरुंगात भेटण्यासाठी चार अभिनेत्री पोहोचल्याचं नुकतंच समोर आलं होतं. सुकेश प्रकरणाचा तपास अंमलबजावणी संचालनालय आणि दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखा (EOW) करत आहेत. शनिवारी EOW ने तिहार तुरुंगातील चारपैकी दोन अभिनेत्री निक्की तांबोळी आणि सोफिया सिंग यांच्यासोबत गुन्ह्याचे दृश्य पुन्हा तयार केले. निक्की तांबोळी आणि सोफिया सिंग यांनी सुकेशची तुरुंगात भेट घेतल्याचे तपासात समोर आले आहे. सुकेशने या दोन्ही अभिनेत्रींना चित्रपटात मोठ्या भूमिका देऊ केल्या. (How was Sukesh Chandrashekhar handling everything from jail? Police recreated scene with two actresses)

अधिक वाचा : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला 200 कोटींच्या आर्थिक अफरातफर प्रकरणी हंगामी जामीन

पिंकी इराणी यांच्या माध्यमातून भेट झाली

सुकेश तुरुंगातूनच आपले काम सुरू ठेवत होता. EOW विशेष पोलिस आयुक्त रवींद्र यादव यांनी वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना सांगितले की, "सुकेश सेलमध्ये सिंडिकेट कसा चालवायचा हे शोधणे आमच्यासाठी खूप महत्वाचे होते म्हणून आम्ही तिहार तुरुंगातील संपूर्ण सीन पुन्हा क्रिएट केला. निकिता तांबोळी आणि सोफिया सिंगसह गुन्हेगारीचे दृश्य पुन्हा तयार करण्यात आले. जेल क्रमांक एकमध्ये त्याची सुकेशशी भेट झाली. पिंकी इराणीच्या माध्यमातून तिची सुकेशशी भेट झाली होती.

ऑफिस जेलमध्येच असल्याचे सांगायचा

सुकेशने तुरुंगात पूर्ण व्यवस्था केली होती. ती कोणत्या मार्गाने आली आणि सुकेशला ती कुठे भेटली याचा तपास पोलीस करत आहेत. यावेळी व्हिडिओग्राफीही करण्यात आली. सुकेश आपलं काम इतक्या चोखपणे करायचा की लोक त्याच्या बोलण्यात गुंगायचे. दोन्ही अभिनेत्रींनी पोलिसांना सांगितले की, त्यांना सुकेशवर संशय होता पण तरीही त्यांची फसवणूक झाली. सुकेश पूर्ण आत्मविश्वासाने बोलत असे आणि लोकांना नियंत्रित करणे त्याला चांगले माहित होते. त्याच्यावर संशय घेणाऱ्यांचीही मनधरणी करण्यात त्याला अखेर यश आले.

अधिक वाचा : Taapsee Pannu:राजू श्रीवास्तव यांच्याबद्दल विचारताच पापाराझींवर पुन्हा संतापली तापसी पन्नू

सुकेशला मोठी कामे करून आमिष दाखवले

“सुकेश नेहमी स्वतःबद्दल मोठं बोलायचा. काहींना तो मोठा निर्माता तर काहींना तो दक्षिण भारतीय वाहिनीचा प्रमुख सांगत असे. तुरुंगाच्या सेललाही तो आपले कार्यालय सांगत असे. त्याच्याकडे एवढा पैसा होता की तो लोकांना त्यांच्या बळावर आकर्षित करत असे आणि ते त्याच्यावर विश्वास ठेवायचे. तुरुंगाच्या आतून चित्रपट बनवत असल्याचे त्याने दोन्ही अभिनेत्रींना सांगितले.

कोणालाही क्लीन चिट नाही

या प्रकरणात आणखी काही अभिनेत्रींचाही सहभाग असल्याचा संशय असून आतापर्यंत कोणालाही क्लीन चिट देण्यात आलेली नाही. सुकेश तुरुंगातूनच त्याचा खेळ खेळत होता आणि काही पोलीस अधिकारीही त्याच्यासोबत सामील होण्याची शक्यता आहे. यात आणखी काही हिरोईनचाही सहभाग आहे. आजपर्यंत कोणालाही क्लीन चिट दिलेली नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी