Vikram Vedha Twitter Review : हृतिक-सैफच्या 'विक्रम वेधा'ला प्रेक्षकांची पसंती, सोशल मीडियावर कमेंट्सचा वर्षाव

बी टाऊन
Updated Sep 30, 2022 | 15:07 IST | टाइम्स नाऊ मराठी

Vikram Vedha Twitter Review : हृतिक रोशन (Hrithik roshan) आणि सैफ अली खान (saif ali khan) स्टारर विक्रम वेधा (Vikram vedha) या सिनेमाने थिएटरमध्ये धुमाकूळ घातला आहे. सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून ट्विटरवर प्रेक्षक सिनेमाचं तोंडभरून कौतुक करत आहेत. काही यूजर्सनी मूळ सिनेमापेक्षाही रिमेक चांगला असल्याचंही म्हटलं आहे.

 hrithik roshan and saif ali khan starrer Vikram Vedha Twitter Review
'विक्रम वेधा'चा प्रेक्षकांची पसंती, कमेंट्सचा वर्षाव  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • विक्रम-वेधाला प्रेक्षकांची पसंती
  • सोशल मीडियावर हृतिक -सैफच्या कामावर कमेंट्सचा वर्षाव
  • बॉक्स ऑफिस कलेक्शनवर साऱ्यांच्याच नजरा

Vikram Vedha Twitter Review : हृतिक रोशन (Hrithik roshan) आणि सैफ अली खान (saif ali khan) स्टारर विक्रम वेधा अखेर थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. बऱ्याच काळानंतर सिल्व्हर स्क्रीनवर पुनरागमन करणाऱ्या हृतिकची मोहिनी आजही प्रेक्षकांवर कायम आहे असंच म्हणावं लागेल. सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. प्रेक्षक सिनेमाचं तोंडभरून कौतुक करत आहेत. सैफ अली खानचे कामही प्रेक्षकांना आवडले आहे. (hrithik roshan and saif ali khan starrer Vikram Vedha Twitter Review  comments on socail media)

मिळालेल्या माहितीनुसार, रिलीज झाल्यापासून सिनेमा चांगली कामगिरी करत आहे. ज्यांनी सिनेमाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिला आहे त्यांनी ट्विटरवर याबद्दल फक्त चांगल्या गोष्टी लिहिल्या आहेत. प्रेक्षक विक्रम वेधला ३ ते ४ स्टार देताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, हा सिनेमा तमिळ सिनेमाचा रिमेक आहे ज्याचे शीर्षक सेम आहे, मात्र प्रेक्षक मूळ तामिळ सिनेमापेक्षाही हिंदी रिमेक चांगला असल्याचं म्हणत आहेत. विक्रम वेधा हा हिंदी रिमेक पाहिल्यानंतर मूळ तामिळ सिनेमाही विसरायला होईल अशीही कमेंट प्रेक्षक ट्विटरवर करताना दिसत आहेत. 

अधिक वाचा : बहुप्रतीक्षित 'भेडिया'चा teaser रिलीज

एका ट्विटर यूजरने म्हटले आहे, "हृतिकचा स्वॅग आणि सैफची इंटेंसिटी. सिनेमाची कथा तुम्हाला शेवटपर्यंत अनेक ट्विस्ट आणि टर्न्ससह अडकवून ठेवते. 
मी मूळ सिनेमाही पाहिलाय  पण हा जास्त छान वाटला. जरूर पहा."


आणखी एका ट्विटर यूजरने म्हटले आहे की, 'अग्निपथ'पासून अभिनय आणि स्टार पॉवरचं कॉम्बिनेशन आहे हृतिक रोशन. तर सैफनेही त्याला मिळालेल्या भूमिकेचं सोनं केलं आहे."


महत्त्वाचं म्हणजे ट्विटरवर दोन ट्रेण्ड होत आहेत. एकीकडे सिनेमाचं कौतुक होताना दिसतंय तर दुसरीकडे काही जणांनी 'विक्रम वेधा'चं वर्णन "Disaster" 
असंही केलंय. काहींनी "रिकाम्या खूर्च्या हृतिक आणि सैफचा विक्रम वेधा पाहात असल्याचं म्हटलं आहे"

अधिक वाचा : पंकजा मुंडेंचा झिंगाट डान्स, पाहा व्हिडीओ


मूळ तमिळ सिनेमात विजय सेतुपती आणि आर. माधवन (R. Madhvan) मुख्य भूमिकेत होते. हा सिनेमा लखनौ पोलिसांचा एक प्रामाणिक अधिकारी विक्रम याविषयी आहे. 
जो गुंड वेधाला शोधून काढण्याच्या मोहिमेवर आहे. मात्र, जेव्हा वेधा पोलिसांना शरण जाते आणि कथेची बाजू सांगू लागते तेव्हा हा सिनेमा चांगल्या आणि वाईटाच्या व्याख्येवर प्रश्नचिन्ह निर्माण करतो. एकूणंच काय तर हृतिक रोशनसाठी एकदा सिनेमा पाहायला काहीच हरकत नाही. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी